बहिणीच्या हळदीच्या कार्यक्रमात नाचताना भावाचा मृत्यू, मृतदेह घरात ठेऊन लावले लग्न

| Updated on: Mar 17, 2023 | 10:44 AM

घरात बहिणीच्या नव्या घरी जाण्याचा उत्सव म्हणजे विवाह समारंभ सुरु होता. भाऊ आनंदाने नाचत होता. काय झाले ते कळालेच नाही. तो खाली पडला. मग काळजावर दगड ठेवून विवाह संस्कार पार पाडला.

बहिणीच्या हळदीच्या कार्यक्रमात नाचताना भावाचा मृत्यू, मृतदेह घरात ठेऊन लावले लग्न
लोचन गुप्ता परिवार
Image Credit source: टीव्ही९ नेटवर्क
Follow us on

सिद्धार्थनगर : लग्न म्हणजे घरात आनंदाचे वातावरण. बहिणीचे लग्न असेल तर भावाच्या उत्साह वेगळाच असतो. आपल्या लाडक्या बहिणीला नव्या घरी पाठवण्याची तयारी तो जोमाने करत असतो. त्याच वेळी बहीणसुद्धा वर्षानुवर्ष सोबत राहिलेल्या भावाला सोडून जात असताना भावनावश होते. परंतु बहिणीच्या नव्या घरी जाण्याचा उत्सव सुरु असताना भाऊच कायमचा गेला. मग त्या कुटुंबियाने काळजावर दगड ठेवून भावाचा मृतदेह घरात ठेऊन विवाह संस्कार पार पाडले.

उत्तर प्रदेशातील सिद्धार्थनगरमधील चिल्हिया शहरातील ही घटना आहे. चिल्हिया शहरातील रहिवासी असलेल्या लोचन गुप्ता यांच्यांवर हा बिकट प्रसंग ओढवला. त्यांच्या मुलीचे लग्न गोरखपूर जिल्ह्यातील सिंगोरवा गावात निश्चित झाले होते. 13 मार्च रोजी त्यांचे लग्न होणार होते. सोमवारी सायंकाळी मिरवणूक येणार होती आणि दिवसभर वधूच्या हळदीचा विधी सुरू होता.

हे सुद्धा वाचा

दरम्यान, घरातील होम थिएटरवर संगीत सुरू होते आणि मुले, मुली, महिला नाचत होत्या. वधूचा १९ वर्षांचा भाऊ बैजूही आनंदाने नाचत होता. नाचत असताना तो अचानक खाली पडला. बैजू पडल्यानंतर तो बेशुद्ध झाला त्याला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण त्याचा मृत्यू झाला होता. त्याचा मृत्यू हृदयविकाराचा झटका आणि मेंदूची रक्तवाहिनी फुटल्यामुळे झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

आनंदी वातावरण झाले शोकाकूल

दुसरीकडे, बैजू यांच्या मृत्यूची माहिती मिळताच लग्नाच्या आनंदात असणाऱ्या महिलांनी रडू कोसळले. काही वेळातच लग्नाच्या आनंदाचे रूपांतर शोकाकूल वातावरणात झाले. घटनेनंतर काही वेळातच वरात पोहचली होती. मग घरात बैजूचा मृतदेह ठेऊन लग्नाचा विधी पार पडला गेला.

अन् केली बिदाई

पहाटे ४ वाजता वधूच्या वडिलांनी आपल्या मुलीची बिदाई केली. त्यानंतर बैजूच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याचवेळी भावाच्या मृतदेहाजवळ बसून बहीण रडत होती. ती वारंवार म्हणायची की बाबू डोळे उघड! मी जात आहे, परंतु तिचा लाडका बाबू डोळे उघडत नव्हता. तो सर्वांच्या डोळ्यात दु:खाचे आश्रू देऊन हे जग सोडून गेला होता.