आदिवासी मंत्रालयाने लाँच केले ‘आदी वाणी’चे बीटा संस्करण, पहिले आदिवासी भाषांचे एआय आधारित भाषांतर App

आदिवासी व्यवहार मंत्रालयाने आदिवासी भाषांसाठी भारतातील पहिले एआय आधारित अनुवादक 'आदि वाणी' ची बीटा आवृत्ती लाँच केली आहे.

आदिवासी मंत्रालयाने लाँच केले ‘आदी वाणी’चे बीटा संस्करण, पहिले आदिवासी भाषांचे एआय आधारित भाषांतर App
आदिवासी व्यवहार राज्यमंत्री दुर्गादास उइके
| Updated on: Sep 01, 2025 | 8:41 PM

नवी दिल्ली: विविध जाती-जमातींचे सशक्तीकरण आणि भाषीय संरक्षणाच्या दिशेने एक ऐतिहासिक पाऊल उचलत आता आदिवासी मंत्रालयाने आज ‘आदि वाणी’ च्या बिटा आवृत्तीचा शुभारंभ केला आहे. ‘आदि वाणी’ हे भारतातील पहिल्या आदीवासी भाषांसाठीचे एक एआय ( कृत्रिम बुद्धिमत्ता ) आधारित भाषांतराचे माध्यम आहे. हा कार्यक्रम नवी दिल्ली येथील डॉ.आंबेडकर इंटरनॅशनल सेंटरच्या समरसता हॉलमध्ये आदिवासी गौरव वर्षे (JJGV)अंतर्गत आयोजित केला होता.

या कार्यकमाचे उद्घाटन दीप प्रज्वलित करुन आदिवासी व्यवहार राज्यमंत्री दुर्गादास उइके यांनी केले. याप्रसंगी आदिवासी व्यवहार मंत्रालयाचे सचिव विभू नायर, आयआयटी दिल्लीचे संचालक रंगन बॅनर्जी, संयुक्त सचिव अनंत प्रकाश पांडे, मंत्रालयाच्या संचालक दीपाली मासिरकर, बीबीएमसी सेल- आयआयटी दिल्लीचे प्रोफेसर विवेक कुमार, तसेच आयआयटी दिल्लीचे एसोसिएट प्रोफेसर संदीप कुमार आदी उपस्थित होते. तसेच सर्व राज्यातील जमाती संशोधन संस्था (TRIs) आणि जमाती भाषांचे तज्ज्ञांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला.

भाषा ही संस्कृतीच्या ओळखीचा पाया आहे आणि समुदायांना जोडण्यात महत्वपूर्ण भूमिका निभावते असे यावेळी आदिवासी व्यवहार राज्यमंत्री दुर्गादास उइके यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की ‘आदि वाणी’मुळे दुर्गम भागात राहणाऱ्या समुदायांना संवादाची सुविधा मिळेल,तसेच विविध जाती- जमातीच्या युवकांना डिजिटल रुपाने सशक्त केले जाऊ शकणार आहे. तसेच आदी कर्मयोगी ढाच्याने अंतर्गत सेवांमुळे अंतिम स्तरापर्यंत पोहचता येणार आहे.

हा अत्यंत काटकसरीने केलेला नवा उपक्रम असून जो अन्य व्यापारी प्लॅटफॉर्मच्या तुलनेत दहा पट कमी खर्चात तयार केलेला असल्याचे आदिवासी कार्य मंत्रालयाचे सचिव विभू नायर यांनी सांगितले. ते म्हणाले की या योजनेत अत्याधुनिक तंत्राला राज्य TRIs द्वारा एकत्रित वास्तविक भाषा डेटासोबत जोडलेले आहे. यात फिडबॅक सिस्टीमचा देखील समावेश आहे. त्यामुळे सामुदायिक भागीदारीतून यात आणखी सुधारणा करणे शक्य होणार आहे.

एआयचा वापर कशा प्रकारे भाषां, संस्कृती आणि परंपरांचे संरक्षणासाठी प्रभावी ढंगाने होऊ शकते आणि लोकांच्या जीवनात कसा सार्थक बदल घडवू शकते याचा आदिवाणी हे एक उत्तम उदाहरण असल्याचे आयआयटी दिल्लीचे संचालक प्रो.रंगन बॅनर्जी यांनी सांगितले.

भाषा संपल्याने संस्कृती आणि वारसा देखील नष्ट होतो असे संयुक्त सचिव अनंत प्रकाश पांडे यांनी आपल्या भाषणात सांगितले. ते पुढे म्हणाले की ‘आदि वाणी’ केंद्र सरकार, राज्य सरकार आणि प्रमुख तांत्रिक संस्थांच्या दरम्यान एकत्र प्रयत्नांचा परिणाम आहे. जो कमी खर्चात उच्च प्रभावाचे समाधान देऊ शकतो.

‘आदि वाणी’ संदर्भात माहिती

‘आदि वाणी’ हे केवळ एक एआय भाषांतर करणारे ऐप नसून ते एक असे व्यासपीठ आहे जे सांस्कृतिक ओळख संरक्षित करते. ही पाऊल लुप्तप्राय भाषांचे डिजिटलीकरण, मूळ भाषेत शिक्षण, आरोग्य आणि शासनातपर्यंत पोहचणे, जमातींना उद्योगांसाठी प्रोत्साहन देणे, आणि संशोधकांना ज्ञान प्रदान करण्यासाठी सहायक ठरणार आहे.

हे व्यासपीठ आयआयटी दिल्ली, बिट्स पिलानी, आयआयआयटी हैदराबाद, आयआयआयटी नवा रायपूर आणि झारखंड, ओडिशा, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि मेघालयाच्या आदिवासी संशोधन संस्था (टीआरआय) यांचा समावेश असलेल्या राष्ट्रीय संघाने विकसित केले आहे

येथे उपलब्ध असणार

वेब पोर्टल (https://adivaani.tribal.gov.in ) वर ‘आदि वाणी’ चे बीटा संस्करण उपलब्ध आहे. आणि या ऐपचे बीटा संस्करण लवकरच प्ले स्टोर आणि iOS वर देखील उपलब्ध होणार आहे. सध्या संताली (ओडिशा), भीली (मध्य प्रदेश), मुंडारी (झारखंड) आणि गोंडी (छत्तीसगड ) या भाषांचे भाषांतर करते. त्यानंतर लवकरच कुई आणि गारो भाषांची भाषांतराची सोय होणार आहे.

प्रमुख वैशिष्ट्ये

हिंदी, इंग्रजी आणि आदिवासी भाषा दरम्यान रीअल-टाईम टेक्स्ट आणि स्पीच भाषांतर करणे शक्य

विद्यार्थी आणि प्रशिक्षण घेणाऱ्या शिक्षकांसाठी इंटरएक्टीव भाषा शिक्षण मॉड्यूल

लोककथा, मौखिक परंपरा आणि सांस्कृतिक वारशाचे डिजिटलीकरण

आरोग्य सल्ला आणि पंतप्रधान यांची भाषण सारख्या सरकारी संदेशाचे सबटायटल आदिवासी भाषेत दिसणार