Bhupendra Patel | भूपेंद्र पटेल होणार गुजरातचे नवे मुख्यमंत्री, भाजपच्या बैठकीत निर्णय

Bhupendra Patel | गुजरातच्या मुख्यमंत्रिपदासाठी भूपेंद्र पटेल यांनी निवड करण्यात आली आहे. भाजप नेते विजय रुपाणी यांनी राजीनामा दिल्यानंतर गुजरातच्या मुख्यमंत्रिपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याची उत्सुकता सर्वांनाच लागली होती.

Bhupendra Patel | भूपेंद्र पटेल होणार गुजरातचे नवे मुख्यमंत्री, भाजपच्या बैठकीत निर्णय
Bhupendra Patel
Follow us
| Updated on: Sep 12, 2021 | 4:57 PM

गांधीनगर : गुजरातच्या मुख्यमंत्रिपदासाठी भूपेंद्र पटेल (Bhupendra Patel) यांची निवड करण्यात आली आहे. भाजप नेते विजय रुपाणी यांनी राजीनामा दिल्यानंतर गुजरातच्या मुख्यमंत्रिपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याची उत्सुकता सर्वांनाच लागली होती. मुख्यमंत्रिपदाचा कारभार नेमका कोणाकडे सोपवला जाईल हे ताडण्यासाठी राजकीय जाणकारांकडून अनेक तर्कवितर्क लावले जात होते. या सर्व चर्चांच्या पार्श्वभूमीवर गुजरातच्या नव्या मुख्यमंत्र्याची निवड करण्यासाठी भाजपच्या विधिमंडळ सदस्यांची आज बैठक झाली. या बैठकीत भूपेंद्र पटेल यांच्या नावावर एकमत झालं. आता पटेल मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असून त्याची कार्यक्रमपत्रिका लवकरच जाहीर केली जाणार आहे. (bhupendra patel to be next cm of gujrat after resignation of vijay rupani)

भूपेंद्र पटेल आनंदीबेन पटेल यांच्या जवळचे

नव्या मुख्यमंत्र्याची निवड करण्यासाठी भाजपच्या विधिमंडळ सदस्यांची आज बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत भूपेंद्र पटे यांच्या नावावर सर्वांचे एकमत झाले. गांधीनगरमध्ये भाजप कार्यालायात ही बैठक आयोजित आली होती. भूपेंद्र पटेल हे घरलोदिया येथून आमदार आहेत आणि माजी मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांच्या जवळचे समजले जातात. भूपेंद्र पटेल यांनी अहमदाबाद महापालिकेच्या स्थायी समितीचं सभापती म्हणून देखील काम पाहिलं आहे. भूपेंद्र पटेल हे शहरी भागातून येतात.

पुन्हा पटेल मुख्यमंत्री

माजी मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांच्याच मतदारसंघातून भूपेंद्र पटेल हे विक्रमी मतांनी निवडूण आलेत. गुजरातमध्ये पुन्हा एकदा भाजपानं पटेल मुख्यमंत्री दिलेला आहे. हार्दीक पटेलच्या नेतृत्वात पाटीदार समाजानं आंदोलन केल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांना हटवून रुपाणींना मुख्यमंत्री केलं होतं. त्यावेळेसही पुन्हा पाटीदारच मुख्यमंत्री केला जाईल अशी चर्चा होती पण केलं रुपाणींना. ते जैन समाजातून येतात. आता त्यांना हटवून पुन्हा पाटीदार समाजाचा मुख्यमंत्री करण्यात आलाय. कोरोनाच्या काळात रुपाणींच्या नेतृत्व तोकडं पडल्याची टीका झाली. त्यातच भाजपला 99 जागांच्या फेऱ्याची भीती वाटतेय. त्यामुळेच रुपाणींना हटवून पुन्हा पटेल बहुल गुजरातला पटेलच मुख्यमंत्री दिला गेलाय.

विजय रुपाणी यांचा राजीनामा

विजय रुपाणी यांनी गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाचा काल (11 सप्टेंबर) राजीनामा दिला. रुपाणी यांनी राजीनामा दिल्यानंतर गुजरातमध्ये एकच खळबळ उडाली होती. पत्रकार परिषद घेऊन आपण राजीनामा देत आहोत, हे त्यांनी जाहीर केले होते. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांचे आभार मानले होते.

भूपेंद्र पटेलांसमोर आव्हान

मुख्यमंत्री म्हणून जरी भूपेंद्र पटेल यांची निवड झाली असली तरी त्यांच्यासमोरचं आव्हान लहान नाही. गुजरातमध्ये सुरतसह अनेक ठिकाणी केजरीवालांच्या आपनं भाजपसमोर तगडं आव्हान उभं केलंय. दुसरीकडे मागच्या वेळेसच काँग्रेसनं भाजपला चांगलंच खिंडीत पकडलं होतं. त्यामुळेच भाजप 99 जागांच्या फेऱ्यात अडकली. यावेळेस तर गुजरातमध्ये बदलाचे वारे वाहतायत. सत्ताविरोधी वातावरण असल्याची चुणूक काही सर्वेतून दिसून आलीय. गुजरातमध्ये भाजपची दोन दशकांपासून सत्ता आहे. त्यामुळे भाजपविरोधी काही वातावरण असू शकतं. अशा परिस्थितीतच भाजपची सत्ता राखण्याचं मोठं आव्हान भूपेंद्र पटेल यांच्यासमोर असेल. अर्थातच पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी भूपेंद्र पटेलांच्या बाजूनं वजन टाकल्याशिवाय हे शक्यही झालं नसणार. त्यामुळेच गुजरातमध्ये पुढच्या दीड वर्षात काय काय घडेल हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

भाजपचं पुन्हा धक्कातंत्र

गुजरातचा मुख्यमंत्री निवडताना भाजपानं पुन्हा एकदा धक्कातंत्र अवलंबलय. कारण मुख्यमंत्रीपदासाठी केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय, उपमुख्यमंत्री राहिलेले नितीन पटेल, पुरुषोत्तम रुपाला, प्रफुल्ल पटेल असे अनेक चर्चेतले नावं चर्चेत होते. शेवटी या नावांची फक्त चर्चाच ठरलीय. कारण भाजपनं एकदम नवा चेहरा मुख्यमंत्री म्हणून दिलाय आणि तो म्हणजे भूपेंद्र पटेल. पटेल यांचं नाव एकदाही चर्चेत आलं नाही. कुणी त्यांच्या नावाची चर्चाही केली नाही. त्यामुळे भूपेंद्र पटेल यांचं नाव येताच भाजपनं धक्कातंत्र अवलंबल्याचं सिद्ध होतंय. कर्नाटकहीमध्येही असच झालेलं होतं.

मंत्रीही बदलले जाणार?

भाजप गुजरातमध्ये नवा गडी नवा डाव करण्याच्या तयारीत  आहे. कारण मुख्यमंत्री बदलला तर मंत्रिमंडळातही मोठे बदल केले जाण्याची शक्यता आहे. कारण काही जुन्या मंत्र्यांना हटवून नव्या चेहऱ्यांना मंत्री केलं जाण्याची शक्यता आहे. त्यामुळेच जुन्या मुख्यमंत्र्यांसोबत काही मंत्री घरी जाण्याची शक्यता वर्तवली जातेय. अशी चर्चा आहे की, आरएसएसनं एक सिक्रेट सर्वे केला होता आणि त्यात रुपाणींच्या नेतृत्वात सत्ता राखणं शक्य नसल्याचं दिसून आलं होतं. काँग्रेस नेते हार्दिक पटेल यांनीही या सर्वेबाबत भाष्य केलं होतं. त्याच सर्वेच्या आधारावर मंत्रिमंडळातही मोठे बदल असतील असा अंदाज व्यक्त केला जातोय.

(bhupendra patel to be next cm of gujrat after resignation of vijay rupani)

इतर बातम्या :

गुजरात भाजपात नितीन पटेलांची बंडाची भाषा? नव्या मुख्यमंत्र्याबाबत मोठं वक्तव्य, वाचा का ट्रेंड होतंय #Nitin

भाजपात खांदेपालट, आपमध्येही मोठी घडामोड, पंजाब, गुजरात,उत्तराखंडमध्ये भाजप विरुद्ध आप?

अमित शहा आले, बैठका घेतल्या आणि रुपाणी गेले; ‘त्या’ रात्री काय घडलं?, वाचा सविस्तर

Non Stop LIVE Update
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.