शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान पोहोचले बालपणीच्या शाळेत, हायजीन किचन, स्मार्ट क्लासरूमचे केले उद्घाटन!

केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी त्यांच्या लहाणपणीच्या शाळेला भेट दिली. या भेटीनंतर त्यांनी ट्विटर खात्यावर एक पोस्ट केली आहे.

शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान पोहोचले बालपणीच्या शाळेत, हायजीन किचन, स्मार्ट क्लासरूमचे केले उद्घाटन!
dharmendra pradhan
| Updated on: Jul 03, 2025 | 3:14 PM

Dharmendra Pradhan : आपल्या शाळेशी प्रत्येकाचंच एक खास भावनिक नातं असतं. शाळेच्या प्रांगणात गेलं की शालेय जीवनातील घटना आठवायला लागतात. सर्व आठवणी ताज्या होतात. असंच काहीसं केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यासोबत घडलंय. त्यांनी नुकतेच त्यांच्या लहाणपणीच्या शाळेला भेट दिली. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांसोबत हितगुज केलं. तसेच आपल्या शालेय दिवसातील आठवणींत रममाण झाले.

केंद्रीय शिक्षणमंत्री पोहोचले लहाणपणीच्या शाळेत

धर्मेंद्र प्रधान यांनी ओडिशा राज्यातील तालचेर येथील हांडीधुआं प्राथमिक शाळेतून शिक्षण घेतलेलं आहे. याच शाळेला त्यांनी भेट दिली. आपल्या लहाणपणीच्या शाळेला भेट दिल्यानंतर धर्मेंद्र पधान त्यांच्या जुन्या आठवणींत रमून गेले. विशेष म्हणजे या शाळेला भेट दिल्यानंतर त्यांनी सोशल मीडियावर भावनाही व्यक्त केल्या आहेत.

हायजीन किचन, नव्या इमारतीचे केले उद्घाटन

धर्मेंद्र प्रधान यांनी शाळेला फक्त भेटच दिली नाही. तर ते ज्या शाळेतून शिकले, त्या शाळेतील विद्यार्थ्यांना कशाचीही कमतरता भासू नये, याकडेही त्यांनी लक्ष दिले. त्यांनी शाळेसाठी वेगवेगळ्या सुविधा देऊ केल्या आहेत. धर्मेंद्र प्रधान यांनी त्यांच्या लहाणपणीच्या शाळेत जाऊन तेथे स्मार्ट क्लासरुमे उद्घाटन केले. तसेच विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे आणि चांगले जेवण मिळावे यासाठी त्यांनी या शाळेत हायजीन किचनचेही उद्घाटन केले. त्यांनी 76 व्या वन मोहोत्सवाअंतर्गत शाळेच्या परिसरात वृक्षारोपणही केले.

धर्मेंद्र प्रधान यांनी कोणत्या भावना व्यक्त केल्या?

धर्मेंद्र प्रधान यांनी त्यांच्या लहाणपणीच्या शाळेला भेट दिल्यानंतर एक्स या समाजमाध्यमावर एक पोस्ट केली आहे. मी माझ्या लहाणपणीच्या तालचेर येथील हांडीधुआं प्राथमिक शाळेला भेट दिली. या शाळेत आल्याने माझे मन भारावून गेले आहे.याच प्रांगणाने मला अक्षरांचं ज्ञान दिलं. स्वप्न दिले. याच शाळेत माझ्यातील मूल्यांची रुजवण झाली. आज येथे स्मार्ट क्लासरूम, हायजीन किचन, नवीन इमारत, डायनिंग हॉल यांचं द्घाटन केलं. हा एक भावनिक आणि आध्यात्मिक अनुभव होता, अशा भावना धर्मेंद्र प्रधान यांनी व्यक्त केल्या आहेत.