पत्नी अक्षता सोबत अक्षरधाम मंदिरात ब्रिटनच्या पंतप्रधान ऋषी सुनक यांनी केली पूजा

ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक आणि त्यांची पत्नी अक्षता मूर्ती यांनी दिल्लीतील अक्षरधाम मंदिराला भेट दिली. मंदिराच्या संतांनी सुनक आणि त्यांच्या पत्नीचे स्वागत केले.

पत्नी अक्षता सोबत अक्षरधाम मंदिरात ब्रिटनच्या पंतप्रधान ऋषी सुनक यांनी केली पूजा
shailesh musale | Updated on: Sep 10, 2023 | 8:14 PM

G-20 Summit 2023 : G20 परिषदेत सहभागी होण्यासाठी इंग्लंडचे पंतप्रधान ऋषी सुनक भारत दौऱ्यावर आले आहेत. परिषदेच्या दुसऱ्या दिवशी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसोबत दिल्लीतील स्वामीनारायण अक्षरधाम मंदिरात पोहोचले. अक्षरधाम मंदिराच्या संतांनी सुनक आणि त्यांच्या पत्नीचे स्वागत केले. ऋषी सुनक आणि अक्षता यांनी मंदिरात जाऊन विधीनुसार पूजा केली.

सुनक आणि अक्षता यांनी मंदिरात जलाभिषेक केला. संतांनी अक्षरधाम मंदिराचे निर्माते प्रमुख स्वामीजी महाराज यांच्या प्रतिमेवर वैदिक मंत्रांचा उच्चार केला आणि दोघांच्या मनगटावर रक्षासूत्र बांधले. सुनक यांच्या कपाळावर टिळा देखील लावला. ब्रिटीश पंतप्रधानांच्या भेटीदरम्यान संपूर्ण मंदिर परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मंदिर रोडकडे जाणारे सर्व रस्ते बंद करण्यात आले होते.

ऋषी सुनक हे भारतीय मूल्य आणि संस्कृतीशी जोडलेले

भारतीय वंशाचे ब्रिटिश पंतप्रधान ऋषी सुनक यांनी मंदिराला भेट देण्याची ही पहिलीच वेळ नाही. हिंदू धर्माशी संबंध असल्याबद्दल त्यांनी अनेकदा म्हटले आहे. G20 शिखर परिषदेत त्यांनी ANI या वृत्तसंस्थेला सांगितले की, “मला हिंदू असल्याचा अभिमान आहे”. ब्रिटनचे पंतप्रधान झाल्यानंतर सुनक यांचा हा पहिलाच भारत दौरा आहे.

G20 बैठकीला जाण्यापूर्वी सुनक यांनी पंतप्रधान मोदींचे कौतुक केले होते. सुनक म्हणाले की, मला पंतप्रधान मोदींबद्दल खूप आदर आहे. G20 आणि भारताच्या अध्यक्षपदाबद्दल बोलताना ते म्हणाले की G20 यशस्वी करण्यासाठी भारताला पाठिंबा देण्यास ते तयार आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us