Maharashtra Political News live : पुण्यात आज महायुतीची महत्वाची बैठक

| Updated on: May 09, 2024 | 8:19 AM

Maharashtra Political News LIVE in Marathi : आज 8 मे 2024. देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

Maharashtra Political News live : पुण्यात आज महायुतीची महत्वाची बैठक

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्याचे मतदान मंगळवारी झाले. देशाचे लक्ष लागलेल्या बारामती मतदार संघात मतदानाचा टक्का घसरला. बारामतीमध्ये केवळ 56.07 टक्के मतदान झाले. मागील लोकसभा निवडणुकीपेक्षा ते नऊ टक्के कमी आहे. यामुळे याचा फटका कोणाला बसणार? याची चर्चा सुरु झाली आहे. पुणे लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पुण्यात आज महायुतीची बैठक होत आहे. १३ मे रोजी पुणे लोकसभेसाठी मतदान होणार आहे. संदर्भात रणनीती आखण्यासाठी ही बैठक घेण्यात आली आहे. विदर्भातील अनेक भागांत पुन्हा अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. तसेच आज आणि उद्या संपूर्ण विदर्भात पावसाचा अंदाज हवामान विभागकडून व्यक्त केला आहे. यासह अन्य महत्वाच्या बातम्या क्रीडा, मनोरंजन, राजकीय क्षेत्रातील बातम्या तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. त्यामुळे आज दिवसभर हा ब्लॉग फॉलो करा.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 08 May 2024 08:26 PM (IST)

    यामिनी जाधव यांच्या प्रचारासाठी मनसेकडून कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन

    महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने द. मुंबई महायुतीच्या उमेदवार यामिनी यशवंत जाधव यांच्या प्रचारासाठी कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमाला मनसे नेते बाळा नांदगावकर, राज्यसभा खासदार मिलिंद देवरा, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मंत्री मंगलप्रभात लोढा यांची उपस्थिती राहण्याची शक्यता आहे. शिवसेना आमदार यामिनी जाधव यांच्या प्रचाराला सुरुवात झाली आहे. ठाकरे गटाचे नेते अरविंद सावंत यांच्या विरोधात यामिनी जाधव उभ्या आहेत.

  • 08 May 2024 07:12 PM (IST)

    मुंबई हायकोर्टाकडून राज्य सरकारला मोठा दिलासा

    मुंबई हायकोर्टाकडून राज्य सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे.  औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतराच्या अध्यादेशाचा विरोधातल्या सर्व याचिका हायकोर्टाने फेटाळल्या आहेत. राज्य सरकारने औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशिव असे केले नामांतर आहे. या नामांतराला विरोध करणाऱ्या याचिका मुंबई हायकोर्टाने फेटाळल्या आहेत. नामांतराच्या अध्यादेशामुळे संविधानिक अधिकारांचे उल्लंघन झाले नसल्याचे निरीक्षण हायकोर्टाने मांडले आहे..

  • 08 May 2024 05:52 PM (IST)

    सॅम पित्रोदा हे राहुल गांधींचे गुरू, सोनिया गांधींनी माफी मागावी - गिरीराज सिंह

    भाजप नेते गिरिराज सिंह म्हणाले की, मला वाटते की सॅम पित्रोदा हे राहुल गांधींचे गुरू आहेत. कधी ते शिव्या देतात, तर कधी दक्षिण भारत-उत्तर भारताच्या विभाजनाची चर्चा करतात. याबाबत राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांनी माफी मागावी.

  • 08 May 2024 05:37 PM (IST)

    झारखंडच्या ग्रामीण विकास मंत्रालयाच्या कार्यालयावर ईडीचा छापा

    टेंडर कमिशन मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी अंमलबजावणी संचालनालय (ईडी) टीम रांची येथील ग्रामीण विकास मंत्रालयाच्या कार्यालयावर छापा टाकत आहे. ग्रामीण विकास मंत्रालयाचे कार्यालय प्रकल्प भवनात आहे. मंत्री आलमगीर आलम यांचे स्वीय सचिव संजीव लाल यांच्यासह ईडीची टीम पोहोचली आहे.

  • 08 May 2024 05:25 PM (IST)

    आम्ही दहशतवादापासून मुक्त केलेल्या भागात पुन्हा गोळीबार - ओमर अब्दुल्ला

    नॅशनल कॉन्फरन्सचे उपाध्यक्ष आणि बारामुल्ला लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार ओमर अब्दुल्ला म्हणाले की, जम्मू-काश्मीरमध्ये असे काही भाग आहेत ज्यांना आम्ही दहशतवादापासून मुक्त केले होते, परंतु आता पुन्हा बंदुकांचा प्रभाव तेथे दिसत आहे. माझ्या सत्तेच्या काळात अनेक क्षेत्रे दहशतवादापासून पूर्णपणे मुक्त होती, मात्र आता तेथे नव्याने दहशतवाद सुरू झाला आहे.

  • 08 May 2024 05:10 PM (IST)

    गुजरातच्या सौराष्ट्रमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के, रिश्टर स्केलवर तीव्रती 3.4

    गुजरातच्या सौराष्ट्रमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता 3.4 इतकी होती. यात कोणतीही जीवित किंवा वित्त हानी झालेली नाही. बुधवारी दुपारी 3 वाजून 18 मिनिटांनी हे धक्के सौराष्ट्रच्या तलाला शहरात जाणवले. भूकंपाचा केंद्रबिंदू तलालापासून 12 किमी लांब उत्तर पूर्वमध्ये होता.

  • 08 May 2024 03:57 PM (IST)

    काँग्रेसचे नेत्या प्रियंका गांधी यांचा महाराष्ट्र दौरा रद्द

    काँग्रेस उमेदवार गोवाल पाडवी यांच्या प्रचारासाठी प्रियंका गांधी यांची सभा होणार होती. परंतु प्रियांका गांधी यांना उत्तर प्रदेशची जबाबदारी दिलेली असल्याने त्यांची नंदुरबार येथे होणार सभा रद्द झाली आहे.

  • 08 May 2024 03:24 PM (IST)

    पंतप्रधान मोदी आणि राज ठाकरे यांच्या सभेच्या नियोजनासाठी डोबिवलीत बैठक

    डोंबिवलीमध्ये महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची महत्त्वाची बैठक. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे यांच्या सभेच्या नियोजनासाठी ठेवण्यात आली बैठक. डोंबिवलीच्या ग्लोब हॉलमध्ये आयोजित करण्यात आली आहे बैठक. बैठकीत मनसे आमदार राजू पाटील महायुतीचे उमेदवार डॉक्टर श्रीकांत शिंदे त्याचबरोबर भाजपचे पदाधिकारी सह इतर मित्र पक्षाचे पदाधिकारी देखील उपस्थित आहेत.

  • 08 May 2024 01:59 PM (IST)

    पृथ्वीराज चव्हाण यांचे मोठे भाष्य

    शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होण्यासंदर्भात शरद पवारांनी मुलाखतीत नकार दिला नाहीय, आमच्या सहकार्यांशी चर्चा करून निर्णय घेणार असं शरद पवारांनी म्हटलंय, असे काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे.

  • 08 May 2024 01:43 PM (IST)

    शरद पवार यांचे मोठे विधान

    तुम्ही आजपर्यंत अनेक निवडणूक पहिल्या असतील, पहिले निवडणूक जाहीर झाली की एकाच दिवशी निवडणूक होत आहे. मात्र आज पाच टप्प्यात निवडणूक होत आहे, राज्यात जास्त प्रचार करता यावा यासाठी त्यांनी वेळापत्रक बद्दल, असे शरद पवार यांनी म्हटले.

  • 08 May 2024 01:22 PM (IST)

    बजरंग सोनावणे यांची जोरदार टीका

    आतापर्यंत झालेल्या एकाही पालकमंत्र्याने बीड जिल्ह्यासाठी काहीही केले नाही. काल अंबाजोगाई येथील सभेत माझ्यावर बोलले. त्यांनी अभ्यास करून माझ्यावर बोलावे. असे म्हणत सुरेश धस यांच्यावर निशाणा साधला.

  • 08 May 2024 01:10 PM (IST)

    महादेव जानकर यांनी केले मोठे विधान

    बारामती लोकसभेच्या मतदानाच्या दिवशी पैसे वाटपावरून विरोधक बिनबुडाचे आरोप करत आहेत. पराभव दिसत असल्याने हे आरोप होतायत, यात काही तथ्य नाही. बारामती लोकसभेतून राष्ट्रवादीच्या सुनेत्रा पवारच निवडून येतील, कोणी रडल काही झालं, तरी सुनेत्रा पवार पाच हजाराने का होईना निवडून येतील असा विश्वास महादेव जानकर

  • 08 May 2024 12:40 PM (IST)

    पंतप्रधानांना माहित आहे की यावेळी त्यांचं जाणं निश्चित आहे- तेजस्वी यादव

    पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वक्तव्यावर बिहारचे माजी उपमुख्यमंत्री आणि आरजेडी नेते तेजस्वी यादव म्हणाले, "पंतप्रधानांना माहित आहे की यावेळी त्यांचं जाणं निश्चित आहे. हुकूमशाही सरकारला हटवण्यासाठी तिसऱ्या टप्प्यातील निवडणुकांमध्ये आमची स्थिती चांगली आहे. आम्हाला विश्वास आहे की 4 जूनला इंडिया आघाडी सरकार स्थापन करणार आहे."

  • 08 May 2024 12:30 PM (IST)

    निवडणुकीत नुकसान होईल म्हणून मोदी म्हणाले की संविधान बदलणार नाही- प्रियांका गांधी

    "हे लोक संविधान बदलण्याबद्दल बोलत आहेत. जेव्हा ही गोष्ट लोकांमध्ये पसरू लागली, तेव्हा पंतप्रधान मोदींना वाटलं की निवडणुकीत नुकसान होईल, म्हणून ते म्हणाले की आम्ही संविधान बदलणार नाही. पण सत्य हे आहे की त्यांनी अशा अनेक गोष्टी केल्या आहेत ज्यामुळे लोक कमकुवत झाले आहेत, त्यामुळे तुम्ही तुमच्या भविष्यासाठी मतदान करा," असं आवाहन प्रियंका गांधी यांनी केलं.

  • 08 May 2024 12:20 PM (IST)

    अजित पवारांकडून अमोल कोल्हेंवर निशाणा

    अमोल कोल्हेना कसं निवडून आणलं ते अगदी कोल्हेंनी राजीनामा देण्याचा अट्टाहास धरला, याचा लेखाजोखा अजित पवारांनी पुन्हा मांडला. अमोल कोल्हेनी छत्रपती शिवाजी महाराजांचा गनिमी काव्याचा प्रसंग एका चित्रपटात मांडला. त्या चित्रपटानंतर घडलेला प्रसंग अजित पवारांनी उपस्थितांसमोर मांडला. छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका ते अगदी महात्मा गांधींची हत्या करणाऱ्या गोडसेंची भूमिका, अरे काय केलं हे तुम्ही. समाज व्यसनाधीन होईल, अशा जाहिराती करून आपलं पोट भरू नये. पण यांचं काय चाललंय? असं म्हणत अजित पवारांनी अमोल कोल्हेंच्या अभिनयावर प्रश्न उपस्थित केला.

  • 08 May 2024 12:10 PM (IST)

    पाणीकपातीचं संकट तूर्त टळलं

    मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांतील पाणीसाठा दिवसेंदिवस कमी होत आहे. मात्र उपलब्ध जलसाठा आणि राखीव साठा 31 जुलैपर्यंत पुरेल अशा रितीने पुरवठ्याचं नियोजन करण्यात आल्याचं मुंबई महापालिका प्रशासनाने स्पष्ट केलं. मुंबईकरांनी काळजी करू नये, मात्र सर्वांनी पाण्याचा काटकसरीने वापर करणे आवश्यक आहे, असं आवाहन आयुक्तांनी केलंय.

  • 08 May 2024 11:51 AM (IST)

    Live Update | मी केंद्रात गेलो तरच चाकणची वाहतूक कोंडी सुटेल - शिवाजी आढळराव

    ज्या उमेदवाराने पाच पक्ष बदल बदलले. फडणवीसांनी ही मला सांगितलं, कोल्हेंनी भाजपचे दार ठोठावले. त्यामुळं कोल्हेंनी निष्ठेबद्दल बोलू नये... अमोल कोल्हे यांच्याकडे विकासाचे मुद्दे नाही म्हणून जनतेची दिशाभूल करत आहे... असं वक्तव्य शिवाजी आढळराव यांनी केलं आहे.

  • 08 May 2024 11:35 AM (IST)

    Live Update | काँग्रेसमध्ये प्रादेशिक पक्ष विलीन होतील या शरद पवारांच्या वक्तव्याला नाना पटोले यांचा दुजोरा

    नुकताच पुण्याला राहुल गांधी आले असता राहुल गांधींनी मला सांगितलं... राज्यात सर्वत्रकडे प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये समाविष्ट होतील ही चर्चा... भाजपच्या तानाशाहीचा विरोधात अनेक पक्ष एकत्र येणार आहेत... अनेक पक्षांनी भाजपच्या विरोधात त्यांच्या तानाशाहीच्या विरोधात मूड बांधावी असं राहुल गांधींनी सांगितलं त्यामुळे शरद पवारांच्या वक्तव्यात तथ्य आहे... असं वक्तव्य नाना पाटोले यांनी केलं आहे.

  • 08 May 2024 11:25 AM (IST)

    Live Update | उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेचे शिरपूरमध्ये आयोजन

    उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेचे शिरपूर मध्ये आयोजन... नंदुरबार लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवार मीना गावित यांच्या प्रचारार्थ सभेचे आयोजन... उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिरपूरमध्ये दाखल

  • 08 May 2024 11:12 AM (IST)

    Live Update | उमेदवार नरेश मस्के यांच्या प्रचाराला ठाण्यातून सुरुवात

    ठाणे लोकसभेचे शिवसेना महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेश मस्के यांच्या प्रचाराला ठाण्यातून सुरुवात... प्रचार रॅलीमध्ये भाजप आमदार संजय केळकर, शिवसेना माजी आमदार रवींद्र फाटक सह पदाधिकारी उपस्थित... प्रचार रॅलीमध्ये भाजप आमदार संजय केळकर, शिवसेना माजी आमदार रवींद्र फाटक सह पदाधिकारी उपस्थित

  • 08 May 2024 11:00 AM (IST)

    चौथ्या टप्प्यासाठी सुप्रिया सुळे सक्रिय

    सुप्रिया सुळे चौथ्या टप्प्यातील होणाऱ्या मतदारसंघाच्या प्रचारात सक्रिय होणार आहेत. शिरूर आणि मावळात सुप्रिया सुळे प्रचार करणार आहेत. अजित पवारांनी अमोल कोल्हेंना आव्हान दिल्यानं त्या शिरूरमध्ये स्वतः लक्ष घालणार आहेत.

  • 08 May 2024 10:50 AM (IST)

    हेमंत गोडसे भुजबळांची आज भेट

    महायुतीचे उमेदवार खासदार हेमंत गोडसे आज मंत्री छगन भुजबळांची भेट घेणार आहेत. छगन भुजबळ यांचं निवासस्थान असलेल्या भुजबळ फॉर्मवर दोघांची भेट होईल. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर प्रथमच गोडसे भुजबळ फॉर्मवर जाणार आहेत.

  • 08 May 2024 10:40 AM (IST)

    रोहित पवारांवर निवडणूक आयोगाने लक्ष ठेवावे

    दत्ता भारणे यांच्या व्हिडिओ प्रकरणात रुपाली चाकणकर यांनी एक मागणी केली आहे. एक ते दीड महिन्यापासून रोहित पवार अशा प्रकारचे ट्विट करत आहे, त्यांची भावना ही नैराश्यातून आलेली आहे. त्यामुळे रोहित पवारांवर निवडणूक आयोगाने लक्ष ठेवावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

  • 08 May 2024 10:30 AM (IST)

    मतदानाचा आकडा वाढायला हवा होता

    बारामतीमध्ये 60 टक्के मतदान झालेले आहे पण मतदानाचा आकडा वाढायला पाहिजे होता, असे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली चाकणकर म्हणाल्या. बुथवर मात्र अनेक मतदारांचे नाव गहाळ झाली होती.पुढच्या निवडणुकीपर्यंत आम्ही या संदर्भात नक्की विचार करू असे त्यांनी स्पष्ट केले.

  • 08 May 2024 10:20 AM (IST)

    कोण मारणार मैदान

    मुंबईच्या बीकेसी मैदानात सभा घेण्यासाठी महायूती आणि महाविकास आघाडी दोघांनीही एमएमआरडीएकडे परवानगी मागितली आहे. दोघांच्या अर्जावर विचार सुरु आहे. बीकेसी बुलेट ट्रेनच्या बाजूच्या प्लॉटवर सभा होणार आहे. या सभेला मोदी हजर लावणार आहेत.

  • 08 May 2024 10:10 AM (IST)

    Maharashtra News : मतदान प्रक्रियेसाठी कर्मचाऱ्यांची कसरत

    लोकशाही प्रक्रियेत प्रत्येक मतदार महत्वाचा असल्याने भोर विधानसभा मतदारसंघातील रायरेश्वर मतदान केंद्रापर्यंत पोहोचण्यासाठी लोखंडी शिडीचा वापर करून मतदान पथकाने परवा एक तास पायी प्रवास केला आणि आज हेच पथक परतले आहे.

  • 08 May 2024 10:00 AM (IST)

    Live Updates : ही तर प्रस्थापित विरुद्ध विस्थापित लढाई

    प्रस्थापित विरुद्ध विस्थापित लढाईची सुरुवात सांगलीत लोकसभा निवडणुकीतून झाली. प्रस्थापितांच्या मतांच्या विभागणीमुळे आपला विजय निश्चित असून येत्या 4 जूनला सांगली लोकसभा मतदार संघात गुलाल आणि भंडारा हा नक्कीच उधळला जाईल,असा विश्वास ओबीसी बहुजन पार्टीचे सांगली लोकसभा उमेदवार प्रकाश शेंडगे यांनी व्यक्त केला आहे.

  • 08 May 2024 09:54 AM (IST)

    Maharashtra News : मतदान संपताच बारामती लोकसभा मतदारसंघात गोळीबार

    मतदान संपताच बारामती लोकसभा मतदारसंघात गोळीबार. वारजे येथील रामनगरमध्ये दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी हवेत केला गोळीबार. रात्री साडे दहा वाजताची घटना. आरोपीं गोळीबार करुन मुंबई पुणे हायवे वरुन कात्रजच्या दिशेने गेले पळून. गोळीबार केलेल्या आरोपींचा वारजे पोलिसांकडून शोध सुरु.

  • 08 May 2024 09:52 AM (IST)

    Maharashtra News : मालेगाव कुसुंबा रोडवरील टोलनाका नाका फोडला

    मालेगाव तालुक्यातील डोंगराळेसह परिसरातील नागरिकांनी संतापात फोडला टोल नाका. टोल कर्मचाऱ्याकडून स्थानिकांना अरेरावी केल्याने फोडला टोलनाका. स्थानिकांनी सर्व लेनवरील टोल कार्यालय फोडले. टोल नाक्याचे कॉम्पुटर, कॅमेऱ्यासह सर्वत्र तोडफोड करुन लोखोंचे नुकसान. स्थानिक आणि टोल कर्मचाऱ्यांमध्ये अनेकदा होतात वाद.

  • 08 May 2024 09:25 AM (IST)

    Maharashtra News : सचिन खरात गटातील अनेकांचे राजीनामे

    पुण्यातील आरपीआय सचिन खरात गटातील अनेकांचे राजीनामे. सचिन खरात यांच्यावर नाराजी व्यक्त करत दिले राजीनामे. राज्यातील अनेक ठिकाणी खरात गटाला झटका. खरात गट सध्या महायुतीमध्ये अजित पवार यांच्यासोबत आहे. कार्यकर्त्यांच्या भावना समजून घेतल्या नाहीत म्हणून अनेकांनी दिले राजीनामे.

  • 08 May 2024 09:10 AM (IST)

    Maharashtra News : बीकेसी मैदानात सभेसाठी महायुती, मविआचा अर्ज

    मुंबईच्या बीकेसी मैदानात सभा घेण्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडी दोघांनीही एमएमआरडीएकडे मागितली परवानगी. दोघांच्या अर्जावर विचार सुरु. बीकेसी बुलेट ट्रेनच्या बाजूच्या प्लॉटवर होणार सभा. सभेला मोदींची हजेरी लागणार, नियोजनास सुरुवात.

  • 08 May 2024 08:55 AM (IST)

    Marathi News: पुण्यात एमआयएमला खिंडार

    लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पुण्यात एमआयएमला खिंडार पडले आहे. एमआयएमच्या नगरसेविका अश्विनी लांडगे व एमआयएमचे नेते डॅनियल लांडगे यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. अनेक कार्यकर्त्यांसह त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.

  • 08 May 2024 08:40 AM (IST)

    Marathi News: आदिवासी वाड्यावरील नागरिकांचा बहिष्कार

    नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर परिसरातील 7 ते 8 आदिवासी वाड्यावरील नागरिकांनी मतदानावर बहिष्कार टाकला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून मागणी करून देखील मूलभूत सुविधा मिळत नसल्याने नागरिकांनी हा निर्णय घेतला आहे. लचकेवाडी, डोंगरवाडी, तोरणवाडी, गणेशनगरसह काही वाड्यावरील नागरिक आक्रमक झाले आहेत.

  • 08 May 2024 08:22 AM (IST)

    Marathi News: तीन लाख नागपूरकरांनी भरला मालमत्ता कर

    तीन लाख नागपूरकरांनी 59 कोटी रुपयांचा मालमत्ता कर भरला नाही. नागपूर महापालिकेने कर भरण्यासाठी सवलत देऊनही त्याचा उपयोग झाला नाही. त्यामुळे महापालिकेचे आर्थिक गणित बिघडणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

  • 08 May 2024 08:04 AM (IST)

    Marathi News: बारामतीनंतर आता पुण्यात लक्ष

    बारामतीनंतर आता पुणे लोकसभा निवडणुकीकडे महायुतीने लक्ष केंद्रीत केले आहे. त्यासाठी पुण्यात आज महायुतीची बैठक पार पडत आहे. बैठकीला मंत्री चंद्रकांत पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार आहेत. १३ मे रोजी पुणे लोकसभेसाठी मतदान पर पडतंय त्याच्या संदर्भात रणनीती आखण्यासाठी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी ही बैठक घेण्यात आली आहे.

Published On - May 08,2024 8:02 AM

Follow us
गुन्हेगारांचं सोशल मीडियावर उदात्तीकरण, गजा मारणेचा तो व्हिडीओ व्हायरल
गुन्हेगारांचं सोशल मीडियावर उदात्तीकरण, गजा मारणेचा तो व्हिडीओ व्हायरल.
शिंदेंना मुख्यमंत्री करण्यास हरकत नव्हती, पण... पवारांचं मोठं वक्तव्य
शिंदेंना मुख्यमंत्री करण्यास हरकत नव्हती, पण... पवारांचं मोठं वक्तव्य.
पण मी गमछा उडवते, पंकजा मुंडेंकडून उदयनराजेंची नक्कल, बघा व्हिडीओ
पण मी गमछा उडवते, पंकजा मुंडेंकडून उदयनराजेंची नक्कल, बघा व्हिडीओ.
राऊतांनी ठाकरेंना धमकी दिल्याचा राणेंचा गौप्यस्फोट, तर मातोश्रीच्या...
राऊतांनी ठाकरेंना धमकी दिल्याचा राणेंचा गौप्यस्फोट, तर मातोश्रीच्या....
मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यास..योगींच्या वक्तव्यावरून ठाकरे गटाची टीका
मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यास..योगींच्या वक्तव्यावरून ठाकरे गटाची टीका.
लोकसभेचा निकाल अन् त्याच दिवशी जरांगे पाटलांचं पुन्हा एकदा उपोषण
लोकसभेचा निकाल अन् त्याच दिवशी जरांगे पाटलांचं पुन्हा एकदा उपोषण.
नवा परळी पॅटर्न म्हणत रोहित पवारांचं ट्विट अन निवडणूक आयोगावर हल्लाबोल
नवा परळी पॅटर्न म्हणत रोहित पवारांचं ट्विट अन निवडणूक आयोगावर हल्लाबोल.
तेव्हा राष्ट्रवादीकडे CM पदासाठी योग्य नेता नव्हता,शरद पवारांचा खुलासा
तेव्हा राष्ट्रवादीकडे CM पदासाठी योग्य नेता नव्हता,शरद पवारांचा खुलासा.
'त्यांना' शिंदे मुख्यमंत्री म्हणून नको होते, राऊतांचा मोठा गौप्यस्फोट
'त्यांना' शिंदे मुख्यमंत्री म्हणून नको होते, राऊतांचा मोठा गौप्यस्फोट.
आता सरकारच्या दोऱ्या माझ्या हातात, एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?
आता सरकारच्या दोऱ्या माझ्या हातात, एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?.