AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पहिल्यांदाच आमदार झाले आणि थेट मुख्यमंत्रीच, कोण आहेत भूपेंद्र पटेल?

भाजपचे ज्येष्ठ नेते विजय रुपाणी यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर भूपेंद्र पटेल यांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडली आहे. (Who is Bhupendra Patel, Gujarat CM, first-time MLA and minister?)

पहिल्यांदाच आमदार झाले आणि थेट मुख्यमंत्रीच, कोण आहेत भूपेंद्र पटेल?
Bhupendra Patel
| Edited By: | Updated on: Sep 12, 2021 | 6:25 PM
Share

अहमदाबाद: भाजपचे ज्येष्ठ नेते विजय रुपाणी यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर भूपेंद्र पटेल यांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडली आहे. उत्तराखंडप्रमाणेच गुजरातमध्येही भाजपने धक्का तंत्राचा वापर करत पहिल्यांदाच आमदार म्हणून निवडून आलेल्या पटेल यांना मुख्यमंत्री बनविले आहे. ज्येष्ठ नेते नितीन पटेल हे दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत होते. मात्र, तरीही भाजपने भूपेंद्र पटेल यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याने राजकीय निरीक्षकही चक्रावून गेले आहेत. (Who is Bhupendra Patel, Gujarat CM, first-time MLA and minister?)

कोण आहेत भूपेंद्र पटेल?

भूपेंद्र पटेल हे गुजरातच्या घाटलोडिया विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदार आहेत. ते पाटीदार समाजाचे नेते आहेत. पटेल हे 59 वर्षाचे आहेत. ते अहमदाबादच्या शिलाज येथील रहिवासी आहेत. त्यांनी सिव्हील इंजीनियरिंगचा डिप्लोमा केला आहे.

लॉटरी लागली

भूपेंद्र पटेल हे गेल्या अनेक वर्षापासून राजकारणात आहेत. सामाजिक आणि राजकीय चळवळीत त्यांचा सहभाग राहिला आहे. 1999-2000मध्ये ते मेमनगर नगरपालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष होते. 2010 ते 2015 पर्यंत ते थलतेज वॉर्डातून नगरसेवक म्हणून निवडून आले होते.

2015-17मध्ये ते अहमदाबाद शहरी विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष होते. तसेच 2008-10 मध्ये ते एएमसी स्कूल बोर्डाचे उपाध्यक्ष होते. गेल्या विधानसभा निवडणुकीत ते मैदानात उतरले होते. यावेळी त्यांनी पहिल्यांदा विजय मिळवला होता. त्यानंतर साडे तीन वर्षानंतर त्यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. ते पटेल संघटनांच्या सरदार धाम आणि विश्व उमिया फाऊंडेशनचे ट्रस्टीही आहेत. त्यांना मुख्यमंत्री केल्याने ते पाटीदार समाजाला आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी मोठी भूमिका निभावू शकतात.

मिशन पाटीदार

गुजरात विधानसभा निवडणुकीला अवघे 15 महिने बाकी आहेत. पुढच्या वर्षी डिसेंबरमध्ये निवडणुका होण्याची शक्यता आहे. गुजरात हा नेहमीच भाजपचा गड राहिला आहे. त्यामुळे हा गड राखणे हे भाजप समोरचं आव्हान आहे. गेल्या निवडणुकीत भाजपला पाटीदार आंदोलन आणि काँग्रेसशी झुंज द्यावी लागली होती. यावेळी निवडणूक सोपी व्हावी, अधिक आव्हाने राहू नयेत म्हणून राज्याच्या प्रमुखपदी पटेल समाजातील नेता असणं महत्त्वाचं होतं. त्यामुळेच भाजपने भूपेंद्र पटेल यांना मैदानात उतरवलं आहे. पाटीदार समाजाला आपल्याकडे खेचण्याचा भाजपचा हा एक प्रकार आहे, असं सांगण्यात येतं.

पाटीदारांचा महत्त्वाचा रोल

पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्वाधिक काळ गुजरातचे मुख्यमंत्री होते. त्यानंतर ते केंद्राच्या राजकारणात आले. मात्र, जाताना त्यांनी आनंदीबेन पटेल यांना मुख्यमंत्रीपदी बसवले. त्यामुळे आनंदीबेन पटेल या गुजरातच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री बनल्या. त्यानंतर काही काळाने आनंदीबेन यांना हटवून विजय रुपाणी यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाची सूत्रे देण्यात आली. सध्या गुजरातमध्ये सरकार बनविण्यात पाटीदार समाजाची महत्त्वाची भूमिका राहिली आहे.

पाटीदार आंदोलनामुळे हार्दिक पटेल हे नेते म्हणून उदयास आले. त्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने भाजपचं मोठं नुकसान झालं. बीबीसीच्या एका अहवालानुसार राज्याच्या एकूण लोकसंख्येपैकी पाटीदार समाजाची लोकसंख्या 14 टक्के आहे. तसेच पाटीदार समाजातील एकूण मतदार 21 टक्के आहेत. राज्यात या समाजातील अनेक आमदार आहेत. भाजपने आता पाटीदार समाजातून आलेल्या पटेलांकडे मुख्यमंत्रीपदाची सूत्रे दिली आहेत. भाजपचं हे मोठं पाऊल असून पाटीदार समाज आपल्याकडे वळवण्यासाठी टाकलेला हा डाव असल्याचं राजकीय विश्लेषक सांगतात. (Who is Bhupendra Patel, Gujarat CM, first-time MLA and minister?)

संबंधित बातम्या:

Bhupendra Patel | भूपेंद्र पटेल होणार गुजरातचे नवे मुख्यमंत्री, भाजपच्या बैठकीत निर्णय

गुजरात भाजपात नितीन पटेलांची बंडाची भाषा? नव्या मुख्यमंत्र्याबाबत मोठं वक्तव्य, वाचा का ट्रेंड होतंय #Nitin

अमित शहा आले, बैठका घेतल्या आणि रुपाणी गेले; ‘त्या’ रात्री काय घडलं?, वाचा सविस्तर

(Who is Bhupendra Patel, Gujarat CM, first-time MLA and minister?)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.