AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

संवादांचा सूर योग्य वाटला नाही… अशोक सराफ यांच्याबद्दल काय म्हणाले महेश लिमये?

सिनेमॅटोग्राफर आणि दिग्दर्शक महेश लिमये यांनी आदि आनंद या सिनेमात ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्यासोबत काम करण्याच अनुभव सांगितला आहे.

संवादांचा सूर योग्य वाटला नाही... अशोक सराफ यांच्याबद्दल काय म्हणाले महेश लिमये?
Ashok Saraf and mahesh LimayeImage Credit source: tv9 Marathi
| Updated on: Nov 02, 2026 | 12:41 PM
Share

मराठी चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय सिनेमॅटोग्राफर, दिग्दर्शक म्हणून महेश लिमये ओळखले जातात. प्रत्येक कथेला स्वतःची वेगळी दृश्यात्मक ओळख देणारे दिग्दर्शक म्हणून महेश लिमये यांची ओळख आहे. ते मराठीसह हिंदी सिनेसृष्टीतही प्रसिद्ध आहेत. त्यांचा आदि आनंद हा सिनेमा लवकर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यानिमित्ताने त्यांनी दिलेल्या एका मुलाखतीमध्ये अशोक सराफ यांच्याबाबत एक किस्सा सांगितला आहे.

आदि आनंद या चित्रपटात अशोक सराफ यांच्यासोबत संकर्षण कऱ्हाडे महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. अशोक सराफ यांच्यासोबत काम करण्याविषयी महेश लिमये म्हणाले की, अशोक सराफ यांचे वेळेचे नियोजन, कामाप्रती असलेला आदर आणि व्यावसायिक शिस्त विलक्षण आहे. चित्रीकरण सुरू होण्याच्या आठ दिवस आधी ते आजारी पडले होते. ‘चित्रीकरण पुढे ढकलू नका’, असं त्यांनी सांगितलं.

हॉस्पिटलमध्ये होते अशोक सराफ

पुढे ते म्हणाले की अशोक सराफ हे हॉस्पिटलमधून बाहेर आल्यानंतर आठ दिवसांतच सेटवर आले. त्यांना बोलायला थोडा त्रास होत होता, तरीही चित्रीकरण सुरळीत झाले. त्यांनतर आम्ही जवळपास आठ दिवस सलग डबिंग केले. प्रत्येक शब्द, छोटा भाग ते बारकाईनं तपासत होते. डबिंग पूर्ण झाल्यानंतर चित्रपट पाहताना मला काही संवादांचे सूर योग्य वाटले नाहीत. मग पुन्हा डबिंग करण्याबाबत मी त्यांना सांगितले.

शेवटी महेश लिमये म्हणाले की, कोणतीही कुरकुर न करता त्यांनी पुन्हा येण्याची तयारी दाखवली. त्यावेळी त्यांनी ज्या पद्धतीने डबिंग केले, ते पाहून माझ्या अंगावर अक्षरशः काटा आला. मी अक्षरशः त्यांच्या पायावर डोके ठेवले. माझ्या डोळ्यात सारखं पाणी येत होते. तेही भावूक झाले. अभिनेता म्हणून इतक्या वर्षांचा अनुभव असतानाही स्वतःच्या कामात सुधारणा करण्याची त्यांची तयारी खूप काही शिकवून गेली.

सिनेमा कधी प्रदर्शित होणार?

आजोबा आणि नातवाच्या नात्यातील धमाल, मस्ती आणि भावनिक क्षण उलगडणारा ‘आदि अनंत’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ आणि संकर्षण कऱ्हाडे ही अनोखी जोडी मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहे. हा चित्रपट 12 नोव्हेंबर 2026 रोजी प्रदर्शित होणार आहे.

Follow Us
दिया मिर्झाचा दिवाळी व्हिडिओ पालिकेने हटवला; अमित साटम यांचा आक्षेप
दिया मिर्झाचा दिवाळी व्हिडिओ पालिकेने हटवला; अमित साटम यांच्या आक्षेपानंतर काय घडलं?
दिया मिर्झाचा दिवाळी व्हिडिओ पालिकेने हटवला; अमित साटम यांच्या आक्षेपा
दिया मिर्झाचा दिवाळी व्हिडिओ पालिकेने हटवला; अमित साटम यांच्या आक्षेपानंतर काय घडलं?
ठाकरे गटाचे निष्ठावंत राजाभाऊ वाजेंना दुय्यम वागणूक? नाशिक सिंहस्थ...
ठाकरे गटाचे निष्ठावंत राजाभाऊ वाजेंना दुय्यम वागणूक? नाशिक सिंहस्थ कुंभमेळा ध्वजारोहणादरम्यान काय घडलं?
190 कोटी खर्चूनही चंद्रभागा नदी प्रदूषितच! 65 नाल्यांचे सांडपाणी थेट..
190 कोटी खर्चूनही चंद्रभागा नदी प्रदूषितच! 65 नाल्यांचे सांडपाणी थेट नदीत, आरोग्याला मोठा धोका
इंडिया आघाडीची महारॅली नव्हे, हे तर लोकशाही वाचवण्यासाठीचे बंड; संजय..
इंडिया आघाडीची महारॅली नव्हे, हे तर लोकशाही वाचवण्यासाठीचे बंड; संजय राऊतांचं विधान
मोठं चक्रीवादळ भारताच्या दिशेने; सागरी किनाऱ्याजवळच्या राज्यांना ...
Weather Alert: मोठं चक्रीवादळ भारताच्या दिशेने; सागरी किनाऱ्याजवळच्या 3 राज्यांना तातडीने अलर्ट जारी
वृक्षतोडीवरून अंबादास दानवे आक्रमक; CM फडणवीसांना पत्राद्वारे...
सोयगावमधील वृक्षतोडीवरून अंबादास दानवे आक्रमक; फडणवीसांना पत्र लिहित केली मोठी मागणी!
मोठी बातमी! तुकाराम मुंडेंच्या धडक कारवाईला अचानक स्थगिती, कारण काय?
मोठी बातमी! तुकाराम मुंडेंच्या धडक कारवाईला अचानक स्थगिती, नेमकं कारण काय?
कर्जतकरांचा एल्गार! टोरंट प्रकल्पातील वृक्षतोडीविरोधात आज कर्जत बंद,
कर्जतकरांचा एल्गार! टोरंट प्रकल्पातील वृक्षतोडीविरोधात आज कर्जत बंद, ठाकरे गट रस्त्यावर
एकीकडे दुष्काळाचे सावट, तर दुसरीकडे पुण्यात रात्रभर धो-धो पाऊस,
एकीकडे दुष्काळाचे सावट, तर दुसरीकडे पुण्यात रात्रभर धो-धो पाऊस, नागरिकांची तारांबळ