ते म्हणतात पाकिस्तानशी चर्चा करा, पण आम्ही ठरवलंय.. दहशतवादच उखडून फेकायचाय..

| Updated on: Oct 05, 2022 | 5:47 PM

जम्मू आणि काश्मीरमधील कथित विकासासाठी त्यांनी अब्दुल्ला (नॅशनल कॉन्फरन्स), मुफ्ती (पीडीपी) आणि नेहरू-गांधी (काँग्रेस) या घराण्यांना जबाबदार धरले आहे.

ते म्हणतात पाकिस्तानशी चर्चा करा, पण आम्ही ठरवलंय.. दहशतवादच उखडून फेकायचाय..
Follow us on

जम्मू काश्मीरः सध्या देशातील राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला आहे. सध्या केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Union Home Minister Amit Shah) जम्मू-काश्मीरच्या तीन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यावर असताना त्यांनी पाकिस्तानसोबत (Pakistan) कोणत्याही प्रकारची चर्चा करणार नसल्याचे स्पष्टपणेच सांगितले. यावेळी त्यांनी सांगितले की, मोदी सरकार जम्मू-काश्मीरमधील (Jammu kashmir) दहशतवाद संपवणार आहे. येथील दहशतवाद संपवून देशातील सर्वात शांत ठिकाण म्हणून जम्मू काश्मीर बनवणार असल्याचे अश्वासनही त्यांना यावेळी दिले.

बारामुल्ला येथील सभेला संबोधित करताना अमित शहा यांनी दहशतवादाविषयी बोलताना सांगितले की, या दहशतवादाचा कधी कोणाला फायदा झाला आहे का? त्यामुळेच 1990 पासून जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादाने 42,000 लोकांचा बळी घेतला असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.

जम्मू आणि काश्मीरमधील कथित विकासासाठी त्यांनी अब्दुल्ला (नॅशनल कॉन्फरन्स), मुफ्ती (पीडीपी) आणि नेहरू-गांधी (काँग्रेस) या घराण्यांना जबाबदार धरले आहे. कारण या तिन्ही पक्षांनी 1947 मध्ये देशाच्या स्वातंत्र्यानंतरचा बहुतांश काळ या परिसरावर राज्य केले आहे.

राज्य गृहमंत्री म्हणाले, की, काही लोक म्हणतात की आपण पाकिस्तानशी चर्चा करू, मात्र पाकिस्तानबरोबर का बोलावे. त्यांच्याशी आम्ही कोणताही संवाद साधणार नाही मात्र बारामुल्लामधील नागरिकांबरोबर आम्ही संवाद साधू असा शब्दही त्यांनी यावेळी दिला.

देशातील दहशतवाद मोदी सरकारला मुळातूनच नष्ट करायचा आहे. कारण मोदी सरकार या दहशतवादाविरोधात कायमच उभा राहिले आहे.

जम्मू काश्मिरमधील असो किंवा देशातील दहशतवाद असेल तो संपवून आम्हाल भारताचे नंदनवन करायचे आहे असंही त्यांनी यावेळी सांगितले. येथील दहशतवाद नष्ट करुन या भूमीला आम्ही शांत करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

तसेच काही वेळा काही लोकं पाकिस्तानबद्दल बोलत असतात, त्यांच्याबद्दल चर्चा करतात मात्र पाकव्याप्त काश्मिरमधील किती गावात वीज जोडणी केली आहे असा सवालही त्यांनी उपस्थित केले आहेत.

मोदी सरकार आल्यानंतर मागील तीन वर्षांत आम्ही काश्मीरमधील सर्व गावांमध्ये वीज जोडणी केली असल्याचे सांगितले. यावेळी काँग्रेससह गांधी कुटुंबीयांवर त्यांनी जोरदार टीका केली.

मुफ्ती आणि कंपनी, अब्दुल्ला आणि पुत्रांनी आणि काँग्रेसने जम्मू-काश्मीरमधील नागरिकांच्या हितासाठी काहीही केले नसल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.