आमदार टी राजा यांनाही जामीन, मोहम्मद पैगंबर यांच्यावर केली होती टिप्पणी..

| Updated on: Nov 09, 2022 | 6:52 PM

इस्लाम धर्माचा अपमान आणि प्रक्षोभक वक्तव्य केल्याप्रकरणी तेलंगणा उच्च न्यायालयाने टी. राजा सिंह यांना जामीन मंजूर केला आहे.

आमदार टी राजा यांनाही जामीन, मोहम्मद पैगंबर यांच्यावर केली होती टिप्पणी..
Follow us on

नवी दिल्लीः इस्लाम धर्माचा अपमान आणि प्रक्षोभक वक्तव्य केल्याप्रकरणी तेलंगणा उच्च न्यायालयाने टी. राजा सिंह यांना जामीन मंजूर केला आहे. हैदराबादमधील घोशमहल येथील भाजप आमदार टी. राजा सिंह यांना मोहम्मद पैगंबर यांच्या विरोधात प्रक्षोभक विधाने केल्याप्रकरणी प्रतिबंधात्मक अटक करण्यात आली होती. न्यायालयाने आता त्यांना जामीन मंजूर केला असला तरी त्यांना काही अटीही लावण्यात आल्या आहेत. उच्च न्यायालयाने त्यांना कोणत्याही प्रकारची रॅली काढण्यास आणि कोणत्याही धर्माचा अपमान करु नये अशाही सूचना देण्यात आल्या आहेत.

तसेच कोणतीही पत्रकार परिषद, रॅली किंवा मिरवणुकीतही भाग घेता येणार नसल्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

टी. राजा सिंह यांना तेलंगणा उच्च न्यायालयाने 9 नोव्हेंबर रोजी जामीन मंजूर करण्यात आला. त्यानंतर ते तीन महिने तो सोशल मीडियावर कोणतीही पोस्ट करणार नसल्याची अटही त्यामध्ये घालण्यात आली आहे.

टी. राजा यांच्याकडून यूट्यूबवर एक व्हिडिओ अपलोड करण्यात आला होता, त्यामध्ये त्यांनी मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल अपमानास्पद टिप्पणी केली होती.

यानंतर हैदराबादसह संपूर्ण देशात खळबळ उडाली होती. त्यानंतर मात्र पीडीए अंतर्गत त्यांना अटक करण्यात आली होती. उच्च न्यायालयाच्या आदेश मिळाल्यानंतर ते जामिनावर तुरुंगातून सुटणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल टी. राजा यांनी अपमानास्पद वक्तव्य केले होते. त्या प्रकरणी त्यांना भाजपमधून निलंबित करण्यात आले होते.

त्यांनी पक्षाच्या नियमांचे उल्लंघन केल्याचे भाजपकडून स्पष्ट करण्यात आले होते. त्यानंतर टी. राजा यांनीही आपल्या भूमिकेबद्दल स्पष्टीकरण देत आपण पक्षाच्या कोणत्याही नियमांचे उल्लंघन केले नसल्याचे सांगितले होते.