मोठी बातमी ! सौरव दास आणि आशुतोष रांका पुन्हा ताब्यात, दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई

दिल्ली पोलिसांनी आज पुन्हा एक मोठी कारवाई केली आहे. दिल्ली पोलिसांनी आशुतोष रांका, सौरव दास आणि अजिंक्य शिंदे या तिन्ही सीजेपीच्या नेत्यांना ताब्यात घेतलं आहे. त्यांच्यासोबत त्यांच्या सहकाऱ्यांनाही ताब्यात घेतलं आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली असून पोलिसांच्या या कारवाईचा निषेध केला जात आहे.

मोठी बातमी ! सौरव दास आणि आशुतोष रांका पुन्हा ताब्यात, दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई
Saurav Das and Ashutosh Ranka
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 13, 2026 | 10:09 AM

दिल्ली पोलिसांनी पुन्हा एकदा सर्वात मोठी कारवाई केली आहे. दिल्ली पोलिसांनी कॉकरोच जनता पार्टीचे नेते सौरव दास, अजिंक्य शिंदे आणि आशुतोष रांका यांना पुन्हा ताब्यात घेतलं आहे. हे तिघेही काही मित्रांसोबत जंतरमंतरवर आले होते. त्यावेळी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. गृहमंत्रालयाने जंतरमंतर परिसरात जाण्यापासून मज्जाव केलेला असताना आणि या परिसरात जमावबंदी लागू झालेली असतानाही हे तिघे घटनास्थळी आले होते. त्यामुळे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे.

आशुतोष रांका आणि सीजेपीने पोलिसांच्या या कारवाईचा व्हिडीओ शेअर केला आहे. यात सीजेपीचे नेते जंतरमंतरला पोहोचलेले दिसत आहेत. रांका यांचे अनेक समर्थक झेंडे घेऊन ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या घोषणा देताना दिसत आहे. त्यानंतर पोलीस या तरुणांची धरपकड करून व्हॅनमध्ये नेताना दिसत आहेत. दरम्यान, सरकारने आंदोलनाच्या यादीतून जंतरमंतरची जागा हटवली आहे. त्यावर सीजेपीने नाराजी व्यक्त केली आहे.

Loading...

 

दीपकेंचा हल्लाबोल

दरम्यान, अभिजीत दीपके यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. नरेंद्र मोदी हे घाबरले आहेत. त्यामुळेच त्यांनी आंदोलन स्थळाच्या यादीतून जंतरमंतरचं नाव हटवलं आहे. त्यांना वाटतंय की आता जंतरमंतर आंदोलनाचं स्थळ राहणार नाही. इथे आंदोलने होणं बंद होतील. पण तसं होणार नाही, असं अभिजीत दीपके यांनी म्हटलं आहे.

दिल्लीत काय घडलं?

अभिजीत दीपके यांनी आशुतोष रांकाचा फोटो शेअर करून पोस्ट केली आहे. जंतरमंतरवर तिरंगा फडकवताना आशुतोष रांका, असं दीपकेंनी यात म्हटलं आहे. दरम्यान, 10 ऑक्टोबर रोजी सीजेपीने आंदोलन करण्याचा निर्णय जाहीर केला होता. मात्र, आंदोलनाच्या दिवशी दिल्ली पोलिसांनी विमानात घुसून अभिजीत दीपके, सौरव दास आणि आशुतोष रांका यांना ताब्यात घेतलं होतं. त्यासोबतच त्या दोन दिवसात पोलिसांनी 7 हजाराहून अधिक कार्यकर्त्यांना अटक केली होती. त्यानंतर या सर्वांना सोडून दिलं होतं. नेत्यांना अटक केल्यानंतरही जंतरमंतरवर तरुणांनी मोठी गर्दी करत आंदोलन केलं होतं. यावेळी पोलिसांनी त्यांची धरपकड केली होती.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us