Amazon ची भारतातील पहिली एअरकार्गो लाँच

एमेझॉनने या कार्गो सेवेसाठी बोईंग 737-800 या विमानाचा वापर करणार असून हे मालवाहतूकीचे विमान मुंबई, हैदराबाद, बंगळुरू, दिल्ली या शहरांना वस्तूंची डीलीव्हरी करणार आहे. यामुळे भारतातील डीलीव्हरी जलद होणार आहे.

Amazon ची भारतातील पहिली एअरकार्गो लाँच
amazonaircargo
Image Credit source: socialmedia
| Updated on: Jan 24, 2023 | 9:35 AM

मुंबई : Amazon या ऑनलाईन विक्री करणाऱ्या जायंट कंपनीने भारतातील पहिली एअरकार्गो ( Aircargo )  सेवा लाँच केली आहे. यामुळे भारतातील ग्राहकांना ( customer) आता वेगाने वस्तूंची डीलीव्हरी ( delivery ) करणे सोपे होणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे. या कंपनीने त्यासाठी बंगळूरू येथील कार्गो एअरलाईन क्वीकजेट कंपनीशी पार्टनरशिप केली आहे. त्यामुळे आता एमेझॉनमार्फत ऑनलाईन वस्तू मागविणाऱ्यांना लवकर वस्तू मिळणार आहेत.

Amazon या बड्या कंपनीने लाँच केलेही पहीलीच एअर कार्गो सेवा नसून याआधी या कंपनीने अमेरिकन बाजारात साल २०१६ मध्ये आपली एअरकार्गो सेवा सुरू केली. नंतर युरोपच्या बाजाराच एअरकार्गो सेवा लाँच केली. भारतीय मार्केटमध्ये एमेझॉनचे दोन कार्गो एअरक्राफ्ट सुविधा देणार आहेत. प्रत्येक कार्गो विमानांची क्षमता 20,000 पॅकेट्सच्या डिलीव्हरीची आहे.

Amazon एअर कार्गो सेवा महत्वाच्या वेळी लाँच झाली आहे. आमच्या भारतातील ग्राहकांचा डीलीव्हरीचा अनुभव आम्ही सुधारणार आहोत. त्यामुळे भारतातील 11 लाख विक्रेत्यांच्या मदतीने त्यांचा व्यवसाय वाढण्यास मदत होईल असे कंपनीचे ग्राहक समाधान विभागाचे अध्यक्ष अखील सक्सेना यांनी म्हटले आहे. एमेझॉनने या कार्गो सेवेसाठी बोईंग 737-800 या विमानाचा वापर करणार असून हे मालवाहतूकीचे विमान मुंबई, हैदराबाद, बंगळुरू, दिल्ली या शहरांना डीलीव्हरी करणार आहे. यामुळे केवळ वस्तूंची भारतातील डीलीव्हरीच जलद होणार नसून खर्चही वाचणार आहे