Jio Recharge Plan: दिवाळीत ग्राहकांना Jio ची खास ऑफर, 10 महिन्यांच्या रिचार्जवर 5 महिने अगदी मोफत
Jio Recharge Offer: दिवाळी सुरु असताना ग्राहकांसाठी एक खास प्लान जिओने जाहीर केला आहे. ज्यात १० महिन्यांच्या रिचार्ज प्लानवर पात महिने फ्री रिचार्ज मिळणार आहे.

Jio Recharge Plan Offer: दिवाळीच्या पार्श्वभूमीवर जिओने आपल्या ग्राहकांना एक मोठी आनंदाची बातमी दिली आहे. Jio Home ग्राहकांसाठी खास फेस्टिव्ह ऑफर जाहीर केलेली आहे. या ऑफर अंतर्गत ग्राहकांना १० महिन्यांच्या रिचार्जवर पाच महिन्यांची अतिरिक्त फ्री सेवा मिळणार आहे. म्हणजेच १० महिन्यांचे पैसे भरुन ग्राहकांना एकूण १५ महिने घरातील वायफाय आणि मनोरंजन सेवांचा लाभ घेता येणार आहे. कंपनीने या ऑफरला ‘JioHome Freedom Offer’ असे नाव दिले आहे. गी ऑफर सर्व जिओ मोबाईल ग्राहकांसाठी नसून फक्त JioHome ग्राहकांनासाठी पात्र आहे.
जिओने आपल्या अधिकृत X अकाउंटवर या फेस्टिव्ह ऑफरसंदर्भात माहिती दिली आहे. म्हणजेच, ऑफरचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांना एक विशिष्ट मोबाईल क्रमांकावर मिस्ड कॉल द्यावा लागणार. JioHome Freedom Offer अंतर्गत ग्राहकांना दरमहा ६६६ रुपये या दराने १० महिन्यांच्या सेवेचे पैसे भरावे लागणार आहेत. यानुसार खर्चत ६६६० रुपये होईल. यानंतर ग्राहकांना १५ महिन्यांची सेवा मिळेल. म्हणजेच अतिरिक्त पाच महिन्यांसाठी वेगळे पैसे भरावे लागणार नाहीत. ही ऑफर जिओच्या मोबाईल प्रीपेड किंवा पोस्टपेड रिचार्जसाठी नाही आहे. ती JioHome सेवेसाठी लागू आहे. यामध्ये JioFiber आणि JioAirFiber या माध्यमातून घरगुती इंटरनेट आणि मनोरंजनाच्या सुविधा दिल्या जात आहे.
JioHome Freedom Offer चा लाभ घेण्यासाठी पात्र ग्राहकांना पुढील प्रक्रिया पूर्ण कराव्या लागणार आहेत:
- JioHome Freedom Offer चा लाभ घेण्यासाठी पात्र ग्राहकांना पुढील प्रक्रिया पूर्ण कराव्या लागणार आहेत:
- सर्वप्रथम JioHome कनेक्शनशी नोंदणीकृत असलेल्या मोबाइल क्रमांकावर कन्फरर्मेशन मेसेज पाठवला जाईल.
- मेसेजमधील दिलेल्या सूचनांचे पालन करुन ऑफर क्लेम करण्याची प्रक्रिया पूर्ण करावी.
- यानंतर १० महिन्यांच्या सेवेचे पेमेंट केल्यावर एकूण १५ महिन्यांची वैधता ंमिळेल.
- महत्त्वाचे मिस्ड कॉल हा JioHome कनेक्शशी लिंक असलेल्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर द्यावा.
जिओने नवीन JioHome कनेक्शन घेऊ इचिछाणाऱ्या ग्राहकानाही स्वतंत्र ऑफर दिली आहे. या ऑफरमध्ये दोन महिन्यांच्या प्लॅनवर एक महिना अतिरिक्त सेवा मिळणार आहे. एकूणच दोन महिन्यांचे पैसे भरून ग्राहकांना एकूण तीन महिने सेवा वापरता येणार आहे.
