‘आम्ही तुमच्या सारख्या खोट्या कोरोना टेस्ट करत नाही’, केजरीवाल योगींवर भडकले

| Updated on: Dec 16, 2020 | 5:42 PM

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर भडकले आहेत (Arvind Kejriwal slams Yogi Adityanath).

आम्ही तुमच्या सारख्या खोट्या कोरोना टेस्ट करत नाही, केजरीवाल योगींवर भडकले
Follow us on

नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर भडकले आहेत (Arvind Kejriwal slams Yogi Adityanath). केजरीवाल यांनी ट्विटरवर योगींवर सडकून टीका केली. “योगी आदित्यनाथ यांना उठता-बसता दिल्ली सरकार आणि आम आदमी पक्ष दिसतो. कोरोना संकट काळात उत्तर प्रदेश सरकारकडून केल्या गेलेल्या कामांची चर्चा उत्तर प्रदेशच्या प्रत्येक गल्लीत होत आहे”, असं केजरीवाल म्हणाले.

केजरीवाल नेमकं काय म्हणाले?

“योगी आदित्यनाथ यांना उठता-बसता दिल्ली सरकार आणि आम आदमी पक्ष दिसतो. कोरोना संकट काळात आम्ही केलेल्या चांगल्या कामांची स्तुती उत्तर प्रदेशच्या प्रत्येक गल्लीत सुरु आहे. तुमच्या सारखं आम्ही कोरोना टेस्ट करत नाहीत. बाकी तुमच्या मंत्र्यांच्या आमंत्रणानंतर आम आदमी पक्षाचे नेते मनीष शिसोदिया 22 डिसेंबर रोजी लखनऊला डिबेटसाठी येत आहेत”, असं अरविंद केजरीवाल ट्विटरवर म्हणाले (Arvind Kejriwal slams Yogi Adityanath).

दरम्यान, योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशात सर्वाधिक कोरोना चाचण्या करण्यात आल्याचा दावा केला आहे. उत्तर प्रदेशात कोरोना पॉझिटिव्ह आणि मृत्यूदर सर्वात कमी आहे, असं ते म्हणाले.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशात आतापर्यंत 5 लाख 68 हजार 64 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यापैकी 8 हजार 103 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. उत्तर प्रदेशात आतापर्यंत 5 लाख 42 हजार रुग्ण ठिक झाले आहेत.

हेही वाचा : सुरक्षारक्षकाचा प्रामाणिकपणा, 24 लाख रुपयांनी भरलेली बॅग पोलिसांच्या स्वाधीन, पोलिसांकडून सत्कार