ByElections Result 2022 : योगींचा करिश्मा! उत्तर प्रदेशातील आझमगड आणि रामपूर लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपचे कमळ फुलले

| Updated on: Jun 26, 2022 | 9:44 PM

2019 च्या लोकसभा निवडणुकीत सपा अध्यक्ष अखिलेश यादव यांनी आझमगडमधून तर आझम खान यांनी रामपूरमधून निवडणूक लढवली होती. सपा नेते आझम खान यांनी लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर रामपूर लोकसभा मतदारसंघात पोट निवडणूक झाली. यासाठी गुरुवारी 23 जून रोजी मतदान झाले. जिल्ह्यात सुमारे 41.71 टक्के मतदान झाले. जिल्ह्यात एकूण 1706590 मतदार असून त्यापैकी 706440 मतदारांनी मतदान केले. रविवारी 26 जून रोजी मंडी समितीत मतमोजणी झाली. दुपारी अडीचच्या सुमारास मतमोजणीचा निकाल जाहीर झाला. यामध्ये भाजपचे उमेदवार घनश्याम सिंह लोधी यांना 367397 तर सपाचे उमेदवार असीम राजा यांना 325205 मते मिळाली. त्यामुळे भाजपचे घनश्याम सिंह लोधी 42192 मतांनी विजयी झाले.

ByElections Result 2022 : योगींचा करिश्मा! उत्तर प्रदेशातील आझमगड आणि रामपूर लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपचे कमळ फुलले
Follow us on

उत्तर प्रदेशातील रामपूर लोकसभेच्या पोटनिवडणुकीत(ByElections Result 2022) भारतीय जनता पक्षाने(BJP) बाजी मारली आहे. भाजपचे घनश्याम सिंह लोधी यांनी सपाचे असीम रझा यांचा सुमारे 42192 हजार मतांनी पराभव केला. सपा नेते आझम खान यांच्या बालेकिल्ल्यात कमळ फुलले आहे. यामुळे भाजपमध्ये आनंदाची लाट उसळली आहे. भाजप उमेदवाराला एकूण 367397 मते मिळाली तर सपा उमेदवार असीम राजा यांना 325205 मते मिळाली. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ(chief minister Yogi Adityanath) यांनी उत्तर प्रदेशातील आझमगड आणि रामपूर लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपच्या विजयाबद्दल जनतेचे आभार मानले आहेत.

रामपूर लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीतील विजय हा आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या यशस्वी नेतृत्वामुळे मिळाला आहे. या विजय कार्यकर्त्यांच्या अथक परिश्रमाला समर्पित असल्याचे योगी यांनी ट्विटमध्ये म्हंटले आहे.

हे सुद्धा वाचा

रामपूर आणि आझमगड दोन्ही जागांवर भाजपचे कमळ फुलले

रामपूर आणि आझमगड लोकसभा जागांवर झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपच्या उमेदवारांनी विजय मिळवला आहे.  हा विजय मिळवत सपाचा बालेकिल्ल्याला भाजपने सुरुंग लावला आहे.

2019 च्या लोकसभा निवडणुकीत सपा अध्यक्ष अखिलेश यादव यांनी आझमगडमधून तर आझम खान यांनी रामपूरमधून निवडणूक लढवली होती. सपा नेते आझम खान यांनी लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर रामपूर लोकसभा मतदारसंघात पोट निवडणूक झाली. यासाठी गुरुवारी 23 जून रोजी मतदान झाले. जिल्ह्यात सुमारे 41.71 टक्के मतदान झाले. जिल्ह्यात एकूण 1706590 मतदार असून त्यापैकी 706440 मतदारांनी मतदान केले. रविवारी 26 जून रोजी मंडी समितीत मतमोजणी झाली. दुपारी अडीचच्या सुमारास मतमोजणीचा निकाल जाहीर झाला. यामध्ये भाजपचे उमेदवार घनश्याम सिंह लोधी यांना 367397 तर सपाचे उमेदवार असीम राजा यांना 325205 मते मिळाली. त्यामुळे भाजपचे घनश्याम सिंह लोधी 42192 मतांनी विजयी झाले.

विजयी उमेदवार घनश्याम लोधी हे एकेकाळी आझम खान यांचे निकटवर्ती आहेत. 2022 मध्येच त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. घनश्याम सिंह लोधी हे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांच्याही जवळचे मानले जातात. 2004 मध्ये झालेल्या निवडणुकीत त्यांनी कल्याण सिंह यांच्या राष्ट्रीय क्रांती पक्ष आणि मुलायम सिंह यादव यांच्या सपा यांच्या युतीच्या तिकिटावर निवडणूक लढवली आणि विजयी झाले होते.

दरम्यान, देशातील 6 राज्यांतील लोकसभेच्या तीन आणि विधानसभेच्या सात जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकांचे निकाल हाती आले आहेत. उत्तर प्रदेश, त्रिपुरा, पंजाब आणि दिल्लीत परिस्थिती स्पष्ट झाली आहे, तर आंध्र प्रदेश आणि झारखंडच्या जागांवर मतमोजणी सुरू आहे. भारतीय जनता पक्षाने (भाजप) एक लोकसभा आणि तीन विधानसभेच्या जागा जिंकल्या आहेत.  तर, पंजाबच्या संगरूर लोकसभा जागेवर आम आदमी पक्षाला (आप) धक्का बसला आहे. मात्र, राष्ट्रीय राजधानीतील राजेंद्र नगर विधानसभा जागा आपने सहज जिंकली आहे.