परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्या सुरक्षेत वाढ, पाहा काय आहे कारण

S Jaishankar : केंद्र सरकारने परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांची सुरक्षा 'Y' श्रेणीवरून 'Z' केली आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने केंद्रीय राखीव पोलीस दलाला (CRPF) त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी घेण्यास सांगितले आहे. दिल्ली पोलिसांनी याआधी त्यांना 'वाय' श्रेणीच्या सुरक्षा दिली होती.

परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्या सुरक्षेत वाढ, पाहा काय आहे कारण
| Updated on: Oct 12, 2023 | 8:40 PM

नवी दिल्ली : परराष्ट्र मंत्री एस जयशंकर ( S jaishankar Security ) यांच्या सुरक्षेत वाढ करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्या सुरक्षेत वाढ केली आहे. एस जयशंकर यांना आता Y ऐवजी Z श्रेणीची सुरक्षा मिळणार आहे. आयबीच्या धमकीच्या अहवालाच्या आधारे केंद्रीय गृहमंत्रालयाने परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्या सुरक्षेत वाढ केल्याचे सांगितले जात आहे. परराष्ट्रमंत्र्यांना दिल्ली पोलिस कमांडोकडून Y श्रेणीची सुरक्षा होती.

सीआरपीएफकडे सुरक्षेची जबाबदारी

केंद्रीय गृह मंत्रालयाने केंद्रीय राखीव पोलीस दलाला (सीआरपीएफ) एस जयशंकर यांच्या सुरक्षेची जबाबदारी दिली आहे.  68 वर्षीय परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांना दिल्ली पोलिसांच्या सशस्त्र पथकाने ‘वाय’ श्रेणीच्या सुरक्षा दिली होती.

CRPF कडे 176 व्हीआयपींच्या व्यक्तीची जबाबदारी

परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांना आता ‘झेड’ श्रेणीच्या सुरक्षा कवचाखाली CRPF द्वारे संरक्षित केले जाईल. ज्यामध्ये सुमारे 14-15 सशस्त्र कमांडो चोवीस तास त्यांच्यासोबत असतील. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि काँग्रेस नेते सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी वाड्रा यांच्यासह सीआरपीएफकडे सध्या 176 दिग्गज व्हीआयपी व्यक्तींच्या सुरक्षेची जबाबदारी आहे.

सुब्रमण्यम जयशंकर यांनी अमेरिका, चीन आणि आसियानचे सचिव होते. सोव्हिएत युनियनच्या विघटनापूर्वी आणि श्रीलंकेत भारतीय सैन्याच्या शांतता मोहिमेदरम्यान त्यांची मॉस्कोमध्ये नियुक्ती करण्यात आली होती. भारत आणि अमेरिका यांच्यातील इंडो न्यूक्लियर करारात त्यांची महत्त्वाची भूमिका होती.