काश्मिरात लष्कराच्या एका जवानाने सहकाऱ्यांवर केला गोळीबार, एक जवान ठार, गोळीबार करणाऱ्यासह तिघे जखमी

| Updated on: Jul 15, 2022 | 2:47 PM

या प्रकरणाची सविस्तर चौकशी करण्याचे आदेश सैन्याकडून देण्यात आल्याची माहिती आहे. लष्करी जवानांकडूनच आपल्या सहकाऱ्यांवर होत असलेल्या गोळीबारांच्या घटनांत गेल्या काही महिन्यांत वाढ झालेली आहे.

काश्मिरात लष्कराच्या एका जवानाने सहकाऱ्यांवर केला गोळीबार, एक जवान ठार, गोळीबार करणाऱ्यासह तिघे जखमी
जवानाचा सहकाऱ्यांवर गोळीबार
Image Credit source: social media
Follow us on

श्रीनगर- लष्कराच्या एका जवानाने (Army Solider)आपल्याच सहकाऱ्यांवर गोळीबार (open fire)केल्याची घटना जम्मू-काश्मिरात घडली आहे. या गोळीबारात एक जवान जागीच ठार (one solider dead)झाला असून, तीन जण जखमी झाले आहेत. ज्या जवानाने हा गोळीबार केला, तो जवानही या गोळीबारात जखमी झाल्याची माहिती आहे. पुंछ भागात असलेल्या सुरनकोट येथील लष्कराच्या छावणीत हा धक्कादायक प्रकार घडला आहे. या प्रकरणाची सविस्तर चौकशी करण्याचे आदेश सैन्याकडून देण्यात आल्याची माहिती आहे. लष्करी जवानांकडूनच आपल्या सहकाऱ्यांवर होत असलेल्या गोळीबारांच्या घटनांत गेल्या काही महिन्यांत वाढ झालेली आहे.

तीन आठवड्यांपूर्वी पंजाबातही झाला होता असाच प्रकार

पंजाबच्या पठाणकोट जिल्ह्यातील मीरथल कँन्टोन्टमेंटमध्ये एका जवानाने झोपलेल्या दोन सहकाऱ्यांवर गोळीबार केला होता. या अंदाधुंद गोळीबारात दोन जवान जागीच ठार झाले होते. यानंतर झालेल्या गोँधळाचा फायदा घेत हा आरोपी जवान पसारही झाला. स्थानिक पोलिसांच्या मदतीने सैन्यदलाने सर्च ऑपरेशन करुन या गोळीबार करणाऱ्या जवानाला अटक केली आहे. हवालहार गौरीशंकर आणि सूर्यकांत या दोघांचा या घटनेत नाहक बळी गेला. आरोपी जवान लोकेश याला अटक करण्यात आली असून, पुढील लष्करी कारवाई सुरु आहे.

४ महिन्यांपूर्वी अमृतसरच्या बीएसएफ हे़डक्वार्टरमध्येही गोळीबार

चार महिन्यांपूर्वी अशीच एक घटना पंजाबच्या अमृतसर जिल्ह्यात बीएसएफ हेडक्वार्टरमध्येही घडली होती. बीएसएफ कॉन्स्टेबल सत्यप्पा एसकेने मेसमध्ये गोळीबार केला होता. यात जवानांचा मृत्यू झाला होता, तर एक जण गंभीर जखमी झाला होता. गोळीबार करणाऱ्या सत्यप्पाने नंतर स्वतालाही गोळी मारुन घेतली होती. मानसिक आजारपणामुळे त्याने हे कृत्य केल्याचे नंतर समोर आले होते. त्याच्या बॅगेतून डिप्रेशनवर मात करण्याची औषधेही नंतर सापडली होती.