भूपेंद्र पटेलांची मुख्यमंत्रीपदी वर्णी कशी लागली?, दिल्लीत स्क्रिप्ट लिहिली, अहमदाबादेत वाचन?; वाचा सविस्तर

राज्यातील बड्या नेत्यांवर मात करत अखेर भूपेंद्र पटेल यांनी राज्याचं मुख्यमंत्रीपद स्वत:कडे खेचून आणलं आहे. पहिल्यांदाच आमदार झालेले असताना आणि संसदीय कामकाजाचा फारसा अनुभव नसतानाही पटेल यांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ टाकण्यात आली आहे. (Bhupendra Patel)

भूपेंद्र पटेलांची मुख्यमंत्रीपदी वर्णी कशी लागली?, दिल्लीत स्क्रिप्ट लिहिली, अहमदाबादेत वाचन?; वाचा सविस्तर
Bhupendra Patel
Follow us
| Updated on: Sep 12, 2021 | 7:14 PM

अहमदाबाद: राज्यातील बड्या नेत्यांवर मात करत अखेर भूपेंद्र पटेल यांनी राज्याचं मुख्यमंत्रीपद स्वत:कडे खेचून आणलं आहे. पहिल्यांदाच आमदार झालेले असताना आणि संसदीय कामकाजाचा फारसा अनुभव नसतानाही पटेल यांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ टाकण्यात आली आहे. भूपेंद्र पटेल यांच्याकडे असलेला निगर्वीपणा, इतर नेत्यांना असलेली मुख्यमंत्रीपदाची आस, पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुका, जातीय समीकरणे आदी कारणांमुळे पटेल यांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडल्याचं सांगितलं जातं. (Bhupendra Patel: First-time MLA, Builder by Profession, Who Never Held Ministerial Post)

बिल्डर ते लीडर

भूपेंद्र पटेल हे गुजरातच्या घाटलोडिया विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदार आहेत. ते पाटीदार समाजाचे नेते आहेत. त्यांचं पाटीदार समाजावर वर्चस्व आहे. पटेल हे 59 वर्षाचे आहेत. ते अहमदाबादच्या शिलाज येथील रहिवासी आहेत. त्यांनी सिव्हील इंजीनियरिंगचा डिप्लोमा केला आहे. ते व्यवसायाने बिल्डर आहेत. विशेष म्हणजे ते पहिल्यांदाच आमदार झाले असून त्यांनी कधीही मंत्रीपद भूषविलेले नाही.

स्थायी समिती अध्यक्ष ते मुख्यमंत्री

भूपेंद्र पटेल हे गेल्या अनेक वर्षापासून राजकारणात आहेत. सामाजिक आणि राजकीय चळवळीत त्यांचा सहभाग राहिला आहे. 1999-2000मध्ये ते मेमनगर नगरपालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष होते. 2010 ते 2015 पर्यंत ते थलतेज वॉर्डातून नगरसेवक म्हणून निवडून आले होते. 2015-17मध्ये ते अहमदाबाद शहरी विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष होते. तसेच 2008-10 मध्ये ते एएमसी स्कूल बोर्डाचे उपाध्यक्ष होते. गेल्या विधानसभा निवडणुकीत ते मैदानात उतरले होते. यावेळी त्यांनी पहिल्यांदा विजय मिळवला होता. त्यानंतर साडे तीन वर्षानंतर त्यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. ते पटेल संघटनांच्या सरदार धाम आणि विश्व उमिया फाऊंडेशनचे ट्रस्टीही आहेत. त्यांना मुख्यमंत्री केल्याने ते पाटीदार समाजाला आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी मोठी भूमिका निभावू शकतात.

मतदारसंघातील ‘दादा’

ते घटलोडिया विधानसभा मतदारसंघातून 1 लाख 17 हजार मताने विजयी झाले आहेत. त्यांची संघटनेवर आणि मतदारसंघावर चांगली पकड आहे. मतदारसंघातील लोकप्रिय नेते म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांना मतदारसंघात ‘दादा’ म्हणून ओळखले जाते.

पटेल ते पटेल

भूपेंद्र पटेल ज्या घटलोडिया मतदारसंघातील आमदार आहेत, त्या मतदारसंघातून या पूर्वी माजी मुख्यमंत्री आणि यूपीच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल निवडणूक लढवायच्या. आनंदीबेन पटेल यांचे निकटवर्तीय म्हणूनही ते ओळखले जातात. तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे अत्यंत खास म्हणूनही ते ओळखले जातात.

या नेत्यांना पछाडलं

रुपाणी यांनी राजीनामा दिल्यानंतर मुख्यमंत्रीपदासाठी अनेक नावांची चर्चा सुरू झाली होती. नितीन पटेल, मनसुख मांडविया, आर. सी. पाटील आणि पुरुषोत्तम रुपाला यांची नावे मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत होती. या दिग्गज नेत्यांपैकी एकाला मुख्यमंत्रीपदाची सूत्रे दिली जातील अशी चर्चा होती. मात्र, भाजपने पुन्हा एकदा नवा चेहरा देऊन सर्वांना धक्का दिला आहे. उत्तराखंडमध्येही भाजपने असंच धक्कातंत्र वापरलं होतं. तीरथ सिंह रावत यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर भाजपने पुष्करसिंह धामी या नव्या चेहऱ्याला संधी देऊन सर्वांना कोड्यात टाकलं होतं. तेच गुजरातमध्ये घडलं.

एकाच नेत्याला माहीत होतं

2022मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने भूपेंद्र पटेल यांच्याकडे जबाबदारी सोपवली आहे. मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत पटेल यांचं नाव नव्हतं. भाजपचे खासदार भूपेंद्र यादव हे मोदी-शहांचा दिल्लीतील निरोप घेऊन भाजपच्या अहमदाबादमधील कमलम या कार्यालयात आले होते. त्यांनाच फक्त भूपेंद्र पटेल मुख्यमंत्री होणार असल्याचं माहीत होतं. एवढेच नव्हे तर विजय रुपाणी यांनाही पटेल मुख्यमंत्री होतील याची गंधवार्ता नव्हती.

दिल्लीत स्क्रिपट लिहिली, अहमदाबादेत घोषणा

भाजपने आज सर्व आमदारांची बैठक बोलावली होती. त्यात नव्या नेत्याच्या नावावर चर्चा करण्यात आली. पर्यवेक्षकांनी या सर्वांचं म्हणणं ऐकून घेतलं. विजय रुपाणी यांचंही मत जाणून घेण्यात आलं. मात्र, ही चर्चा केवळ औपचारिक होती. दिल्लीतून मुख्यमंत्रीपदाचं नाव ठरलं होतं. दिल्लीत स्क्रिप्ट लिहिल्या गेली. अहमदाबादेत ती वाचून दाखवण्यात आली.

भाजपला गड राखायचाय

गुजरात विधानसभा निवडणुकीला अवघे 15 महिने बाकी आहेत. पुढच्या वर्षी डिसेंबरमध्ये निवडणुका होण्याची शक्यता आहे. गुजरात हा नेहमीच भाजपचा गड राहिला आहे. त्यामुळे हा गड राखणे हे भाजप समोरचं आव्हान आहे. गेल्या निवडणुकीत भाजपला पाटीदार आंदोलन आणि काँग्रेसशी झुंज द्यावी लागली होती. यावेळी निवडणूक सोपी व्हावी, अधिक आव्हाने राहू नयेत म्हणून राज्याच्या प्रमुखपदी पटेल समाजातील नेता असणं महत्त्वाचं होतं. त्यामुळेच भाजपने भूपेंद्र पटेल यांना मैदानात उतरवलं आहे. पाटीदार समाजाला आपल्याकडे खेचण्याचा भाजपचा हा एक प्रकार आहे, असं सांगण्यात येतं.

व्होटबँकेसाठी कायपण

पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्वाधिक काळ गुजरातचे मुख्यमंत्री होते. त्यानंतर ते केंद्राच्या राजकारणात आले. मात्र, जाताना त्यांनी आनंदीबेन पटेल यांना मुख्यमंत्रीपदी बसवले. त्यामुळे आनंदीबेन पटेल या गुजरातच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री बनल्या. त्यानंतर काही काळाने आनंदीबेन यांना हटवून विजय रुपाणी यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाची सूत्रे देण्यात आली. सध्या गुजरातमध्ये सरकार बनविण्यात पाटीदार समाजाची महत्त्वाची भूमिका राहिली आहे. पाटीदार आंदोलनामुळे हार्दिक पटेल हे नेते म्हणून उदयास आले. त्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने भाजपचं मोठं नुकसान झालं. बीबीसीच्या एका अहवालानुसार राज्याच्या एकूण लोकसंख्येपैकी पाटीदार समाजाची लोकसंख्या 14 टक्के आहे. तसेच पाटीदार समाजातील एकूण मतदार 21 टक्के आहेत. राज्यात या समाजातील अनेक आमदार आहेत. भाजपने आता पाटीदार समाजातून आलेल्या पटेलांकडे मुख्यमंत्रीपदाची सूत्रे दिली आहेत. भाजपचं हे मोठं पाऊल असून पाटीदार समाज आपल्याकडे वळवण्यासाठी टाकलेला हा डाव असल्याचं राजकीय विश्लेषक सांगतात. (Bhupendra Patel: First-time MLA, Builder by Profession, Who Never Held Ministerial Post)

संबंधित बातम्या:

पहिल्यांदाच आमदार झाले आणि थेट मुख्यमंत्रीच, कोण आहेत भूपेंद्र पटेल?

अमित शहा आले, बैठका घेतल्या आणि रुपाणी गेले; ‘त्या’ रात्री काय घडलं?, वाचा सविस्तर

Bhupendra Patel | भूपेंद्र पटेल होणार गुजरातचे नवे मुख्यमंत्री, भाजपच्या बैठकीत निर्णय

(Bhupendra Patel: First-time MLA, Builder by Profession, Who Never Held Ministerial Post)

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.