मल्लिकार्जुन खरगे म्हणाले, दिवाली खुशीयों की ईद.. भाजपा संतापली…

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या दिवाली संदेशावरुन राजकारण तापले आहे. खरगे यांनी दीपावलीला 'खुशियों की ईद'म्हटल्याने भाजपाने आक्षेप घेतला आहे.

मल्लिकार्जुन खरगे म्हणाले, दिवाली खुशीयों की ईद.. भाजपा संतापली...
mallikarjun kharge
| Updated on: Nov 08, 2026 | 8:33 PM

दिवाळीच्या निमित्ताने काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जु खरगे यांनी केलेल्या वक्तव्याने राजकारण तापले आहे. देशवासियांना दीपावलीच्या शुभेच्छा देताना खरगे यांनी या सणाला, “खुशियों की ईद ” म्हटल्याने भाजपचे लोक संतापले आहेत. खरगे म्हणाले की दिवाळी अनेक दिवस चालणारा आनंदाचा सण आहे. जो लोकांना एकत्र आणतो आणि आपल्या प्रियजनांना भेटण्याची संधी देतो. खरगे यांनी या वेळी देशात शांतता कायम राखणे, परस्परांतील गैरसमज दूर करणे आणि राष्ट्रीय एकतेसाठी मिळून काम करण्याचे आव्हानही केले आहे. मात्र, खरगे यांच्या वक्तव्यावर भाजपाने तिखट प्रतिक्रीया दिली आहे. भाजपाचे प्रवक्ते प्रदीप भंडारी यांनी काँग्रेस अध्यक्षांच्या वक्तव्याला तुष्टीकरणाच्या राजकारणाशी जोडून काँग्रेसवर निशाना साधला आहे. भाजपाने आरोप केला आहे की काँग्रेस दिवाळी सारख्या सणातही व्होट बँकेचे राजकारण करत आहे.

 

Loading...
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us