ओडिशामध्ये पहिल्यांदाच भाजपचं सरकार, पंतप्रधान मोदी करणार रोड शो

मोहन माझी हे ओडिशाचे नवे मुख्यमंत्री असणार आहेत. भाजपच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत त्यांची नेतेपदी निवड करण्यात आली. ओडिशामध्ये पहिल्यांदाच भाजपचे सरकार आल्याने पंतप्रधान मोदी हे भुवनेश्वरमध्ये रोड शो करणार आहेत.

ओडिशामध्ये पहिल्यांदाच भाजपचं सरकार, पंतप्रधान मोदी करणार रोड शो
Follow us
| Updated on: Jun 11, 2024 | 9:14 PM

ओडिशामध्ये भाजपचे पहिल्यांदाच सरकार स्थापन होणार आहे. मुख्यमंत्रिपदाचा शपथविधी १२ जून रोजी होणार आहे. पंतप्रधान मोदी हे देखील या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. भाजपचे ओडिशा प्रभारी विजयपाल सिंह तोमर यांनी सांगितले की, भुवनेश्वरमधील जनता मैदानावर शपथविधी सोहळा होणार आहे. त्याआधी पीएम मोदी भुवनेश्वरमध्ये रोड शो देखील करणार आहेत. भाजपला बहुमत दिल्याबद्दल ते जनतेचे आभार मानणार आहेत.

पीएम मोदी करणार रोड शो

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून चंद्राबाबू नायडू यांच्या शपथविधीला देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम बुधवारी आहे. त्यानंतर पीएम मोदी भुवनेश्वरला जाणार आहेत. या शपथविधी सोहळ्यापासून पीएम मोदींचा रोड शो भुवनेश्वरच्या जयदेव विहार स्क्वेअरपासून सुरू होईल, जो जनता मैदानात संपेल. एका महिन्यापेक्षा कमी कालावधीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा दुसरा रोड शो असेल. याआधी निवडणूक प्रचारादरम्यान त्यांनी भुवनेश्वरमध्ये रोड शो केला होता.

ओडिशाचे 16 वे मुख्यमंत्री

मोहन चरण माझी हे ओडिशाचे 16 वे मुख्यमंत्री होणार आहेत. माझी हे आदिवासी समाजातून येतात. याशिवाय, दोन उपमुख्यमंत्री देखील असतील. ओडिशाच्या भाजप सरकारमध्ये केव्ही सिंगदेव आणि प्रवती परिदा हे दोन उपमुख्यमंत्री असतील. 53 वर्षीय मोहन माझी हे केओंझार विधानसभा मतदारसंघातून चार वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. ओडिशाचे मुख्यमंत्री उमेदवार मोहन माझी यांनी बीजू जनता दलाच्या उमेदवार मीना माझी यांचा पराभव केला होता.

धर्मेंद्र प्रधान यांच्या नावाची होती चर्चा

ओडिशा विधानसभेत भाजपने 78 जागा जिंकून बहुमत मिळवले आहे. मंगळवारी विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत मोहन मांझी यांची ओडिशाचे पुढील मुख्यमंत्री म्हणून निवड करण्यात आली. याआधी ओडिशामधील खासदार धर्मेंद्र प्रधान यांच्या नावाची चर्चा होती. मात्र, दोन दिवसांपूर्वी त्यांची केंद्र सरकारमध्ये मंत्रीपदी नियुक्ती झाल्यानंतर राज्याचा पुढील मुख्यमंत्री होण्याची त्यांची शक्यता धूसर झाली होती. मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानप्रमाणे ओडिशातही भाजपने मुख्यमंत्रीपदी आश्चर्यकारक नावाची निवड केली आहे.

Non Stop LIVE Update
उद्ध्वस्त करणारा तू कोण? भुजबळांच्या टीकेवरून जरांगेंना हाकेंचा सवाल
उद्ध्वस्त करणारा तू कोण? भुजबळांच्या टीकेवरून जरांगेंना हाकेंचा सवाल.
याला शिक्षण द्या आधी, माझ्यासमोर लायकी..., हाकेंचा जरांगेंवर हल्लाबोल
याला शिक्षण द्या आधी, माझ्यासमोर लायकी..., हाकेंचा जरांगेंवर हल्लाबोल.
आता सरकार तुम्हालाही पाणी पाजेल, जरांगेंचा हाकेंना सावधगिरीचा सल्ला
आता सरकार तुम्हालाही पाणी पाजेल, जरांगेंचा हाकेंना सावधगिरीचा सल्ला.
अटल सेतूवर पडल्या भली मोठी भेग, पटोलेंनी केला शिंदे सरकारचा पर्दाफाश
अटल सेतूवर पडल्या भली मोठी भेग, पटोलेंनी केला शिंदे सरकारचा पर्दाफाश.
आम्हाला फसवलं तर...,डिस्चार्ज मिळताच जरांगेंनी गिरीश महाजनांना फटकारलं
आम्हाला फसवलं तर...,डिस्चार्ज मिळताच जरांगेंनी गिरीश महाजनांना फटकारलं.
मर्द-षंढशिवाय ज्यांच्याकडे शब्द नाही, त्यांनी योग करावा, शेलारांचा रोख
मर्द-षंढशिवाय ज्यांच्याकडे शब्द नाही, त्यांनी योग करावा, शेलारांचा रोख.
महाराष्ट्रातील नागरिकांसाठी आनंदाची बातमी, राज्यात येत्या 5 दिवसात....
महाराष्ट्रातील नागरिकांसाठी आनंदाची बातमी, राज्यात येत्या 5 दिवसात.....
पंकजा मुंडे यांना राज्यसभेवर पाठवा; फडणवीस यांची कोणाकडे विनंती?
पंकजा मुंडे यांना राज्यसभेवर पाठवा; फडणवीस यांची कोणाकडे विनंती?.
माझा अपघात..., बच्चू कडूंच्या जीवाला धोका, पोलीस अधीक्षकांना थेट पत्र
माझा अपघात..., बच्चू कडूंच्या जीवाला धोका, पोलीस अधीक्षकांना थेट पत्र.
आज 10 वा आंतरराष्ट्रीय योग दिवस; श्रीनगरमधून मोदींचा योगसंदेश, म्हणाले
आज 10 वा आंतरराष्ट्रीय योग दिवस; श्रीनगरमधून मोदींचा योगसंदेश, म्हणाले.