ना सरकारचं नाव ना पक्षाचं, देणगी मागण्यासाठी भाजपची नवी आयडिया

नवी दिल्ली : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाहांनी ट्वीट केलेल्या एका व्हिडीओने आता नवा वाद निर्माण झालाय. या व्हिडीओत कुठेही भाजपचं चिन्हं आणि पक्षाचा उल्लेख केलेला नाही. पण संपूर्ण जाहिरातीत पंतप्रधान नरेंद्र मोदी..पंतप्रधानांना मदत…मोदी केअर, अशा शब्दांचा अधिक वापर झालाय. ही देगणी नमो अॅप म्हणजे नरेंद्र मोदी अॅपद्वारे मागण्यात आलीय. पण आता सवालही अनेक निर्माण …

ना सरकारचं नाव ना पक्षाचं, देणगी मागण्यासाठी भाजपची नवी आयडिया

नवी दिल्ली : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाहांनी ट्वीट केलेल्या एका व्हिडीओने आता नवा वाद निर्माण झालाय. या व्हिडीओत कुठेही भाजपचं चिन्हं आणि पक्षाचा उल्लेख केलेला नाही. पण संपूर्ण जाहिरातीत पंतप्रधान नरेंद्र मोदी..पंतप्रधानांना मदत…मोदी केअर, अशा शब्दांचा अधिक वापर झालाय. ही देगणी नमो अॅप म्हणजे नरेंद्र मोदी अॅपद्वारे मागण्यात आलीय. पण आता सवालही अनेक निर्माण झालेत.

सरकारी अॅप नसताना पंतप्रधानांच्या नावाने पक्षासाठी देगणी मागणं कितपत योग्य? सर्वसामान्यांनी नमो अपद्वारे दिलेल्या देगणीचा वापर विकासासाठीच होईल का? अॅपद्वारे मिळालेल्या देगणीवर नेमकं नियंत्रण कोण ठेवणार? जाहिरातीत भाजपचा उल्लेखच नाही, त्यामुळे मोदी पक्षापेक्षा मोठे होत चालले का? असे प्रश्न उपस्थित होत आहेत.

 

राजकीय पक्षांच्या देगणीचा विषय याआधीही अनेकदा गाजलाय. भाजपबद्दल बोलायचं झालं तर हा पक्ष सध्या सर्वात मोठा पक्ष असल्याचा दावा होतो. त्यातच आता नमो अॅपच्या माध्यमातून मत मागण्याबरोबरच मदतही मागितली जात आहे. पण विकासाच्या नावाखाली पक्षासाठी देगणी का? याचं उत्तरही अमित शाहांकडून अपेक्षित आहे.

पक्षासाठी देणगी सर्वच पक्ष मागतात. नरेंद्र मोदी हे नाव एक ब्रँड झालंय. त्यामुळे भाजपकडून जाहिरातींच्या माध्यमातून मोदींच्या नावाचा वापर करत पक्षासाठी देणगी मागण्याचं काम सुरु आहे. मोदींना मदत म्हणजेच देशाला मदत, असं चित्र या व्हिडीओतून रंगवलं जात आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *