भाजप नेत्याच्या मुलाचा टोकाचा निर्णय; लग्नाच्या वाढदिवसाच्या एक दिवस आधीच…

भाजप नेत्याच्या मुलाने टोकाचा निर्णय घेतला. लग्नाच्या वाढदिवसाच्या एक दिवस आधीच मुलाने आयुष्य संपवलं.

भाजप नेत्याच्या मुलाचा टोकाचा निर्णय; लग्नाच्या वाढदिवसाच्या एक दिवस आधीच...
bjp leaeder son ends life
Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Nov 02, 2026 | 1:26 PM

उत्तर प्रदेशच्या मेरठमध्ये भाजप नेते राजीव गुप्ता यांचे मुलाने टोकाचा निर्णय घेतला आहे. त्याने बायको आणि सासरच्या मंडळीवर गंभीर आरोप करत आयुष्य संपवलं. लग्नाच्या वाढदिवसाच्या एक दिवस आधीच मुलाने टोकाचा निर्णय घेतल्याने खळबळ उडाली आहे.  त्याने आयुष्य संपवण्याआधी एका व्हिडिओ तयार केला. त्यात त्याने बायको आणि सासरच्या मंडळीवर धमकी आणि मानसिक छळाचा आरोप केला. मुलाच्या मृत्यूनंतर वडिलांची तब्येत बिघडल्याची माहिती मिळत आहे. त्यांना हृदय विकाराचा झटका आल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव हे प्रवल असे आहे. मेरठच्या कंकरखेडा भागातील रहिवासी राजीव गुप्ता यांचा मुलगा प्रवलने टोकाचा निर्णय घेतलाय. राजीव गुप्ता हे भाजपच्या कंकरखेडा मंडळाचे उपाध्यक्ष हते. प्रवल हे एका खासगी कंपनीत नोकरीला होते. एका वर्षाआधी ऋषिनगरच्या स्नेहासोबत लग्न झालं. लग्नानंतर काही दिवसांनी दोघांमध्ये वाद होऊ लागले.  मागील काही महिन्यात वाद वाढत केले. त्यामुळे प्रवल हा तणावात होता.

Loading...

बायकोने दिली होती पोलीस स्टेशनला तक्रार 

लग्नानंतर काही दिवसांनी पत्नी स्नेहाने पोलिसांना तक्रार केली होती. प्रवलवर हुंडा मागणे, घरगुती हिंसाचार, मानसिक  छळाचा आरोप बायको स्नेहाने केला होता. त्यानंतर पोलिसांकडून प्रवल आणि त्याच्या बायकोचे समुपदेशन करण्यात येत होते. प्रवल आणि त्याच्या कुटुंबीयांना समुपदेशनासाठी बोलावलं होतं. मुकेश कुमार नावाच्या एका पोलीस अधिकारी प्रवल आणि त्याच्या नातेवाईकासोबत उद्धटपणे संवाद साधला. परंतु या आरोपाला दुजोरा देण्यात आलेला नाही.

नातेवाईकांच्या आरोपानुसार, प्रवलची पत्नी आणि तिच्या नातेवाईकांकडून सातत्याने धमकी दिली जात होती. तसेच प्रवलला तुरुंगात पाठवण्याची धमकी देण्यात येत होती. बायको संपूर्ण प्रॉपर्टी नावावर करण्याची मागणी करत होती. या छळाला कंटाळून प्रवलने एक व्हिडिओ तयार केला. या व्हिडिओमध्ये प्रवलने बायको आणि त्याच्या सासरच्या मंडळीने केलेल्या छळाचा आरोप केला आहे. व्हिडिओ तयार केल्यानंतर प्रवलले आयुष्य संपवलं. आता पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us