भाजपा आमदाराच्या मुलीचा प्रताप, तरुणाला भर रस्त्यात बुटाने मारलं; व्हिडीओ व्हायरल!

हा सर्व प्रकार एका बँकेच्या समोर घडला असून तो सीसीटीव्हीत कैद झाला आहे. या सर्व प्रकरणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. आमदाराच्या मुलीचे नाव प्रियंका पटेरिया असे आहे.

भाजपा आमदाराच्या मुलीचा प्रताप, तरुणाला भर रस्त्यात बुटाने मारलं; व्हिडीओ व्हायरल!
Priyanka Pateriya
Image Credit source: एक्स
| Updated on: Apr 14, 2026 | 9:30 PM

BJP MLA Daughter Video : सध्या भाजपा आमदाराच्या मुलीचा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओत आमदाराची मुलगी एका तरुणाला बुटाने मारताना दिसतेय. हा सर्व प्रकार एका बँकेच्या समोर घडला असून तो सीसीटीव्हीत कैद झाला आहे. या सर्व प्रकरणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. आमदाराच्या मुलीचे नाव प्रियंका पटेरिया असे आहे. प्रकरण चर्चेत आल्यानंतर संबंधित तरुण माझा पाठलाग करत होता, म्हणून मी त्याला मारले, असं प्रियंका पिटेरिया यांनी म्हटले आहे. परंतु पीडित तरुणाने हे सर्व नाकारले असून थेट पोलिसात धाव घेतली आहे.

नेमकं प्रकरण काय आहे?

मिळालेल्या माहितीनुसार सध्या समोर आलेला हा प्रकार छत्तीसगडमधील सागर जिल्ह्यातील देवरी विधानसभा मतदारसंघाचे भाजपाचे आमदार ब्रिजबिहारी पटेरिया यांच्या मुलीचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यांच्या मुलीचे नाव प्रियंका पटेरिया असे आहे. प्रियंका ज्या तरुणाला मारहाण करत आहेत त्याचे नाव राजेश शर्मा असे आहे. राजेश सर्मा हे सागर जिल्ह्याचे भाजपा अध्यक्ष विनीत पटेरिया (आमदार ब्रिजबिहारी यांचे बंधू) जिल्हाध्यक्षांच्या जवळचे आहेत. सोमवारी 13 एप्रिल 2026 रोजी गौरझामर या भागात एक बँक आहे. याच बँकेच्या आवारात प्रियंका यांनी राजेश शर्मा यांना बँकेच्या बाहेर बोलवून बुटाने मारलं.

तो गाडीचा पाठलाग करत होता म्हणून…

अगोदर प्रियंका यांनी राजेश शर्मा याच्याशी वाद घातला. त्यानंतर कारमध्ये उतरून त्यांनी पायातील बुटाने प्रियंकाला मारहाण केली. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर राजेश शर्मा माझ्या गाडीचा पाठलाग करत होता. त्याच्यापासून मला धोका असल्याचे मला वाटले. त्यामुळेच रागात येऊन मी त्याला मारले, असा दावा प्रियंका यांनी केला आहे.

परंतु, दुसरीकडे तू माझ्या वडिलांच्या विरोधात काम करत आहे, असे म्हणत प्रियंका यांनी राजेश शर्मा याला मारल्याचा दावा केला जात आहे. राजेश शर्मा यांनी पोलिसात या बाबत तक्रार दिली आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Follow Us