Anant Singh Daughter Wedding : ज्या आमदाराच्या मुलीच्या लग्नासाठी पाकिस्तानातून येणार पाहुणे, त्या लग्नाचे विधी कधी सुरु होणार? समोर आलं सगळं शेड्यूल

Anant Singh Daughter Wedding : सध्या देशभरात एका आमदाराच्या मुलीच्या लग्नाची चर्चा आहे. या लग्नासाठी खास पाकिस्तानातून पाहुणे येणार आहेत. जावयाच्या मानपानात सुद्धा आमदार साहेबांनी कसली कमतरता ठेवलेली नाही. हे लग्न किती तारखेला आहे, त्याचे विधी या सगळ्याचं शेड्यूल समोर आलं आहे.

Anant Singh Daughter Wedding : ज्या आमदाराच्या मुलीच्या लग्नासाठी पाकिस्तानातून येणार पाहुणे, त्या लग्नाचे विधी कधी सुरु होणार? समोर आलं सगळं शेड्यूल
Anant Singh Daughter Wedding
Image Credit source: PTI
| Updated on: Nov 11, 2026 | 9:20 AM

बिहार मोकामाचे बाहुबली आमदार अनंत सिंह यांची मुलगी शिवांगी सिंह हिच्या लग्नाची देशभरात चर्चा आहे. कारण या लग्नासाठी थेट पाकिस्तान, दुबईतून पाहुणे येणार आहेत. त्या शिवाय अनंत सिंह यांनी जावयाच्या मानपानात काही कमतरता ठेवलेली नाही. अनंत सिंह आपल्या लाडक्या जावयाला सुमारे दोन कोटीची लँड रोव्हर डिफेंडर कार गिफ्टमध्ये देणार आहेत. शिवांगी सिंहच्या लग्नाचं कार्ड आता समोर आलय. त्यामुळे विवाहाच्या सर्व विधींच शेड्यूल कळलं आहे. शिवांगीच लग्न पाटणा जिल्ह्यातील बिहटा कृष्णानगर येथे राहणाऱ्या ऋषिकेश कुमार उर्फ अंकित सोबत होणार आहे. 25 नोव्हेंबर 2026 या लग्नाची तारीख निश्चित करण्यात आली आहे. मात्र, त्याआधी विवाहाचे दुसरे कार्यक्रम होणार आहेत.

लग्न पत्रिकेनुसार लग्नाचा कार्यक्रम 20 नोव्हेंबर 2026 पासून सुरु होणार आहे. शिवांगी सिंह ही अनंत सिंह यांची छोटी मुलगी आहे. 20 नोव्हेंबर 2026 म्हणजे शुक्रवारी शुभ फलदान आणि तिलकचा कार्यक्रम होईल. त्यानंतर 23 नोव्हेंबर 2026 रोजी सोमवारी शिवांगीची हळद आहे. 24 नोव्हेंबर 2026 रोजी मंगळवारी मेहंदी आणि संगीत समारंभाचा कार्यक्रम आहे. 25 नोव्हेंबर 2026 रोजी बुधवारी शिवांगीचा विवाह होईल. अनंत सिंह यांचा छोटा मुलगा अभिनव कुमार यांचा जेनऊ विधी सुद्धा होईल.

Loading...

कोट्यवधीची BMW गिफ्ट करणार

या हाय-प्रोफाईल लग्नासाठी अनंत सिंह यांच्या कुटुंबात जोरात तयारी सुरु आहे. खास परदेशातून फुलं मागवण्यात आली आहेत, त्यावरुन लग्न सोहळ्याची भव्यता लक्षात येते. पाहुण्यांचं स्वागत आणि मंगल विधींसाठी अनेक एकरमध्ये आलिशान मंडप उभारण्यात आला आहे. अनंत सिंह यांनी मुलीचं लग्न आणि मुलाचा जनऊ संस्कार संस्मरणीय करण्यासाठी कुठलीही कमतरता ठेवली नाही.अनंत सिंह हे मोकामाचे बाहुबली आमदार आहेत. ते मुलगी शिवांगीच्या लग्नात जावई ऋषिकेशला गिफ्ट मध्ये 3 कोटी रुपयांची ‘लँड रोवर डिफेंडर’ गाडी गिफ्ट करणार आहेत. त्या शिवाय मुलगा अभिनवच्या जनेऊ संस्काराच्यावेळी कोट्यवधीची BMW गिफ्ट करणार आहेत. कोट्यवधी रुपये या लग्नावर खर्च करणाऱ्या अनंत सिंह यांची संपत्ती आहे तरी किती? अशी चर्चा आता देशभर रंगली आहे.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us