Tirupati Temple Donation: बापरे! तिरुपतीला तब्बल 208 कोटींचं 121 किलो सोनं अर्पण; ‘या’ जोडप्याचीच सर्वत्र चर्चा

Tirupati Temple Donation: चेन्नई येथील एका जोडप्याने तिरुपती मंदिराला तब्बल 206 कोटी रुपयांचं 121 किलो सोनं अर्पण केलं आहे. तर आता तुम्हाला देखील प्रश्न पडला असेल की, हे दान कोणत्या जोडप्याने केलं आहे. त्या जोडप्याचं नाव समोर आलं असून सध्या सर्वत्र त्याच जोडप्याची चर्चा सुरु आहे.

Tirupati Temple Donation: बापरे! तिरुपतीला तब्बल 208 कोटींचं 121 किलो सोनं अर्पण; या जोडप्याचीच सर्वत्र चर्चा
| Updated on: Nov 27, 2026 | 11:36 AM

Tirupati Temple Donation: असंख्य भाविक असे असतात, त्यांची ज्या देवावर श्रद्धा आहे, त्या मंदिरात जाऊन दान करतात. असं म्हणतात की, सर्वात जास्त दान तिरुपती येथे होतं. आता तर एका जोडप्याने तब्बल 208 कोटी रुपयांचं सोनं देवाला अर्पण केलं आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, आंध्र प्रदेशातील तिरुमला येथील भगवान व्यंकटेश्वर मंदिराला चेन्नईतील एका जैन दाम्पत्याने सुमारे 208 कोटी रुपये किमतीचं सोनं आणि हिऱ्यांचे दागिने दान केले आहेत. वर्धमान जैन आणि त्यांच्या पत्नी राधिका जैन यांनी मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांच्या उपस्थितीत तिरुमला तिरुपती देवस्थानम (TTD) कडे हे दान सुपूर्द केलं आहे. सध्या त्यांचे फोटो सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल होत आहेत. TTD च्या सूत्रांनुसार, भाविकाने भगवान व्यंकटेश्वरांना दिलेले हे आतापर्यंतचे सर्वात मोठं दान असल्याचं सांगितलं आहे.

अधिकृत माहितीनुसार, या दानामध्ये नऊ सेटमध्ये एकूण 46 दागिन्यांचा समावेश आहे. यामध्ये भगवान व्यंकटेश्वरांचा सोन्याचा मुकुट, चरणालंकार आणि विविध प्रकारच्या रत्नजडित दागिन्यांचा समावेश आहे. या दागिन्यांमध्ये सोन्याचे वाघनख, विविध डिझाइनच्या सोन्याच्या साखळ्या, मुकुट आणि मौल्यवान रत्नांचाही समावेश आहे. दान केलेल्या दागिन्यांपैकी 106 किलो सोने भगवान श्रीवरू अर्थात भगवान व्यंकटेश्वरांसाठी अर्पण करण्यात आले आहे. तर उर्वरित15 किलो वजनाचे दागिने आणि वस्त्रे देवी श्री पद्मावती अम्मावरू यांना अर्पण करण्यात आली आहेत.

Loading...

काय म्हणाले मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू?

मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू एवढं मोठं दान करणाऱ्या जैन जोडप्याचे आभार मानले आहेत. मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू म्हणाले, ‘गवान श्रीवरू यांच्या महिमेचे वर्णन शब्दांत करता येणार नाही. तिरुमलामध्ये आज एक अभूतपूर्व घटना पाहायला मिळाली आहे. या ऐतिहासिक क्षणाचा भाग होता आले, याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजतो, असे नायडू यांनी सांगितलं. भगवान व्यंकटेश्वरांना दररोज सुमारे 120 किलोग्रॅम सोन्याच्या दागिन्यांनी सजवलं जातं.

मुख्यमंत्री असं देखील म्हणाले की, TTD ही एक पारदर्शक संस्था आहे, मंदिर व्यवस्थापन आपल्या संसाधनांचा वापर भक्तांच्या हितासाठी करतं. व्यवस्थापनाला मंदिराचे पावित्र्य जपण्याचं आणि गोसंरक्षणासाठी कार्य करण्याचं आवाहन देखील त्यांनी केलं. TTD च्या मदतीने पाच हजार मंदिरांची उभारणी केली जाईल, असं देखील नायडू यांनी जाहीर केले. तसेच, जिथे जिथे मंदिरे असतील, तिथे भक्तांसाठी ‘अन्न प्रसादम’ म्हणजेच मोफत भोजनाची व्यवस्था केली जावी, अशी सूचनाही त्यांनी दिली.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us