माजी IGने स्वत:वरच झाडल्या गोळ्या, सुसाईट नोटमध्ये धक्कादायक दावा, एका उल्लेखाने खळबळ!

माजी पोलिस महानिरीक्षक (आयजी) अमर सिंह चहल हे राहत्या घरात जखमी अवस्थेत आढळले. घटनास्थळी एक चिठ्ठी सापडली आहे, ज्यामध्ये ऑनलाइन फसवणुकीमुळे आर्थिक अडचणी आल्याचे नमूद केले आहे. कुटुंबातील सदस्यांनी सांगितले आहे की त्यांनी कथितपणे स्वतःवर गोळी झाडून घेतली.

माजी IGने स्वत:वरच झाडल्या गोळ्या, सुसाईट नोटमध्ये धक्कादायक दावा, एका उल्लेखाने खळबळ!
Amar Singh Chahal
Image Credit source: Tv9 Network
| Updated on: Dec 22, 2025 | 5:43 PM

माजी पोलीस महानिरीक्षक (IG) अमर सिंह चहल यांनी डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली आहे. पंजाबमधील राहत्या घरात त्यांनी टोकाचे पाऊल उचलले. त्यानंतर तातडीने त्यांना पटियालामधील रुग्णालयात दाखल करण्यात आहे. सध्या त्यांच्यावर उपजार सुरु असून त्यांची प्रकृती अतिशय गंभीर आहे. या घटनेनंतर पोलिसांना घरातून 12 पानांची सुसाईट नोट मिळाली आहे. या नोटमध्ये केलेल्या एका उल्लेखाने खळबळ माजली आहे.

पंजाबच्या पटियालामध्ये पंजाब पोलिसांचे माजी पोलीस महानिरीक्षक (IG) अमर सिंह चहल यांनी घरात स्वत:वर गोळी झाडून घेतली. गंभीर जखमी अवस्थेत कुटुंबियांनी त्यांना पटियालातील पार्क हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले आहे. तेथे डॉक्टरांची टीम त्यांच्या उपचार करत आहे. त्यांची प्रकृती सध्या गंभीर आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नातेवाइकांनी सांगितले की अमर सिंह चहल यांनी स्वतःवर गोळी झाडली, ज्यामुळे ते गंभीर जखमी झाले आहेत.

पोलिसांना घटनास्थळावरून 12 पानांची सुसाइड नोट सापडली आहे, ज्यात ऑनलाइन फसवणुकीमुळे झालेल्या आर्थिक अडचणींचा उल्लेख आहे. मात्र, पोलिस अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे की या प्रकरणाची सर्व पैलूंवरून तपासणी सुरू आहे आणि कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचण्यापूर्वी तथ्यांची पूर्ण तपासणी केली जाईल. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की फॉरेन्सिक टीमने घटनास्थळी तपास केला आणि आवश्यक पुरावे गोळा केले आहेत. तसेच नातेवाइक आणि संबंधित व्यक्तींचे जबाबही नोंदवले जात आहेत. तपास पूर्ण झाल्यानंतरच घटनेच्या खऱ्या कारणांचा उलगडा होईल. सध्या पोलिस संपूर्ण प्रकरणावर लक्ष ठेवून आहेत.

डीजीपीकडे केली विनंती

अमर सिंह चहल यांच्या नातेवाइकांनी सांगितले की त्यांच्यासोबत ऑनलाइन फसवणुकीची घटना घडली होती. या प्रकरणात त्यांची ८ कोटी रुपयांची फसवणूक झाली होती. याचा उल्लेख त्यांनी १२ पानांच्या सुसाइड नोटमध्ये केला आहे. त्यांनी पंजाबच्या डीजीपींच्या नावे हे पत्र लिहिले आहे, ज्यात या प्रकरणाकडे तात्काळ लक्ष देण्याची विनंती केली आहे.

फरीदकोट प्रकरणात आरोपी

सांगण्यात येते की अमर सिंह चहल हे २०१५ च्या फरीदकोट गोळीबार प्रकरणात आरोपी आहेत. या प्रकरणात २४ फेब्रुवारी २०२३ रोजी एडीजीपी एलके यादव यांच्या नेतृत्वाखाली पंजाब पोलिसांच्या विशेष तपास पथकाने फरीदकोटच्या एका कोर्टात चार्जशीट दाखल केली होती. यात अमर सिंह चहल यांचे नाव समाविष्ट आहे. या चार्जशीटमध्ये पंजाबातील अनेक मोठ्या नेत्यांचे नावही समाविष्ट करण्यात आले आहेत.