अश्विनी वैष्णव आणि जी किशन रेड्डी यांच्यात महत्त्वाची बैठक, भारतात लवकरच MEMU ट्रेन, नेमकी विशेषता काय?

केंद्रीय कोळसा आणि खाणमंत्री जी किशन रेड्डी आणि केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्यात मंगळवारी (24 जून) एक उच्चस्तरीय बैठक झाली.

अश्विनी वैष्णव आणि जी किशन रेड्डी यांच्यात महत्त्वाची बैठक, भारतात लवकरच MEMU ट्रेन, नेमकी विशेषता काय?
Ashwini Vaishnaw And G Kishan Reddy
| Updated on: Jun 25, 2025 | 4:14 PM

Ashwini Vaishnaw And G Kishan Reddy : केंद्रीय कोळसा आणि खाणमंत्री जी किशन रेड्डी आणि केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्यात मंगळवारी (24 जून) एक उच्चस्तरीय बैठक झाली. या बैठकीत साईल लोडिंगमध्ये पायाभूत सुविधा वाढवण्यावर चर्चा करण्यात आली. साईलो लोडिंग इन्फ्रास्टक्चरचा विकास झाल्यास कोळसा उत्खनन तसेच कोळशाची गुणवत्ता वाढवण्यास मदत होते.

कोळशाचा साठा सार्वकालिक उच्चाकांवर

गेल्या काही वर्षांत साईलो तंत्रज्ञानामुळे लोड करण्यात आलेला कोळसा 18.8 टक्क्यांवर (वर्षे 2022-23) टक्क्यांवरून थेट 29 टक्क्यांपर्यंत (वर्षे 2025-26) वाढला आहे. यावरून कोळशाच्या उत्खननात, उत्पादनात तसेच गुणवत्तेत झालेली सुधारण झाल्याचे समजते.
2025 सालापर्यंत सर्व औष्णिक वीज प्रकल्पांमधील कोळशाचा साठा 61.3 दशलक्ष टन या सर्वकालिक उच्चांकावर पोहोचला आहे. कोळशाच्या या विक्रमी साठ्यामुळे उर्जा क्षेत्राची सुरक्षा आणखी मजबूत झालेली आहे. कोळशाचा पुरेसा साठा असल्यामुळे पावसाळ्यात विजेच्या पुरवठ्यात खंड पडणार नाही.

लवकरच MEMU ट्रेन येणार?

अव्श्विी वैष्णव आणि जी किशन रेड्डी यांच्यात झालेल्या बैठकीत रेल्वे विभागाविषयीही चर्चा झाली. लघू आणि मध्यम पल्ल्याच्या प्रवासासाठी मेनलाईन इलेक्ट्रिक यूनिट रेल्वे (Mainline Electric Multiple Unit) चालू करण्याचा मानस असल्याचे अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं. या MEMU ट्रेनमध्ये 16 ते 20 कोचेस असतील. तसेच या रेल्वेंची निर्मिती तेलंगणातील काझीपेट येथील रेल मॅन्युफॅक्चरिंग युनिट (RMU) मध्ये तयार केल्या जातील, असेही अश्विनी वैष्णव यांनी सांगितले.