व्यावसायिक जेव्हा वाहन पूजा करण्यासाठी आपलं नवीन हेलिकॉप्टर घेऊन मंदिरात पोहोचतो

याआधी तुम्ही वाहन पूजा करण्यासाठी गाडी किंवा बाईक घेऊन लोकं मंदिरात पोहोचल्याचं पाहिलं असेल. पण कोणी हेलिकॉप्टर घेऊन आल्याचं पाहिलंय का?

व्यावसायिक जेव्हा वाहन पूजा करण्यासाठी आपलं नवीन हेलिकॉप्टर घेऊन मंदिरात पोहोचतो
| Updated on: Dec 15, 2022 | 10:13 PM

हैदराबाद : नवीन कार, नवीन बाईक किंवा आपण घरात कोणतीही नवीन वस्तू घेतली की आधी त्याची पूजा (Vahan Puja) करतो. ही आपल्याकडे अनेक वर्षांपासून सुरु असलेली पंरपराआजही कायम आहे. नवीन गाडी घेतल्यानंतर अनेक जण ती त्याच्या पूजेसाठी मंदिरात घेऊन जातो. वाहनपर्यंत तर ठीक होतं. पण एका व्यक्तीने तर चक्क हेलिकॉप्टरची पूजा ( Helicopter Vahan Puja ) करण्यासाठी ते थेट मंदिराजवळ घेऊन आला. हैदराबादमधील एका व्यावसायिकाने आपल्या नवीन खासगी हेलिकॉप्टरची पूजा करण्यासाठी हेलिकॉप्टर मंदिरात आणलं. ज्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. ( Businessman Took His Brand New Helicopter to Temple for Vahan Puja )

बोनीपल्ली श्रीनिवास राव असं या व्यापारीचं नाव आहे. ज्याने आपले हेलिकॉप्टर मंदिरात पूजेसाठी आणले होते. श्रीनिवास राव हे प्रथमा ग्रुपचे मालक आहेत. नवीन हेलिकॉप्टर ACH-135 वाहन पूजेसाठी यादद्री येथील श्री लक्ष्मी नरसिंह स्वामी मंदिराजवळ आणले. त्यांनी पुजाऱ्यांमार्फत हेलिकॉप्टरची विशेष पूजा करुन घेतली. पुजाऱ्यांनी पारंपरिक पद्धतीने सर्व विधी पार पाडले. या हेलिकॉप्टरची किंमत 5.7 दशलक्ष डॉलर्स एवढी आहे.

आपल्याकडे कोणतीही नवीन वस्तू घेतली की त्याची पूजा करण्याची परंपरा आहे. दसरा, दिवाळी, अक्षय तृतिया अशा वेगवेगळ्या मुहूर्तावर किंवा शुभ दिवशी आपण एखादी वस्तू विकत घेतो. हा भारतीय संस्कृतीचा एक भाग आहे. पण या बातमीने अनेक जण हैराण झाले आहेत. कारण याआधी मंदिरात हेलिकॉप्टरची पूजा केल्याचे कोणी ऐकले नव्हते. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. lateefbabla यांनी ट्विटरवर हा व्हिडिओ पोस्ट केला आहे.