माझ्या विरोधात महिलांची… मनोज जरांगे पाटील यांनी फोडला आणखी एक बॉम्ब; थेट मुख्यमंत्र्यांचा खास माणूस टार्गेटवर
मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप करत नवा ‘बॉम्ब’ टाकला आहे. ‘माझ्या विरोधात महिलांची टोळी तयार केली जात असून, त्या मुख्यमंत्र्यांना भेटल्या होत्या,’ असे जरांगे पाटील परभणीत म्हणाले. मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर या आरोपामुळे मोठी राजकीय खळबळ उडाली आहे. त्यांनी उपमुख्यमंत्र्यांवरही नाव न घेता निशाणा साधला.

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. आधी एक व्हिडीओ व्हायरल करून सत्ताधाऱ्यांना घाम फोडल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी आणखी एक बॉम्ब फोडला आहे. यावेळी मनोज जरांगे यांनी त्यांचा मोर्चा थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे वळवला आहे. माझ्या विरोधात महिलांची टोळी तयार केली जात आहे. काही महिला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटल्या होत्या, असा खळबळजनक आरोप जरांगे यांनी केला आहे. त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
मनोज जरांगे पाटील हे परभणीत आले होते. यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधताना हा आरोप केला. माझ्या विरोधात महिलांची टोळी बनवली जात आहे. मुख्यमंत्र्यांना काही महिला भेटल्या होत्या. मुख्यमंत्र्यांनी मला पुरावे विचारले तर मी द्यायला तयार आहे, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ओएसडीचा उल्लेख करत जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हा आरोप केला आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे.
मी करून घेणाऱ्याचा गेम…
यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही नाव न घेता निशाणा साधला. आमचा माणूस तर रोज त्याच कामात आहे. आम्ही त्यांना डोक्यावर घेऊन नाचलो. त्यांचा सन्मान वाढवला. आता तोच आमच्या विरोधात कारस्थानं करत आहे, असा हल्लाच जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर नाव घेता चढवला. तुम्हाला उंचीवर नेऊन ठेवलं याचा पश्चाताप व्हायला लागला आहे. मी करणाऱ्याला नाही, करून घेणाऱ्याचा गेम वाजवतो, असा इशाराही त्यांनी दिला.
ऑडिओ क्लिपने खळबळ
दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी 15 दिवसांपूर्वी महाराष्ट्राला एक कथित ऑडिओ क्लिप ऐकवली होती. या क्लिपमध्ये चार पाच लोकांचं संभाषण आहे. त्यातील एक महिला गंभीर आरोप करताना दिसत आहे. मनोज जरांगे यांना मॅनेज करण्यासाठी एकनाथ शिंदे यांना 500 कोटी रुपये दिल्याचं ही महिला म्हणताना दिसत आहे. ही क्लिप जरांगे यांनी ऐकवताच एकच खळबळ उडाली होती. त्यावरून शिंदे सेना आणि भाजपमध्ये चांगलीच जुंपली होती. शिंदे सेनेच्या नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली होती. फडणवीस यांनीही या प्रकरणाचा तपास करण्यासाठी एसआयटीची स्थापना केली होती. या प्रकरणाचा तपास झाल्यावरच त्यातील सत्य काय ते समोर येणार आहे.
