AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bharat Gogawale: रामदास कदम यांच्या भूमिकेमुळेच सुनील तटकरे संसदेत? भरतशेठ गोगावले म्हणाले काय? दोन्ही नेत्यांच्या वादावरही भाष्य

Bharat Gogawale on Ramdas Kadam Sunil Tatkare: अजितदादांच्या विमान अपघातामागे सुनील तटकरे यांचा हात असल्याचा दावा करून रामदास कदम यांनी खळबळ उडवून दिली. त्यावर तटकरे यांनी कायदेशीर नोटीसची भाषा केली. तर या वादावर रायगडचे पालकमंत्री भरतशेठ गोगावले यांनी खास प्रतिक्रिया दिली आहे.

Bharat Gogawale: रामदास कदम यांच्या भूमिकेमुळेच सुनील तटकरे संसदेत? भरतशेठ गोगावले म्हणाले काय? दोन्ही नेत्यांच्या वादावरही भाष्य
कदमांच्या भूमिकेमुळेच तटकरे संसदेत? भरतशेठ गोगावले म्हणाले काय?
| Updated on: Nov 11, 2026 | 8:52 AM
Share

Bharat Gogawale on Ramdas Kadam Sunil Tatkare: दिवंगत अजितदादा पवार यांच्या विमान अपघातामागे सुनील तटकरे यांचा हात असल्याचा आणि त्यांची चौकशी करण्याचा बॉम्ब शिवसेना नेते रामदास कदम यांनी टाकला. त्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप आला. दादांचा विमान अपघात की घातपात हा गेल्या सहा महिन्यांपासून चर्चेचा विषय आहे. त्यातच कदम यांच्या वक्तव्याने मोठा वाद पेटला. तटकरे यांनी कदमांना कायदेशीर नोटीस बजावणार असल्याचे सांगितले. आता या वादावर रायगडचे पालकमंत्री भरतशेठ गोगावले यांनीही भाष्य केले आहे. त्यांनी तटकरे यांच्या खासदारकीविषयी मोठे वक्तव्य केले आहे.

तटकरे यांच्या नावासाठी कदमांची शिफारस

रामदास कदम आणि सुनील तटकरे यांच्यातील वादावर पालकमंत्री भरत गोगावले यांनी महाड येथे प्रतिक्रिया दिली. रामदास कदम हे आमचे सीनियर नेते आहेत. सुनील तटकरे यांना उमेदवारी द्यावी, यासाठी रामदास कदम यांनीच निवडणुकीत तटकरे यांच्या नावाची शिफारस केली होती. त्यांना निवडून आणण्याची जबाबदारीही घेतली होती. त्याप्रमाणे त्यांना निवडून आणले, असा दावा गोगावले यांनी केला.

दोन्ही नेत्यातील वादावर प्रतिक्रिया

त्यानंतर सुनील तटकरे आणि रामदास कदम यांच्यात नेमके काय झाले, हे आम्हालाही माहीत नाही. माझ्या मते, वरच्या स्तरावर मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांमध्ये जर ट्युनिंग (समन्वय) चांगले असेल, तर खालच्या स्तरावरही तसा समन्वय असायला हवा, असे वक्तव्य भरतशेठ यांनी केले. रायगडमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीतील कलगीतूरा जुनाच आहे. अगोदर पालकमंत्री पदावरून दोन्ही पक्षात दोन वर्षात मोठा संघर्ष पाहायला मिळाला. तर त्यानंतर दिलजमाई झाली आणि अनिकेत तटकरे हे विधान परिषदेवर बिनविरोध निवडून आले. पण कोकणातील राजकीय शिमगा थांबलेला नाही. त्याचे पडसाद राज्यातही उमटत आहेत. तटकरे आणि गोगावले हा वाद असतानाच त्याला कदम आणि थोरवे असे कांगोरे ही समोर आले आहे. एकंदरीतच तटकरे विरुद्ध आम्ही सारे असा कोकणातील हा सामना या ना त्या कारणांनी राजकीय वस्त्रहरण करतो आणि वादावर पडदा पडता पडता पडता पुन्हा दुसर्‍या वादाचा अंक सुरू होत असल्याचे चित्र आहे.

Follow Us
अजित दादांचा पक्ष आता नेतृत्त्वहीन; पक्षातील अंतर्गत... विकास लवांडेंच
Vikas Lavande : अजित दादांचा पक्ष आता नेतृत्त्वहीन; पक्षातील अंतर्गत... विकास लवांडेंचा मोठा दावा
गोकुळच्या सत्तेसाठी घाईघाईने अध्यादेश? सतेज पाटलांचा गंभीर आरोप,
गोकुळच्या सत्तेसाठी घाईघाईने अध्यादेश? सतेज पाटलांचा गंभीर आरोप, न्यायालयात जाणार!
शिवसेनेत पालकमंत्र्यांविरोधात नाराजीचा सूर; आमदारांनी थेट....
शिवसेनेत पालकमंत्र्यांविरोधात नाराजीचा सूर; आमदारांनी थेट एकनाथ शिंदेंकडे मांडली तक्रार!
रोहित पवारांच्या एका सूचक ट्वीटने राजकीय वर्तुळात खळबळ; विलीनीकरण...
रोहित पवारांच्या एका सूचक ट्वीटने राजकीय वर्तुळात खळबळ; विलीनीकरणाच्या चर्चांदरम्यान नेमका कोणाला दिला इशारा?
कराडमध्ये गुळाच्या सौद्यांचा शुभारंभ! पहिल्याच दिवशी गुळाला मिळाला...
कराडमध्ये गुळाच्या सौद्यांचा शुभारंभ! पहिल्याच दिवशी गुळाला मिळाला विक्रमी भाव, शेतकऱ्यांना दिलासा!
गोकुळ दूध संघावर महायुतीचा झेंडा! राजेश पाटील यांची अध्यक्षपदी निवड...
गोकुळ दूध संघावर महायुतीचा झेंडा! राजेश पाटील यांची अध्यक्षपदी निवड होताच पहिली प्रतिक्रिया
महायुतीचा मोठा डाव! राजेश पाटील यांची गोकुळच्या अध्यक्षपदी निवड...
Gokul Milk Union Big Update : महायुतीचा मोठा डाव! राजेश पाटील यांची गोकुळच्या अध्यक्षपदी निवड
आगामी राजकारणावर भाष्य करत कैलास पाटील यांचा भाजपवर हल्लाबोल; म्हणाले
आगामी राजकारणावर भाष्य करत कैलास पाटील यांचा भाजपवर हल्लाबोल; म्हणाले, आज उद्धव ठाकरे...
गोकुळच्या अध्यक्षपदाचा फैसला आज! राजेश पाटील बाजी मारणार की धक्का बसणा
गोकुळच्या अध्यक्षपदाचा फैसला आज! राजेश पाटील बाजी मारणार की धक्का बसणार? हसन मुश्रीफांचं मोठं विधा
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर फडणवीसांचं मोठं विधान, अधिकृत भाष्य....
NCP Merger : राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं विधान, अधिकृत भाष्य करण्याचा अधिकार केवळ...; नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री?