AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! अमेरिका, इराणचा एकाचवेळी भारताला मोठा दणका, झोप उडवणार नवं संकट, अत्यंत वाईट बातमी

अमेरिका आणि इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा करण्यात आली आहे. मात्र तरी देखील मध्य पूर्वेतील तणाव अजून कमी झालेला नाहीये, आता एक मोठी बातमी समोर आली आहे, भारतासमोर मोठं संकट निर्माण झालं आहे.

मोठी बातमी! अमेरिका, इराणचा एकाचवेळी भारताला मोठा दणका, झोप उडवणार नवं संकट, अत्यंत वाईट बातमी
भारताला मोठा धक्का Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Apr 16, 2026 | 3:19 PM
Share

अमेरिका आणि इस्त्रायलमध्ये युद्धविरामाची घोषणा झाली आहे. मात्र अजूनही स्ट्रीट ऑफ होर्मूजचा तिढा सुटलेला नाहीये. युद्धविरामानंतर इस्त्रायलने तातडीने स्ट्रीट ऑफ होर्मूज सुरू करावा अशी अट अमेरिकेनं ठेवली होती. मात्र युद्धविरामाची घोषणा झाल्यानंतर देखील इराणने अमेरिकेची ही अट धुडकावून लावली आहे. स्ट्रीट ऑफ होर्मूजमधून एकादिवशी केवळ 15 चं जहाजं जातील असं इराणने म्हटलं आहे. एकीकडे इराणने स्ट्रीट ऑफ होर्मूजवर नियंत्रण मिळवलं आहे, तर दुसरीकडे आता डोनाल्ड ट्रम्प यांनी देखील मोठं पाऊल उचललं आहे, ट्रम्प यांनी या मार्गाने प्रवास करणाऱ्या जहाजांना प्रतिबंध केला आहे. त्यामुळे जगभरात मोठं संकट निर्माण झालं आहे. आता याचा भारतावर कितपत परिणाम होणार? असा सवाल सध्या उपस्थित करण्यात येत आहे.

भारत हा जगातील तिसरा सर्वात मोठा कच्च्या तेलाचा आयातदार देश आहे. भारत आपल्या गरजेच्या तब्बल 85 टक्के कच्च्या तेलाची आयात इतर देशांकडून करतो. भारत ज्या देशांकडून कच्च्या तेलाची आयात करतो, त्यामध्ये मोठ्या प्रमाणात आखाती देशांचा समावेश आहे. त्यामुळे मध्य पूर्वेत निर्माण झालेल्या या तणावाचा भारताच्या ऊर्जा क्षेत्रावर थेट परिणाम होत असल्याचं दिसून येत आहे. भारतामध्ये जेवढं तेल येत त्यातील सुमारे 40 टक्के तेल हे एकट्या स्ट्रीट ऑफ होर्मूजमधून येतं, त्यामुळे चिंता वाढली आहे.

परंतु एक दिलासादायक बाब म्हणजे इराणने भारतासारख्या अन्य काही देशांना स्ट्रीट ऑफ होर्मूजमधून जाण्याची परवानगी दिली आहे. मात्र इथे भारताला इराणच्या धोरणाचा फटका बसण्याची शक्यता आहे. कारण दिवसभरात फक्त 15 च जहाजांना या मार्गाने जाण्याची परावानगी देण्यात आली आहे. त्यामुळे भारताला युद्धापूर्वी ज्या क्षमतेनं कच्च्या तेलाचा आणि एलपीजी गॅसचा पुरवठा होत होता, त्यापेक्षा कितीतरी कमी पटीने पुरवठा सध्या सुरू आहे. हा भारतासाठी एक मोठा धक्का आहे, तर दुसरीकडे अमेरिकेनं देखील या सामुद्रधुनीमधून जाणाऱ्या जहाजांना बंदी घातली आहे. मात्र हे करत असताना अमेरिकेनं हे देखील स्पष्ट केलं आहे, की ही बंदी फक्त इराण पोर्टशी संबंधित असलेल्या जहाजांनाच असेल. मात्र इराण आणि अमेरिकेमुळे स्ट्रीट ऑफ होर्मूजमध्ये एवढा तणाव वाढला आहे की, या सामुद्रधुनीमधून तेलाची वाहतूक करण्याची रिस्क अनेक कंपन्या घेताना दिसून येत नाहीयेत.

मध्य पूर्वेत निर्माण झालेल्या तणामुळे युद्ध सुरू झाल्यानंतर कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे, ज्याचा थेट परिणाम हा भारतावर झाला आहे. भविष्यात पेट्रोल, डिझेलच्या किंमती वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही, तसेच कच्चा माल महाग झाल्याने अनेक वस्तूंचे दर देखील वाढले आहेत.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...