AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ayodhya Ram Mandir: अयोध्या राम मंदिरातील मुख्य पुजारीस किती आहे वेतन, कधीकाळी 100 रुपये होता पगार

Ayodhya Ram Mandir: राम मंदिरात आचार्य सत्येंद्र दास मुख्य पुजारी आहेत. त्यांच्यासह अन्य 13 पुजारी मंदिरात सेवा देत आहे. नुकतेच नऊ नवीन पुजाऱ्यांची नियुक्ती मंदिरात करण्यात आली. रामललाची मूर्ती टेंटमध्ये विराजमान असतानापासून आचार्य सत्येंद्र दास पुजारी म्हणून भगवतांची पूजा-अर्चना करत आहेत.

Ayodhya Ram Mandir: अयोध्या राम मंदिरातील मुख्य पुजारीस किती आहे वेतन, कधीकाळी 100 रुपये होता पगार
अयोध्या राम मंदिर
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Dec 22, 2024 | 2:15 PM
Share

Ayodhya Ram Mandir: उत्तर प्रदेशातील अयोध्यात राम मंदिराचा जीर्णोद्धार झाल्यापासून मंदिरात भाविकांची संख्या प्रचंड वाढली आहे. मंदिरात देशभरातून भाविक येत आहे. या राम मंदिरात मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास आहेत. ते आता 87 वर्षांचे झाले आहे. ते 34 वर्षांपासून राम मंदिरात मुख्य पुजारी आहे. आता त्यांना आजीवन वेतन मिळणार आहे. श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टतर्फे हा निर्णय घेण्यात आला आहे.

मंदिर ट्रस्टने सत्येंद्र दास यांनी मंदिराशी संबंधित कामातून निवृत्ती घेण्याचा आग्रह केला. तसेच सत्येंद्र दास जेव्हा पाहिजे तेव्हा मंदिरात येऊ शकतात आणि पूजाही करु शकतात. ट्रस्टच्या झालेल्या बैठकीत त्यांना आजीवन वेतन देण्याबाबत चर्चा झाली. बैठकीतील सर्वच सदस्यांनी त्याला संमती दिली.

34 वर्षांपासून मुख्य पुजारी

रामजन्मभूमीत 1 मार्च 1992 पासून आचार्य सत्येंद्र दास मुख्य अर्चक म्हणून सेवा देत आहे. सुरुवातीला त्यांचे वेतन खूपच कमी होते. त्यांना महिन्याला केवळ शंभर रुपये वेतन मिळत होते. आता सत्येंद्र दास यांना 38 हजार 500 रुपये महिन्याला वेतन मिळत आहे.

मंदिरात नवीन नऊ पुजारी

राम मंदिरात आचार्य सत्येंद्र दास मुख्य पुजारी आहेत. त्यांच्यासह अन्य 13 पुजारी मंदिरात सेवा देत आहे. नुकतेच नऊ नवीन पुजाऱ्यांची नियुक्ती मंदिरात करण्यात आली. रामललाची मूर्ती टेंटमध्ये विराजमान असतानापासून आचार्य सत्येंद्र दास पुजारी म्हणून भगवतांची पूजा-अर्चना करत आहेत. राम मंदिराची प्राणप्रतिष्ठा 22 जानेवरी 2024 रोजी झाली होती. त्यावेळीही सत्येंद्र दासच राम मंदिराचे मुख्य पुजारी होते.

सत्येंद्र दास यांनी सांगितले की, ट्रस्टचे सदस्य मला भेटले. आरोग्य आणि वाढत्या वयामुळे त्यांनी राम मंदिराच्या कामातून निवृत्ती घेण्याचा आग्रह केला आहे. त्यांनी आजीवन वेतन देण्याचे म्हटले आहे. आचार्य सत्येंद्र दास यांची गणना संस्कृतच्या प्रकांड विद्वानांमध्ये होते. त्यांनी 1975 मध्ये संस्कृत विद्यालयातून आचार्याची पदवी घेतली होती. 1976 मध्ये अयोध्यातील संस्कृत महाविद्यालय ते प्राध्यापक झाले होते.

Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?