ही वस्तू महिन्यातून फक्त एकदा जाळा, साप घरातच काय पुन्हा परिसरात सुद्धा दिसणार नाहीत

पावसाळ्याच्या दिवसांमध्ये अनेकदा तुमच्या परिसरात आजू-बाजुला साप आढळून येतात. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये सापांचा मुक्तसंचार असतो, त्यामुळे सर्पदंशाच्या घटनांमध्ये वाढ होते. सतर्क राहिल्यास अशा घटना टळू शकतात.

ही वस्तू महिन्यातून फक्त एकदा जाळा, साप घरातच काय पुन्हा परिसरात सुद्धा दिसणार नाहीत
snake
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Aug 28, 2026 | 10:09 PM

पावसाळ्याच्या दिवसांत सर्पदंशाच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होते. त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे या काळात साप हे बिळात न राहता जमिनीवर येतात, पावसाळ्यामध्ये सापांच्या बिळात पाणी घुसतं, त्यामुळे ते सुरक्षित निवाऱ्याच्या शोधात इकडे तिकडे फिरत असतात. सापांना नेहमी जिथे आर्द्रता जास्त असते अशी जागा निवाऱ्यासाठी आवडते. जर तुमच्याही घरात अशी जागा कुठे असेल तर साप येऊ शकतात. त्यामुळे सर्पदंशाचा धोका वाढतो. तसेच या काळात तुमच्या घराच्या आसपास जर बाग असेल किंवा मोकळी जागा असेल तर अशा ठिकाणी गवत मोठ्या प्रमाणात वाढतं, त्यामुळे तिथे देखील साप लपून बसण्याची शक्यता असते. अडचण असल्यामुळे तुमचं लक्ष लवकर तिकडे जात नाही, साप दिसत नाही. अशा स्थितीमध्ये जर त्याला तुमचा धोका जाणवला तर तो तुम्हाला चावा घेऊ शकतो, त्यामुळे योग्य ती खबरदारी घेतली पाहिजे.

भारतामध्ये सामान्यपणे सापांच्या चारच विषारी प्रजाती आहेत, परंतु अनेकदा आपण गैरसमजातून सापांना मारतो, त्यामुळे सापांच्या अनेक दुर्मिळ प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे तुम्हाला कुठेही साप दिसला तर त्याला मारू नका, किंवा पकडण्याचा देखील प्रयत्न करू  नका, त्याची माहिती तुम्ही सर्पमित्रांना द्या, ते सापांना रेस्क्यू करतील. तसेच समजा जर कोणाला चूकून सर्पदंश झालाच तर वेळ न घालवता अशा व्यक्तीला तातडीने वैद्यकीय मदत उपलब्ध करून द्या, त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करा.

साप घरात येऊ नये, म्हणून अनेक जण विविध उपाय करत असतात. साप घरात येऊ नये, यासाठी सर्वात महत्त्वाचा आणि सोपा उपाय म्हणजे घर आणि घराचा परिसर स्वच्छ ठेवणं, कुठल्या प्रकारची अडचण किंवा गवत वाढणार नाही, याची काळजी घेणं. यासोबतच ग्रामीण भागातील लोक सापांसाठी आणखी एक उपाय करतात तो म्हणजे जर साप घरात लपला आहे, सापडत नाही, अशी जर शंका असेल तर घरामध्ये कांद्याचं बी जाळलं जातं. काद्यांच्या बीयाण्याला तीव्र असा विशिष्ट वास असतो. त्यामुळे साप जरी घरात असेल तर तो दूर निघून जातो, असं मानलं जातं.

 

Follow Us