AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारताच्या ‘या’ गोष्टीवर टॅरिफ लावणार नाही, चीनची सर्वात मोठी घोषणा, डोनाल्ड ट्रम्प यांना जबर धक्का!

चीनने भारतासाठी मोठी घोषणा केली आहे. चीनने भारतीय फार्मा कंपन्यांवर टॅरिफ न लावण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का बसला आहे.

भारताच्या 'या' गोष्टीवर टॅरिफ लावणार नाही, चीनची सर्वात मोठी घोषणा, डोनाल्ड ट्रम्प यांना जबर धक्का!
modi-trump-and-jinping
| Updated on: Sep 29, 2025 | 9:54 PM
Share

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड यांनी काही दिवसांपूर्वी भारतीय औषध कंपन्यांवर 100% टॅरिफ लादण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे भारतीय फार्मा कंपन्यांना धक्का बसला होता. अशातच आता चीनने भारतासाठी मोठी घोषणा केली आहे. चीनने भारतीय फार्मा कंपन्यांवर टॅरिफ न लावण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का बसला आहे. कारण आता भारत चीनला औषधांची निर्यात करणार आहे, यासाठी भारतीय कंपन्यांना कोणतेही अतिरिक्त शुल्क मोजावे लागणार नाही. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

भारतीय फार्मा कंपन्यांवरील कर हटवला

चीनने भारतीय भारतीय फार्मा कंपन्यांवर 30 टक्के कर लादलेला होता, मात्र आता तो हटवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे भारतीय कंपन्यांना मोठा फायदा होणार आहे. एकीकडे अमेरिकेने औषधांवर 100 टक्के कर लावला असताना चीनने कर रद्द करण्याचा निर्णय घेणे हे ट्रम्पविरुद्ध उचललेले मोठे पाऊल मानले जात आहे. यामुळे भारतीय फार्मा उद्योग अडचणीत आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या ट्रम्प यांना मोठा धक्का बसला आहे.

भारत, चीन व रशिया अमेरिकेच्या विरोधात एकत्र

डोनाल्ड ट्रम्प यांच्या परदेशा धोरणांच्या विरोधात भारत, चीन आणि रशिया एससीओ शिखर परिषदेत एकत्र आले होते. तेव्हापासून हे तिन्ही देश अमेरिकेला अडचणीत आणण्याच्या योजना आखत आहेत. आता चीनने या दिशेने पाऊल उचलले आहे. चीनने भारतीय औषधांवरील शुल्क रद्द केले आहे. तसेच भारत ट्रम्प यांच्या धमक्यांना न घाबरता रशियन तेल खरेदी करत आहे. तसेच रशियाही अमेरिकेच्या दबावाला बळी न पडता युक्रेनविरुद्ध युद्ध लढत आहे. त्यामुळे ट्रम्प यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

भारतीय कंपन्यांना चीनमध्ये गुंतवणूक करण्याचे आवाहन

काही दिवसांपूर्वी चीनच्या राजदूतांनी भारताला भेट दिली होती. त्यानंतर परराष्ट्र मंत्री एस जयशंकर हेही चीनला गेले होते. त्यामुळे आता आगामी काळात दोन्ही देशांमधील व्यापार वाढण्याची शक्यता आहे. चिनी राजदूतांनी भारतीय कंपन्यांना चीनमध्ये गुंतवणूक करण्याचे आवाहन केले आहे. तसेच अमेरिकेने भारतावर लादलेल्या 50 टक्के कराचाही चीनने विरोध केला आहे. चीन सातत्याने भारताबाबत मवाळ भूमिका घेत आहे. आगामी काळात दोन्ही देशांमधील व्यापार आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांची चिता वाढू शकते.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...