दोन वर्षांचे एक्सटेन्शन मिळालेल्या अग्निवीरांना विवाह करता येईल काय ? काय आहे नियम

अग्निवीरांना आता चार वर्षापासून आणखी दोन वर्षांची मुदतवाढ दिली आहे. मात्र, आता त्यांना विवाह करण्याची परवानगी मिळणार की नाही यावरुन संभ्रम कायम आहे.

दोन वर्षांचे एक्सटेन्शन मिळालेल्या अग्निवीरांना विवाह करता येईल काय ? काय आहे नियम
agniveer first batch
| Updated on: Nov 05, 2026 | 9:40 PM

अग्निपथ योजने अंतर्गत सैन्यात भरती होणाऱ्या अग्निवीरसाठी आता दोन वर्षांचा अतिरिक्त सेवा विस्तार देण्यात आला आहे. या निर्णयानंतर आता लग्न आणि कुटुंबा संदर्भातील नियमांची चर्चा सुरु झाली आहे. सध्या नियमानुसार चार वर्षांच्या सेवे दरम्यान अग्निवीरांना लग्न न करण्याची अट आहे. मात्र, आता दोन वर्षांचे एक्सटेन्शन दिल्याने हा कालावधी सहा वर्षांचा झाला आहे. त्यामुळे आता अग्निवीरांना लग्नाची अनुमती दिली जाणार आहे की नाही असा सवाल निर्माण झाला आहे.

भारतीय सैन्यात ‘अग्निपथ योजना’ नुसार तरुणांना सैन्यात देश सेवा करण्याची संधी दिली जाते. या तरुणांना चार वर्षानंतर निवृत्ती दिली जाणार होती. मात्र, आता संरक्षण मंत्रालयाने अग्निवीरांना आणखीन दोन वर्षांचा सेवा विस्तार देण्याचा निर्णय घेतला आहे. या नव्या नियमानुसार आता ७५ टक्के अग्निवीर चार वर्षानंतर निवृत्त न होता, त्यांना दोन वर्षांची मुदतवाढ मिळाली आहे.

Loading...

या नियमाने तरुणांना करीयर संदर्भात जरी दिलासा मिळाला असला तर त्यांच्या मनात एक प्रश्न आहे की आता दोन वर्षांच्या सेवेत विवाह करण्याची परवानगी मिळणार आहे की नाही ? की सहा वर्षे त्यांना आता अविवाहित राहावे लागणार आहे.

सध्याच्या नियमात अग्निपथ योजनेच्या अटीत उमेदवार भरती होताना अविवाहित असणे ही पहिली अट आहे. तसेच सेवेत असताना चार वर्षांत त्याला विवाह करण्याची परवानगी दिलेली नाही. सैन्यदलातील सुरुवातीचे चार वर्षे कठोर ट्रेनिंग दिले जाते. ऑपरेशनल जबाबदारी दिली जाते. सैन्याच्या शिस्तीनुसार जवानाचे संपूर्ण लक्ष देशाचे संरक्षण आणि सेवेत असणे अपेक्षित असते. तसेच जे युवक नियमित सैनिक होऊ इच्छीत आहेत.त्यांच्यासाठी निवड प्रक्रिया आणि अंतिम निकाल येईपर्यंत अविवाहित राहण्याची अट आहे.

अग्निवीर १७.५ ते २१ वयात सैन्यात भरती होतात. त्यांना चार वर्षांची सेवा केल्यानंतर निवृत्त दिली जाणार होती. आता मात्र,त्यांना दोन वर्षांचा अतिरिक्त सेवा काल देण्यात आला आहे. अनेक जवान या काळात २४ ते २६ वयोगटात पोहचतात. या वयात सामाजिक आणि कौटुंबित जीवनाची सुरुवात आणि लग्न आणि गृहस्थाश्रम सुरु होतो.

संरक्षण मंत्रालय आणि संबंधित खाते आता विचार करत आहेत की अग्निवीरांना या दोन वर्षांत लग्न आणि कुटुंब संदर्भातील नियमात सुट मिळेल की नाही.

संरक्षण दलातील सूत्रांनुसार सुधारित अग्निपथ ढाच्यानुसार चार वर्षांहून अधिक काळ सेवा देणाऱ्या अग्निवीरांना कौटुंबिक संदर्भात नियमांचा आढावा घेत आहेत. मात्र, सध्याचे नियम लागलीच बदलतील असे नाही. सुरुवातीच्या चार वर्षांत विवाह न करण्याचा नियम कायम आहे. मात्र, अतिरिक्त दोन वर्षांच्या विस्तारात या नियमांत बदल होऊ शकतो यावर विचार सुरु आहे. दोन वर्षांच्या अतिरिक्त काळात पर्सनल आणि फॅमिली लाईफची गरज म्हणून नियमात बदल करण्यावर जरुर विचार केला जाऊ शकतो.

अग्निवीरांकडे काय मार्ग

चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) जनरल एन.एस. राजा सुब्रामणी यांनी घोषीत केल्या सुधारित नियमानुसार चार वर्षे पूर्ण केलेल्या जवानांपुढे दोन मार्ग उपलब्ध असतील.

नियमित कॅडर – ज्या सुमारे २५ टक्के अग्निवीरांची निवड पर्मानंट रेग्युलर सर्व्हीससाठी केला जाईल त्यांना नियुक्तीनंतर लग्न करण्याची अनुमती असणार आहे.

दोन वर्षांचे एक्सटन्शन –  उरलेले ७५ टक्के जवान जे दोन वर्षांचा अतिरिक्त कार्यकाळ निवडतील, त्यांच्यासाठी संरक्षण मंत्रालयाचे पुढील दिशा-निर्देशच ठरवतील की या दरम्यान त्यांना विवाहाची परवानगी दिली जाईल की नाही .

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us