Jammu-Kashmir : काश्मीर प्रश्नात अमेरिका नाक खुपसणार? युद्धविराम केल्यानंतर डोनाल ट्रम्प यांचा काय मनसुबा, ते वक्तव्य का होतंय व्हायरल?
Donald Trump Mediation : तर भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धविराम झाला आहे. पाकने हातपाया पडल्यानंतर अमेरिकेने मध्यस्थीचे कार्ड टाकले आणि दोन्ही देशांमध्ये युद्ध विराम झाला. आता ट्रम्प हे काश्मीर मुद्दाला हात घालत असल्याचे संकेत मिळत आहेत. काय आहे त्यांचा मनसुबा?

भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई केल्यानंतर अवघ्या तीन दिवसानंतर पाकिस्तान गुडघ्यावर आला. पाकने भारताला कारवाई थांबवण्यासाठी संपर्क साधला तर दुसरीकडे अमेरिकच्या हातपाया पडला. त्यानंतर दोन्ही देशांनी काल संध्याकाळी 5 वाजता सीजफायर, युद्धविरामाची घोषणा केली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या युद्धविरामाची घोषणा करतानाच काश्मीर प्रश्नावर महत्त्वाचे भाष्य केले. त्यामुळे काश्मीर प्रश्नात ट्रम्प यांनी उडी घेतली का? त्यावर भारताची काय भूमिका आहे, यावरून देशात चर्चेला पेव फुटले आहेत.
डोनाल्ड ट्रम्प यांनी केले कौतुक
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी फळाला आहे. भारत आणि पाकिस्तानने युद्धाला विराम दिला. त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि पाकिस्तानच्या निर्णयाचे स्वागत केले. दोन्ही देशाच्या कणखर आणि दृढ नेतृत्वाचा मला खूप अभिमान असल्याचे ते म्हणाले. सध्याची आक्रमकता त्यांनी थांबवली. त्यामुळे अनेक चांगल्या आणि निरपराध, निष्पाप लोकांचा बळी जाण्यापासून वाचला. या लोकांच्या मृत्यूसाठी हे युद्ध कारणीभूत ठरले असते. ही बाब हेरण्याचा समजूतदारपणा आणि बुद्धिमत्ता आणि संयम दोन्ही देशांकडे असल्याचे कौतुक ट्रम्प यांनी केले.
काश्मीर प्रश्नात उडी घेणार?
भारत-पाकिस्तानमधील तणाव निवळल्यानंतर अमेरिकेने काश्मीर प्रश्न हळूच पुढ्यात आणला. काश्मीर प्रश्नासंबंधी समाधान काढता येऊ शकते. अमेरिका या ऐतिहासिक आणि धीरोदत्त निर्णयापर्यंत पोहचण्यासाठी दोन्ही देशाची मदत करण्यास तयार असल्याचा मला अभिमान असल्याचे सुतोवाच ट्रम्प यांनी केले. या दोन्ही देशात व्यापार वृद्धीसाठी चर्चा नसताना ही मी प्रयत्न करणार असल्याचे ट्रम्प म्हणाले. याशिवाय मी भारत आणि पाकिस्तानसोबत मिळून हजार वर्षांपासूनच्या काश्मीर विषयावर एखादे समाधान शोधता येते का, याविषयी काम करेल. देव भारत आणि पाकिस्तानच्या नेतृत्वाला चांगले काम केल्याबद्दल आशीर्वाद देवो, अशी प्रतिक्रिया ट्रम्प यांनी दिली.
ट्रम्प यांच्या या भूमिकेनंतर भारताची काश्मीरविषयक भूमिका बदलली का, याची चर्चा होत आहे. काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी केंद्र सरकारच्या भूमिकेवर तोंडसुख घेतले. केंद्राने दोन्ही देशाव्यतिरिक्त काश्मीर प्रश्नावर इतरांनी मध्यस्थी न करण्याचे धोरण सोडून दिले का, असा सवाल रमेश यांनी केला.