दुबईतून येणार 6 मॉडल, जावयाला लँड रोव्हर डिफेंडर गिफ्ट; बाहुबली आमदाराच्या मुलीचं लग्न चर्चेत
बिहारचे बाहुबली आमदार अनंत सिंह यांच्या मुलीच्या लग्नाची सध्या जोरदार चर्चा आहे. जावयाला 2 कोटींची लँड रोव्हर डिफेंडर भेट म्हणून दिली जाणार आहे. दुबईतून 6 मॉडेल्स, 150 पेक्षा जास्त पदार्थ आणि 4 लाख पाहुणे या शाही विवाह सोहळ्यात असतील. अमेरिकेत नोकरी करणारे ऋषिकेश कुमार हे अनंत सिंह यांचे जावई आहेत.

बिहारच्या मोकामामध्ये बाहुबली म्हणून प्रसिद्ध असलेले आमदार अनंत सिंह यांच्या मुलीचं लग्न सध्या संपूर्ण देशात गाजत आहे. अनंत सिंह यांची कन्या शिवांगी हिच्या लग्नाची जय्यत तयारी सुरू आहे. या लग्नासाठी देश विदेशातून पाहुणे येणार आहेत. अनेक व्हीआयपी लोक येणार आहेत. या लग्नात अनंत सिंह हे आपल्या जावयाला लग्जरी कार लँड रोव्हर डिफेंडर गिफ्ट म्हणून देणार आहेत. या कारची किंमत दीड ते 2 कोटी असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे या लग्नाची तुफान चर्चा रंगली आहे.
अनंत सिंह यांच्या जावयाचं नाव ऋषिकेश कुमार आहे. ऋषिकेश हे पटनाजवळ असलेल्या बिहटा येथील रहिवाशी आहे. ऋषिकेश कुमार हे अमेरिकेत राहतात. अनंत सिंह यांनी लेकीच्या लग्नावर प्रचंड खर्च करण्यास सुरुवात केली आहे. एवढंच नव्हे तर लाडक्या जावयाला 2 कोटी किंमतीची लँड रोव्हर डिफेंडर कार गिफ्ट म्हणून देणार आहे. ही कार अनंत सिंह यांच्या दारात आलेली आहे. येत्या 25 नोव्हेंबर रोजी नदावां गावात होणाऱ्या या शाही विवाह सोहळ्यात ही कार आकर्षणाचं केंद्र असणार आहे. अनंत सिंह जावयाला जी कार देणार आहेत, ती देशातील सर्वात महागडी कार मानली जाते. या कारच्या टॉप व्हेरिएंटची किंमत 3 कोटी रुपयांपर्यंत आहे.
150 प्रकारचे पदार्थ
अनंत सिंह यांच्या मुलीचं लग्न 10 एकरावर होणार आहे. या ठिकाणी तंबू आणि मंडपची उभारणी सुरू आहे. मंडप उभारण्यासाठी उत्तर प्रदेशातील मऊ येथून कारागिर बोलावण्यात आले आहेत. तसेच सजावटीसाठी परदेशातून फुल मागवण्यात आले आहेत. या ग्रँड विवाह सोहळ्यसााठी दुबईतून 6 मॉडल बोलावण्यात आल्या आहेत. बॉलिवूड आणि भोजपुरी कलाकारांनाही या लग्न सोहळ्याचं खास आमंत्रण देण्यात आलं आहे. लालू प्रसाद यादव, नितीश कुमार यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही अनंत सिंह लग्नाचं आमंत्रण देणार आहेत. याशिवाय केवळ भारतातूनच नव्हे तर परदेशातूनही या लग्नाला पाहुणे येणार आहेत. काही मीडिया रिपोर्टनुसार, या लग्नात एकूण 150 हून अधिक पदार्थांची रेलचेल असणार आहे. लग्नाला एकूण 4 लाख पाहुणे येणार आहेत. या सर्व पाहुण्यांसाठी जेवणाची खास व्यवस्था करण्यात आली आहे.
जावई काय करतो?
ऋषीकेश कुमार हे पटणाच्या बिहटा येथील कृष्णानगर येथील रहिवाशी आहेत. त्यांच्या वडिलांचे नाव रणविजय सिंह आहे. ऋषिकेश यांनी अमेरिकेच्या जॉर्जिया स्टेट विद्यापीठातून एमबीए केलं आहे. तिथेच ते नोकरी करत आहेत.