Swiggy Food : स्विगीवरून फुड ऑर्डर करा अन् फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये राहा, जाणून घ्या नेमकं कसं?

तुम्ही स्विगीवरून फुड ऑर्डर करत असाल तर तुम्हाला आलिशान हॉटेलमध्ये राहण्याची चांगली संधी मिळू शकते. त्यासाठी काय करावे लागेल? आलिशान हॉटेलमध्ये स्टे कसा शक्य आहे, ते जाणून घेऊ या...

Swiggy Food : स्विगीवरून फुड ऑर्डर करा अन् फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये राहा, जाणून घ्या नेमकं कसं?
swiggy and five star hotel
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Mar 14, 2026 | 8:55 PM

Swiggy Hotel Marriott Stay : स्विगी या ऑनलाईन फुड डिलेव्हरी प्लॅटफॉर्मवरून जेवण ऑर्डर केल्यावर तुम्हाला थेट आलिशान हॉटेलमध्ये राहण्याची संधी मिळू शकते. जगातील प्रसिद्ध हॉटेल चेन मॅरियट (Marriott) आणि स्विगीने एक करार केला आहे. तुम्ही स्विगीवर जेवणाची ऑर्डर दिली तर तुम्हाला मॅरियट हॉटेलमध्ये राहण्याची संधी मिळू शकते. हे नेमकं कसं शक्य होईल, ते जाणून घेऊ या…

नेमकी योजना काय आहे?

मॅरियट बॉनवॉय पॉइंट्सच्या मदतीने तुम्हाला मॅरियट हॉटेलमध्ये स्टे मिळू शकतो. स्विगी आणि मॅरियट यांच्यात झालेल्या करारानुसार तुम्ही स्विगीवरून जेवण ऑर्डर केले तर तुम्हाला बॉनवॉय पॉइंट्स मिळतील. ही ऑफर स्विगीच्या सर्व सेवांवर म्हणजेच फुड डिलिव्हरी, इन्स्टामार्ट, डाऊनआऊट (रेस्टॉरंट बुकिंग) या सेवांनाही लागू आहे. हे पॉइंट्स कमवण्यासाठी तुम्हाला Marriott Bonvoy आणि Swiggy अकाउंट एकमेकांशी लिंक करावेल लागेल. त्यानंतर स्विगी अॅफवर जाूऊ तुम्हाला पार्टनर रिवॉर्ड्स (Partner Rewards) सेक्शन सेक्शनमध्ये जावे लागेल. तिथे तुम्हाला तुमचे रिवॉर्ड्स दिसतली.

फुड डिलिव्हरीवर एक्स्ट्रा डिस्काउंट

तुमच्याकडे मॅरियट बॉनवॉयची एलिट मेंबरशीप असेल (सिल्व्हर, गोल्ड, प्लॅटिनम, टायटेनियम, अॅम्बेसिडर आदी,) तर तुम्हाला स्विगी वनची मेंबरशीप मोफत मिळणार आहे. यामुळे तुम्ही स्विगीवरून काहीजरी ऑर्डर केले तर तुमच्याकडून डिलिव्हरी चार्जेस घेतले जाणार नाहीत. सोबतच तुम्हाला एक्स्ट्रा डिस्काऊंटही मिळेल.

मॅरियट बॉनवॉय पॉइंट्सचे गणित काय?

तुम्ही स्विगीवरून 1000 रुपयांचे जेवण ऑर्डर केले तर तुम्हाला 10 मॅरियट बॉमवॉय पॉइंट्स मिळतील. तुम्ही 3500 रुपयांचे जेवण ऑर्डर केले तर तुम्हाला 35 मॅरियट बॉनवॉय पॉइंट्स मिळतील. तुम्ही महिन्याला स्विगीवरून 10 हजार रुपयांचे जेवण मागवले तर तुमच्या खात्यात वर्षभरात 1200 पॉइंट्स जमा होतील. हॉटेल मॅरियटमध्ये वन नाईट स्टे करायचा असेल तर 20 ते 50 हजार रुपयांपर्यंत पैसे लागतात. त्यामुळे फक्त स्विगीच्या जीवावर तुम्हाला मॅरियट हॉटेलमध्ये राहता येणं थोडं मुश्कील वाटतं. परंतु तुम्ही तुमच्या हॉटेल स्टेला क्रेडिट कार्ड पॉइंट्सोबत जोडले तर कदाचित तुम्हाला मॅरियट हॉटेलमध्ये राहता येऊ शकते.

Follow Us