पक्ष फुटल्यानंतर ममता बॅनर्जींचा सर्वात मोठा विजय, फुटीर गटाला जबर धक्का, कोर्टातून थेट आदेश आला!

तृणमूल काँग्रेस पक्षाने विधानसभा अध्यक्षांना दिलेल्या पत्रात अनेक आमदारांच्या खोट्या सह्या होत्या, असा दावा ऋतब्रत ब्रनर्जींनी केला होता. परंतु आता न्यायालयाने आपला निर्णय देऊन ऋतुब्रत बॅनर्जी यांची नियुक्ती रद्द करून डीएमसीला धक्का दिलाय.

पक्ष फुटल्यानंतर ममता बॅनर्जींचा सर्वात मोठा विजय, फुटीर गटाला जबर धक्का, कोर्टातून थेट आदेश आला!
mamata banerjee
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 27, 2026 | 4:56 PM

West Bengal : एकीकडे देशात मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाची चर्चा सुरू आहे. हे विधेयक मंजूर करण्यासाठी केंद्र सरकारने पूर्ण ताकद लावलंय. असं असतानाच पश्चिम बंगालमध्ये मोठी घडामोड समोर आलीय. बंगालमध्ये उच्च न्यायालयाने तृणमूल काँग्रेसच्या फुटीर गटाला जबर धक्का दिलाय. विधानसभा अध्यक्षांनी फुटीर गटातील ऋतुब्रत बॅनर्जी यांची विरोधी पक्षनेतेपदाची नियुक्ती उच्च न्यायालयाने रद्द केलीय. तसेच विरोधी पक्षनेत्याच्या नियुक्तीवर नव्याने निर्णय घ्यावा, असे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत.

नेमका निर्णय काय?

माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षाचे दोन तुकडे झाले आहेत. दुसऱ्या गटाचे नेतृत्त्व ऋतुब्रत बॅनर्जी करत आहेत. बंगालच्या विधानसभा अध्यक्षांनी ऋतुब्रत बॅनर्जी यांनी विरोधी पक्षनेतेपद दिले होते. याच निर्णयाला ममता बॅनर्जी गटातील शोभनदेब चटोपाध्याय यांनी आक्षेप घेत याचिका दाखल केली होती. यावरच सुनावणी पूर्ण झाल्यानंतर उच्च न्यायालयाने ऋतुब्रत बॅनर्जी यांची नियुक्ती रद्द केली आहे. न्यायालयाचा हा निर्णय म्हणजे डेमोक्रॅटिक तृणमूल काँग्रेस पक्षाला मोठा झटका असल्याचे बोलले जात आहे.

Loading...

ममता बॅनर्जींच्या गटाने काय आक्षेप घेतला होता?

शोभनदेब चट्टोपाध्याय यांना विरोधी पक्षनेतेपद देण्याबाबत अगोदरच निर्णय झाला होता. तरीदेखील विधानसभेच्या अध्यक्षांनी पक्षाचे मत मान्य केले नाही. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर 6 मे 2026 रोजी तृणमूल काँग्रेस पक्षाची बैठक झाली होती. या बैठकीत शोभनदेब चट्टोपाध्याय यांची विरोधी पक्षनेता म्हणून नेमणूक करण्यावर शिक्कामोर्तब झाले होते. या बैठकीत ऋतुब्रत बॅनर्जी यांच्यासह 70 आमदार उपस्थित होते. त्यानंतर 19 मे 2026 रोजी चटोपाध्याय यांच्या नावाचे पत्र विधानसभा अध्यक्षांना देण्यात आले होते, असा दावा याचिकेत करण्यात आला होता.

दुसरीकडे तृणमूल काँग्रेस पक्षाने विधानसभा अध्यक्षांना दिलेल्या पत्रात अनेक आमदारांच्या खोट्या सह्या होत्या, असा दावा ऋतब्रत ब्रनर्जींनी केला होता. परंतु आता न्यायालयाने आपला निर्णय देऊन ऋतुब्रत बॅनर्जी यांची नियुक्ती रद्द करून डीएमसीला धक्का दिलाय. विरोधी पक्षनेता कोण असेल, यावर दहा दिवसात निर्णय घ्यावा, असे निर्देशही न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना दिले आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us