Modi Cabinet Minister : मोदी मंत्रिमंडळातील मंत्री निवडणूक लढवणार, मंत्र्यापेक्षा त्याची पत्नी श्रीमंत, स्वित्झर्लंडमध्ये 34 कोटींचा फ्लॅट
Modi Cabinet Minister : नरेंद्र मोदी सरकारमधील एक मंत्री लवकरच राज्यसभेची निवडणूक लढवणार आहे. या मंत्र्याने निवडणूक प्रतिज्ञापत्र सादर केलं आहेत. त्यातून संपत्तीबद्दलही खुलासा करण्यात आला आहे.

मध्य प्रदेशातून राज्यसभेवर जाणारे भाजप उमेदवार हरदीप सिंह पुरी यांची पत्नी लक्ष्मी पुरी त्यांच्यापेक्षा जास्त श्रीमंत आहे. हरदीप सिंह पुरी हे केंद्रीय मंत्री आहेत. निवडणुकीसाठी अर्जासह दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार लक्ष्मी पुरी यांची वार्षिक कमाई, चल संपत्ती आणि बँक खात्यातील जमा रक्कम हरदीप पुरी यांच्यापेक्षा जास्त आहे. 74 वर्षाच्या हरदीप पुरी यांनी शनिवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. मध्य प्रदेशातून रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेसाठी 12 नोव्हेंबरला पोटनिवडणूक होणार आहे. प्रतिज्ञापत्रानुसार हरदीप पुरी यांच्याकडे 6.54 कोटी रुपयांची चल सपंत्ती आणि 20 कोटी रुपयांची अचल संपत्ती आहे. यात दिल्लीच्या वेस्ट अँड भागात असलेला त्यांचा फ्लॅट सुद्धा आहे. मागच्या पाचवर्षात त्यांची वार्षिक कमाई 63.36 लाख रुपयांनी वाढून 75.57 लाख रुपये झाली आहे. त्यांच्या कमाईच्या स्त्रोतांमध्ये पेन्शन, केंद्रीय मंत्री म्हणून मिळणारं वेतन, दिल्लीच्या संपत्तीतून येणारं भाडं आणि बँक सेविंगमधून मिळणारं व्याज याचा समावेश होतो.
हरदीप पुरी यांची पत्नी लक्ष्मी पुरीकडे 10.66 कोटी रुपयांची चलं संपत्ती आणि 9 कोटी रुपयांची अचल संपत्ती आहे. प्रतिज्ञापत्रातील माहितीनुसार, स्वित्झर्लंड जिनेवामध्ये एका अपार्टमेंट आहे. त्याची किंमत 30 लाख स्वीस फ्रँक म्हणजे जवळपास 34 कोटी रुपये आहे. त्या शिवाय ग्रेटर नोएडामध्ये एक घर आहे, त्याची किंमत 19.52 लाख रुपये आहे. लक्ष्मी पुरी यांच्याकडे 2,90,658 अमेरिकी डॉलर आहेत. याची किंमत 2.75 कोटी रुपये येते. मागच्या पाच वर्षांत त्यांची वार्षिक कमाई 15.39 लाख रुपयांनी वाढून 1.69 कोटी रुपये झाली आहे. लक्ष्मी पुरी यांच्या कमाईच्या स्त्रोत भारत सरकार आणि संयुक्त राष्ट्राकडून मिळणारी पेन्शन, जिनेवामधील सपंत्तीतून मिळणारं भाडं आणि बँक सेविंगवरील व्याज याचा समावेश होतो. लक्ष्मी पुरी या भारतीय परराष्ट्र सेवेच्या निवृत्त अधिकारी आहेत. राजनैतिक अधिकारी म्हणून त्यांच्याकडे अनुभव संयुक्त राष्ट्रातही त्या अधिकारी पदावर कार्यरत होत्या.
बँक खात्यात किती पैसा?
हरदीप पुरी यांच्याकडे 10 हजार रुपये रोख आणि जवळपास 32 लाख रुपयांची गाडी आहे. लक्ष्मी पुरी यांच्याकडे 20 हजार रुपये कॅश आणि 45 लाखाचे दागिने आहेत. हरदीप पुरी यांच्या दिल्लीतील चार बँक खात्यात 22.20 लाख रुपये आहेत. लक्ष्मी पुरी यांच्या दोन बँक खात्यात 1.02 कोटी रुपये आहेत.
