Uttrakhand : उत्तराखंडमध्ये बस दरीत कोसळली, 39 प्रवाशी जखमी; 8 जणांची प्रकृती चिंताजनक

| Updated on: Aug 07, 2022 | 6:23 PM

काही प्रत्यक्षदर्शींच्या मते चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला आहे. तर, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ब्रेक फेल झाल्यामुळे हा अपघात झाला आहे. ब्रेक फेल झाल्याने बस थेट पॅराफिट तोडत रस्त्याच्या खाली असलेल्या दुसऱ्या रस्त्यावर येऊन आदळली.

Uttrakhand : उत्तराखंडमध्ये बस दरीत कोसळली, 39 प्रवाशी जखमी; 8 जणांची प्रकृती चिंताजनक
उत्तराखंडमध्ये बस दरीत कोसळली, 39 प्रवाशी जखमी; 8 जणांची प्रकृती चिंताजनक
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

डेहराडून : उत्तराखंडमध्ये (Uttrakhand) आज एक मोठी दुर्घटना घडली. मसूरी डेहराडून रोडवर आयटीबीपीच्या (ITBP)जवळ राज्य परिवहनची एक बस दरीत कोसळली. सुदैवाने या दुर्घटनेत (Accident) कोणतीही जिवीत हानी झाली नाही. या बसमध्ये एकूण 39 प्रवासी प्रवास करत होते. त्यातील 31 जणांना किरकोळ मार लागला आहे. तर आठ प्रवासी गंभीर जखमी आहेत. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या भीषण अपघाताची माहिती मिळताच डेहराडूनच्या डीएम सोनिया सिंह यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थितीची माहिती घेतली. तसेच जिल्हा रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूसही केली. तसेच रुग्णांवर आवश्यक ते उपचार करण्याचे निर्देशही त्यांनी डॉक्टरांना दिले. तर, दुसरीकडे मसूरी पोलीस, फायर ब्रिगेडच्या टीमने रेस्क्यू ऑपरेशन सुरू केलं आहे. तसेच घटनास्थळी रुग्णवाहिका तैनात करण्यात आली असून जखमींची रुग्णवाहिकेतून ने आण केली जात आहे.

उत्तराखंडमध्ये गेल्या काही दिवसांपासून प्रचंड पाऊस सुरू आहे. अपघात झाला तेव्हाही प्रचंड पाऊस सुरू होता. त्यामुळे रेस्क्यू ऑपरेशन करण्यात अडचणी येत आहेत. मसूरी-डेहराडून रोडवर आयटीबीपी जवळ ही दुर्घटना घडल्याचं स्थानिकांनी सागितलं. बस अतिवेगाने येत होती. त्यामुळे चालकाचं बसवरील नियमंत्र सुटलं आणि बस थेट दरीत कोसळल्याचं स्थानिकांनी सांगितलं. हा अपघात झाल्याचं दिसताच आम्ही तात्काळ पोलिसांना माहिती दिली. बाजूलाच आयटीबीपीचा कँम्प होता. या कँम्पमधील जवानही घटनास्थळी पोहोचले. आयटीबापीचे जवान, पोलीस आणि फायर ब्रिगेडचे जवान रेस्क्यू ऑपरेशन करत आहेत.

हे सुद्धा वाचा

 

दहा रुग्ण आयटीबीपीच्या रुग्णालयात

या अपघातात जखमी झालेल्या दहा लोकांना आयटीबीपीच्या टीमने आयटीबीपीच्या रुग्णालयात दाखल केले. तर इतर जखमींना रुग्णवाहिकेतून मसूरी जिल्हा रुग्णालयात भरती केले. मसूरी जिल्हा रुग्णालयात उपाचर घेणाऱ्या आठ प्रवाशांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यामुळे त्यांना हायर सेंटर रुग्णालयात पाठवण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं.

अपघाताचं नक्की कारण काय?

दरम्यान, काही प्रत्यक्षदर्शींच्या मते चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला आहे. तर, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ब्रेक फेल झाल्यामुळे हा अपघात झाला आहे. ब्रेक फेल झाल्याने बस थेट पॅराफिट तोडत रस्त्याच्या खाली असलेल्या दुसऱ्या रस्त्यावर येऊन आदळली. त्यानंतर ही बस थेट दरीत कोसळली. त्यामुळे जोराचा आवाज झाला. बस दरीत कोसळल्याने प्रवासांच्या किंचाळण्याचा आवाजही येऊ लागल्याने स्थानिकांनी दरीच्या दिशेने धाव घेऊन अपघतात जखमी झालेल्यांना बसमधून बाहेर काढण्यास सुरुवात केली.