AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra SIR Deadline Extended : SIR प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी निवडणूक आयोगाकडून मुदतवाढ, महाराष्ट्राची अंतिम मतदार यादी या तारखेला होणार प्रसिद्ध

Maharashtra SIR Deadline Extended : राज्यातील SIR प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाकडून मुदतवाढ देण्यात आली आहे. प्रारूप यादी प्रसिद्ध झाल्यानंतर आपले नाव आणि मतदार यादीतील तपशील तपासण्याचे केंद्रीय निवडणूक आयोगाकडून मतदारांना आवाहन करण्यात आलं आहे.

Maharashtra SIR Deadline Extended : SIR प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी निवडणूक आयोगाकडून मुदतवाढ, महाराष्ट्राची अंतिम मतदार यादी या तारखेला होणार प्रसिद्ध
Voter List
| Updated on: Aug 05, 2026 | 8:15 AM
Share

राज्यातील SIR प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाकडून मुदतवाढ देण्यात आली आहे. अंतिम मुदत 17 ऑगस्टपर्यंत वाढवली आहे. सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रारूप मतदार यादी 24 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे. सर्व प्रक्रियेनंतर महाराष्ट्राची अंतिम मतदार यादी 27 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. नागरिकांना प्रारूप मतदार यादींवर २३ सप्टेंबरपर्यंत दावे आणि हरकती दाखल करता येणार आहेत. प्राप्त दावे-हरकतींवर नोटिसा बजावणे, किंवा सुनावणी घेणे आणि त्यांचा निपटारा करण्याची प्रक्रिया २२ ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार आहे. त्यामुळे प्रारूप यादी प्रसिद्ध झाल्यानंतर आपले नाव आणि मतदार यादीतील तपशील तपासण्याचे केंद्रीय निवडणूक आयोगाकडून मतदारांना आवाहन करण्यात आलं आहे. याआधी सुद्धा राज्यात विशेष सखोल मतदार यादी पुनरावलोकन प्रक्रियेला 8 दिवसांची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

यापूर्वी 19 ऑक्टोबर 2026 रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार होती. त्याआधी ही तारीख 7 ऑक्टोबर अशी होती. यापूर्वी ही प्रक्रिया 23 जुलैपर्यंत पूर्ण करण्यात येणार होती. या प्रक्रियेसाठी दहा दिवसांचा अतिरिक्त कालावधी वाढवण्यात आला होता. आता पुन्हा 17 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ मिळाली आहे. ही प्रक्रिया अधिक क्लिष्ट असल्याने त्यासाठी एक महिन्याची मुदत अपुरी असल्याचे विधान परिषद सदस्य सतेज पाटील यांनी म्हटले होते.राज्यातील एसआयआर प्रक्रियेला मुदतवाढ देण्याची मागणी करण्यात येत होती. मतदानाचा अधिकार अबाधित राखण्यासाठी SIR प्रक्रिया खूप महत्वाची आहे. याकडे आता दुर्लक्ष केल तर मतदानाचा अधिकार बजावताना फटका बसू शकतो.

एसआयआर प्रक्रियेला घटनात्मक मान्यता

सुप्रीम कोर्टाने एसआयआर प्रक्रियेला घटनात्मक मान्यता दिली आहे. निवडणूक आयोगाला एसआयआर करण्याचा पूर्ण अधिकार असल्याचा महत्त्वाचा निकाल कोर्टाने दिला. बिहार मतदार यादीत स्पेशल इन्टेसिव्ह रिव्हिजन (SIR) प्रकियेला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. मतदार याद्यांमध्ये मतदारांचे नाव जोडणे, ते वगळणे हे सर्व कामे निवडणूक आयोग घटनात्मक अधिकारातंर्गतच करत असल्याचे न्यायालयाने म्हटले होते. मतदार याद्यांमधील ही दुरुस्ती, संशोधन ही एक NRC सारखी प्रक्रिया असल्याचा आरोप याचिकाकर्त्यांनी केला होता. निवडणूक आयोग या प्रक्रियेमार्फत नागरिकत्वाचे परिक्षण करत आहे, हा अधिकार आयोगाचा नसून केंद्र सरकारचा आहे, असा युक्तीवाद याचिकाकर्त्यांतर्फे करण्यात आला होता.

Follow Us
MH-CET घोटाळ्याच्या ऑडिओ क्लिपवरून विक्रम पाचपुते आक्रमक; रोहित पवार..
MH-CET घोटाळ्याच्या ऑडिओ क्लिपवरून विक्रम पाचपुते आक्रमक; रोहित पवारांवरच केला आरोप!
देवगिरीवरील बैठकीबाबत सुनील तटकरे स्पष्टच बोलले! एकनाथ शिंदेंना विरोध
देवगिरीवरील बैठकीबाबत सुनील तटकरे स्पष्टच बोलले! एकनाथ शिंदेंना विरोध नाही, केवळ...
रोहित पवार FDA कार्यालयात; तुकाराम मुंढेंच्या भेटीला; कारण काय?
Rohit Pawar Met Tukaram Mundhe: रोहित पवार FDA कार्यालयात; तुकाराम मुंढेंच्या भेटीला; कारण काय?
KFC च्या म्हाताऱ्याने कोंबड्या वाचवा सांगण्यासारखं! राज ठाकरेंचा टोला
KFC च्या म्हाताऱ्याने कोंबड्या वाचवा सांगण्यासारखं! राज ठाकरेंचा भाजपला जोरदार टोला
जालन्यातील महिलांसाठी पुन्हा रॅम्प वॉक करेन! टीकेला पंकजा मुंडेंचं...
जालन्यातील महिलांसाठी पुन्हा रॅम्प वॉक करेन! टीकेला पंकजा मुंडेंचं सडेतोड उत्तर, म्हणाल्या...
पाच लाखांचा खर्च, अडीच एकरांची मोसंबी बाग वाळली; पाणीटंचाईने शेतकरी सं
Chhatrapati Sambhajianagar: पाच लाखांचा खर्च, अडीच एकरांची मोसंबी बाग वाळली; पाणीटंचाईने शेतकरी संकटात!
सातारा जिल्हा बँक निवडणुकीचे निकाल जाहीर होताच मोठी अपडेट समोर
Satara Bank Election: सातारा जिल्हा बँक निवडणुकीचे निकाल जाहीर होताच मोठी अपडेट समोर
अहिल्यानगर, सांगली, सातारा जिल्हा बँक निवडणुकीत कुठे आणि कोणी बाजी?
अहिल्यानगर, सांगली, सातारा जिल्हा बँक निवडणुकीत कुठे आणि कोणी बाजी मारली? A टू Z माहिती...
कल्याणमध्ये संतापजनक घटना! 'त्या' एका कारणावरून नवऱ्याने उकळतं मटण...
कल्याणमध्ये संतापजनक घटना! 'त्या' एका कारणावरून नवऱ्याने उकळतं मटण बायको आणि लेकावर फेकलं
जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत मोठा ट्विस्ट! NCP नेत्यांचा अर्ज बाद; नेमकी
जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत मोठा ट्विस्ट! NCP नेत्यांचा अर्ज बाद; नेमकी कोणाला संधी?