Operation Sindoor : मोठी बातमी! ऑपरेशन सिंदूर सुरूच, वायुसेनेची ती पोस्ट व्हायरल, काय आहे अपडेट?

Air Force Operation Sindoor Continues : भारत आणि पाकिस्तानमध्ये काल युद्ध विराम झाल्यानंतर आज भारतीय वायुसेनेच्या एका पोस्टने मोठी खळबळ उडवून दिली आहे. ऑपरेशन सिंदूर सुरूच राहणार असल्याचा दावा या पोस्टमध्ये करण्यात आला आहे.

Operation Sindoor : मोठी बातमी! ऑपरेशन सिंदूर सुरूच, वायुसेनेची ती पोस्ट व्हायरल, काय आहे अपडेट?
ऑपरेशन सिंदूर सुरूच
Image Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: May 11, 2025 | 2:28 PM

भारताच्या आक्रमक कारवाईनंतर पाकिस्तानने गुडघे टेकवले. अमेरिकेसह इतर देशांपुढे सपशेल लोटांगण घेत त्याने मध्यस्थी करण्याची गळ घातली. अखेर काल संध्याकाळी भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्ध विराम झाला. त्यानंतर आता थोड्यावेळापूर्वीच भारतीय वायुसेनेच्या एका पोस्टमुळे मोठी खळबळ उडाली आहे. तर या पोस्टने पाकिस्तानच्या पोटात सुद्धा गोळा आल्याशिवाय राहणार नाही. वायुसेनेने ट्विटर हँडलवर ऑपरेशन सिंदूर सुरूच राहणार असल्याचा दावा केला आहे.

पाकला धडकी भरवणारी ती पोस्ट

चार दिवसांच्या कारवाईनंतर पाकिस्तान घाबरून गेला होता. अखेर मित्र देशांच्या शब्दाला मान देत काल शनिवारी सीजफायर झाले. त्यानंतर भारतीय वायुसेनेने एक मोठे ट्विट केले आहे. त्यात ऑपरेशन सिंदूर अजूनही सुरूच असल्याचे सांगण्यात आले आहे. वायुसेनेच्या अधिकृत सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर याविषयीची माहिती देण्यात आली आहे. भारतीय वायुसेनेने ऑपरेशन सिंदूरचे लक्ष्य यशस्वीपणे पूर्ण करण्यात आले आहे. देशाच्या हितासाठी हे ऑपरेशन आक्रमकपणे राबवण्यात आले. अर्थात हे ऑपरेशन अजूनही सुरूच आहे. याविषयीची माहिती पुढे देण्यात येईल. कोणत्याही अफवा आणि अधिकृत नसलेल्या माहितीवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन वायुसेनेने केले आहे.

आज उच्च स्तरीय बैठक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली, त्यांच्या निवासस्थानी आज उच्चस्तरीय समितीची बैठक झाली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्यासह वरिष्ठ अधिकारी याठिकाणी हजर होते. ही बैठक भारत आणि पाकिस्तानमध्ये झालेल्या युद्ध विरामाच्या एका दिवसानंतर झाली. बैठकीत राष्ट्रीय सुरक्षा सल्ल्गार अजित डोभाल, संरक्षण प्रमुख जनरल अनिल चौहान आणि तीनही सैन्य दलाचे अधिकारी या बैठकीला हजर होते.