गर्लफ्रेन्डला भेटायला बॉयफ्रेन्ड रात्री गेला तिच्या घरी, कुटुंबियांनी पकडल्यानंतर जे केलं ते क्वचितच घडतं!

घटना 7 नोव्हेंबरची! प्रेयसीच्या घरी रात्री तिला भेटायला आलेल्या प्रियकराला घरातल्यांनी पकडलं, व्हिडीओही काढला

गर्लफ्रेन्डला भेटायला बॉयफ्रेन्ड रात्री गेला तिच्या घरी, कुटुंबियांनी पकडल्यानंतर जे केलं ते क्वचितच घडतं!
अजब प्रेमाची गजब गोष्टImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Nov 10, 2022 | 8:28 AM

रात्री चोरून प्रेयसीला भेटण्यासाठी एक प्रियकर (Boyfriend meets girlfriend) गेला. पण प्रेयसीच्या घरातल्यांनी दोघांनाही रंगेहाथ पकडलं. यानंतर प्रेयसीच्या कुटुंबीयांनी जे केलं, ती कृती क्वचितच पाहायला मिळते. चक्क दोघांचही अख्ख्या गावासमोर लग्नच (Forced Marriage) लावून दिलं गेलं. या लग्नाची चर्चा झाली नसती तरच नवल! ही घटना बिहारच्या मुझफ्फरपूरच्या (Bihar Muzaffarpur) एका गावात घडली. 7 नोव्हेंबर रोजी घडलेली ही घटना आता उघडकीस आली आहे. याचा व्हिडीओ देखील समोर आला आहे.

7 नोव्हेंबर रोजी मुजफ्फरपूरच्या औराई प्रखंड भागातील खेतलपूर गावात एक प्रियकर आपल्या प्रेयसीला भेटायला रात्री तिच्या घरी गेला. लपून छपून प्रेयसीला भेटायला गेलेल्या प्रियकर आणि प्रेयसीची भेट कुटुंबीयांनी रंगेहाथ पकडली.

घरातील मुलीच्या प्रियकराला पकडल्यानंतर कुटुंबीय संतापले. प्रियकराला त्यांनी चोप दिला. नंतर त्याला बंदी देखील बनवलं. दिवसभर त्याला एका खोलीत डांबून ठेवण्यात आलं होतं. पण बघता बघात ही गोष्ट अख्ख्या गावात पसरली आणि गावातील लोकांनी पंचायत बोलावली.

हे सुद्धा वाचा

गावच्या पंचायतीसमोर हा मुद्दा उपस्थित केला गेला. प्रियकर आणि प्रियसी एकाच जातीचे होते. दोघेही एकमेकांशी लग्न करण्यासाठी तयार आहे का, असं त्यांना विचारण्यात आलं. दोघांनीही होकार दिला. त्यानंतर लगेचच अख्ख्या गावासमोर तातडीने दोघांचं लग्न लावून देण्यात आलं.

प्रियकराला प्रेयसीच्या घरातल्यांनी कैद केल्याचं कळल्यानंतर गावातील लोकांनी तरुणाची सुटका केली. दोघेही एकाच जातीचे असल्यामुळे दोन्हीकडील मंडळी लग्नासाठी तयार झाली असल्याचंही गावातील व्यक्तीने सांगितलं. गेल्या एका वर्षापासून या दोघांमध्ये प्रेम संबंध होते.

यातील प्रेयसीचं नाव काजल आहे. तिच्या कुटुंबीयांना तिच्या प्रियकराबाबत कल्पना होती. प्रियकरावर माझ खूप प्रेम आहे आणि आता आमचं लग्न झालंय. हा आनंद कशातच मोजता येणार नाही, असंही तिने म्हटलंय.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.