Gokul Sangharsh morcha : ही संघर्षांची शेवटची दिवाळी, लक्षात ठेवलंय 2029 हे कोल्हापूर हाय… ‘गोकुळ’वरून महायुतीच्या विरोधात आंदोलक आक्रमक
Gokul Sangharsh morcha : ही संघर्षांची शेवटची दिवाळी, लक्षात ठेवलंय 2029 हे कोल्हापूर हाय... अशा विविध पोस्टरमधून महायुतीच्या नेत्यांच्याविरोधात आक्रमक पवित्रा घेतला जात असल्याचे दिसत आहे.

Kolhapur gokul protest banner Image Credit source: टीव्ही9 मराठी
- गोकुळच्या निकालानंतर कोरम पूर्ण होत नसल्याने चार शासन नियुक्त संचालकाच्या निर्णयावरून वातावरण तापलं आहे. या निर्णयाविरोधात पुकारलेल्या आंदोलनात आंदोलक जमण्यास सुरूवात झाली आहे.
- गोकुळच्या 25 पैकी 13 जागा जिंकलेल्या राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीचे नेते सतेज पाटील यांनी निर्णयाविरोधात रस्तावरच्या लढाईपासून कोर्टातही लढाईची घोषणा केली आहे. समविचारी आघाडीचा मोर्चा दसरा चौकातून जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयावर मोर्चा काढला जाणार आहे.
- कोल्हापुरात काढण्यात आलेल्या मोर्चात महायुतीच्या नेत्याच्या विरोधातील संताप बॅनरबाजीतही दिसून आले. या आंदोलनात कोल्हापुरी पायताण सुद्धा प्रतीकात्मक आणण्यात आलंय.
- लक्षात ठेवलंय 2029 हे कोल्हापूर हाय, ही संघर्षाची शेवटची दिवाळी असू दे, हे कोल्हापूर हाय, गोकुळसाठी एवढा रडीचा डाव खेळणारे, एक खासदार कमी होता म्हणून राजीनामा देणारे अटलजी कुठे? आणि एक संचालक कमी आहे म्हणून चार संचालक नियुक्त करणारे कुठे? असे विविध आशयाचे बॅनर पाहायला मिळत आहे.
- कोल्हापुरातील ऐतिहासिक मोर्चावर संपूर्ण राज्याचं लक्ष असणार आहे.कोल्हापूरकरांच्या विविध बॅनरने लक्ष वेधून घेतलं आहे. कोल्हापुरातील ऐतिहासिक दसरा चौकामध्ये लावण्यात आलेले पोस्टर्स सुद्धा चांगलेच लक्ष वेधून घेताय.
Follow Us





