शाळा बनली आखाडा… शिक्षिकांमधील वादाचे तुंबळ हाणामारीत रुपांतर, VIDEO व्हायरल

| Updated on: May 26, 2023 | 11:41 AM

आपापसातील विवादामुळे महिला मुख्याध्यापक आणि शिक्षिका यांच्यात बाचाबाची झाली. त्याचे रुपांतर हाणामारीत झाले. शाळेतील या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

शाळा बनली आखाडा... शिक्षिकांमधील वादाचे तुंबळ हाणामारीत रुपांतर, VIDEO व्हायरल
शिक्षिकांची हाणामारी झाली व्हायरल
Image Credit source: social media
Follow us on

पाटणा : बिहारची राजधानी पाटणा येथील बिहता येथील सरकारी शाळेत (school) महिला मुख्याध्यापक आणि शिक्षक यांच्यात (teacher fight)झालेल्या भांडणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (video viral)होत आहे. शाळेची खिडकी लावण्यावरून दोन शिक्षकांमध्ये वाद सुरू झाला. हे प्रकरण इतकं तापलं की लगेचच दोन्ही शिक्षिका एकमेकांशी भांडू लागल्या. हळूहळू हा वाद वाढला आणि शाळेचा परिसर कुस्तीचा आखाडा बनला. यादरम्यान त्या दोघींमध्ये जोरदार हाणामारी सुरू झाली. एकमेकींना लाथा-बुक्के मारले. त्यांच्या मारहाणीदरम्यान इतर लोकांनी मात्र बघ्याची भूमिका घेतली. तर काही जण ही घटना मोबाईलमध्ये कॅप्चर करत होते.

हे प्रकरण बिहता ब्लॉकमध्ये असलेल्या कोरिया पंचायतीच्या माध्यमिक शाळेशी संबंधित आहे. महिला मुख्याध्यापिका कांती कुमारी आणि शिक्षिका अनिता कुमारी यांच्यात परस्पर वादातून तुंबळ हाणामारी झाली. दोघी एकमेकींचे केस ओढू लागल्या. यादरम्यान आणखी एका महिलेनेही कांती यांना चप्पल आणि काठीने मारहाण केली. नंतर काही लोकांनी मध्यस्थी करून त्यांची सुटका केली. हाणामारीदरम्यान कोणीतरी या घटनेचा व्हिडिओ बनवला आणि तो सोशल मीडियावर व्हायरल झाला.

 

याप्रकरणी गटशिक्षण अधिकारी नवेश कुमार यांनी सांगितले की, हा दोन शिक्षकांमधील वैयक्तिक वाद आहे. याबाबत वरिष्ठांना कळविण्यात आले आहे. अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पुढील कारवाई केली जाईल.