मोठी बातमी! युद्धविराम होताच चीनचा भारताला मोठा धक्का, पुन्हा पाठीत खंजीत खुपसला, संतापजनक कृत्य
मोठी बातमी समोर येत आहे, एकीकडे अमेरिका आणि इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा झाल्यामुळे मध्य पूर्वेतील तणाव काहीसा कमी झाला आहे, मात्र त्यानंतर आता चीनने संतापजनक कृत्य केलं असून, भारताच्या पाठीत खंजीर खुपसल्याचं समोर आलं आहे.

अमेरिकेनं भारतावर टॅरिफ लावल्यानंतर भारताची चीन आणि रशियासोबत जवळीक वाढली होती. चीन आणि रशियाकडून भारतासाठी मैत्रीचा हात पुढे करण्यात आला होता. चीनने अमेरिकेच्या या धोरणाचा निषेध करताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर जोरदार टीका केली. जर अमेरिकेनं भारतीय मालावर टॅरिफ लावला असेल तर आमची बाजारपेठ भारतीय मालासाठी खुली आहे, असंही यावेळी चीनने म्हटलं . मात्र मैत्रीचं नाटक करत असलेल्या चीनने पुन्हा एकदा भारताच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. भारताला मोठा धक्का दिला आहे. चीनने पुन्हा एकदा अरुणाचलच्या मुद्द्यावरून विष वकलं आहे. आम्ही कधीच भारताच्या अरुणाचल प्रदेश राज्याला मान्यता दिली नाही असं चीनने म्हटलं आहे.
अरुणाचल प्रदेश हा जांगनान म्हणजेच दक्षिण तिबेट असल्याचं चीनने म्हटलं आहे. 10 एप्रिल रोजी चीनकडून अरुणाचल प्रदेशमधील 23 ठिकाणांना नवीन नावं देण्यात आली होती, यावर भारताकडून जोरदार आक्षेप घेण्यात आला होता. त्यावर प्रत्युत्तर देताना चीनने वादग्रस्त वस्तव्य केलं आहे. आम्ही कधीही अरुणाचलला मान्यता दिली नाही, जांगनान हे चीनच क्षेत्र आहे, असं चीनने म्हटलं आहे. 20217 पासून आतापर्यंत चीनने अनेकदा अरुणाचल प्रदेशमधील विविध ठिकाणांचं नाव बदलण्याचा प्रयत्न केला आहे.
चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता गुओ जियाकुन यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना मंगळवारी मोठं विधान केलं आहे. जांगनान हे चीनचं क्षेत्र आहे. भारतानं अवैध्यरित्या त्याची स्थापना केली आहे. अरुणाचल प्रदेशला आम्ही कधीच मान्यता दिली नाही. आम्ही अरुणाचल प्रदेशमधील काही ठिकाणांची नाव बदलली आहेत, असं यावेळी चीनच्या प्रवक्त्याने म्हटलं आहे. दरम्यान यामुळे आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. आधीच युद्धामुळे मध्यपूर्वेत मोठा तणाव निर्माण झाला आहे, त्यातच आता चीनमुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. दरम्यान यापूर्वी देखील अनेकदा अशा कुरापती चीनकडून करण्यात आल्या आहेत, ज्याचं जोरदार प्रत्युत्तर वेळोवेळी भारताकडून देण्यात आलं आहे. अनेकदा तोंडावर आपटून देखील चीनकडून अशा कुरापती सुरूच आहेत.