AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Yogesh Kadam on Manoj Jarange: ते तर सुपारी घेऊन… योगेश कदम यांचा मनोज जरांगे यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाले आता…

Yogesh Kadam on Manoj Jarange: 500 कोटींच्या ऑडिओ बॉम्बपासून कदम विरुद्ध जरांगे असा सामना उभा महाराष्ट्र पाहत आहे. जरांगे पाटील यांनी एसआयटी पथक आल्यानंतरही कदम यांच्या नावाचा धोशा लावला होता. आता गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी जरांगे पाटील यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केल्याने खळबळ उडाली आहे.

Yogesh Kadam on Manoj Jarange: ते तर सुपारी घेऊन... योगेश कदम यांचा मनोज जरांगे यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाले आता...
ते तर सुपारी घेऊन... योगेश कदम यांचा मनोज जरांगे यांच्यावर गंभीर आरोप
| Updated on: Nov 27, 2026 | 11:34 AM
Share

Yogesh Kadam on Manoj Jarange: मनोज जरांगे पाटील यांनी दोन वर्षांपूर्वीच्या कथित 500 कोटींच्या ऑडिओ बॉम्बने खळबळ उडवून दिली होती. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांच्यामार्फत भाजपकडून जरांगे पाटील यांच्यासाठी 500 कोटी रुपये घेतल्याचा कथित दावा होता. त्याने एकच खळबळ उडाली. या कथित ऑडिओ क्लिपमधील नावंही पुढे समोर आली. त्यानंतर एसआयटी पथकाने परवा जरांगे पाटील यांची भेट घेतली. त्यांच्याकडून पेन ड्राईव्हसह इतर मुद्देमाल हस्तगत केला. पंचनाम्यावर त्यांची स्वाक्षरी घेतली. तर आता याचप्रकरणात कदम विरुद्ध जरांगे असा सामना उभा महाराष्ट्र पाहत आहे. जरांगे पाटील यांनी एसआयटी पथक आल्यानंतरही कदम यांच्या नावाचा धोशा लावला होता. आता गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी जरांगे पाटील यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केल्याने खळबळ उडाली आहे.

योगेश कदम यांचा जरांगे पाटील यांच्यावर मोठा आरोप

गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी मनोज जरांगे सुपारी घेऊन काम करत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. मराठा समाजासाठी आमच्या सरकारने घेतलेले निर्णय इतिहासात कधीही घेतले गेले नाहीत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बदनाम करण्याचा जरांगेंचा प्रयत्न आहे. आता त्यांची दिशा भरकटली आहे. जरांगेंचा उद्देश मराठा समाजाच्या हिताचा दिसत नाही, असेही कदम म्हणाले. जरांगेंनी दिलेल्या पेनड्राइव्ह प्रकरणी SIT चौकशी सुरू, दीड महिन्यात त्यांनी नावे जाहीर देखील केले तरी चौकशीत सत्य समोर येणारच असल्याचे योगेश कदम म्हणाले.

रामदास कदम यांचा जरांगे पाटलांवर पलटवार

कथित ऑडिओ क्लिप प्रकरणात मनोज जरांगे पाटील यांनी शिवसेना नेते रामदास कदम यांचीही चौकशी करण्याची मागणी केल्यानंतर आता रामदास कदम यांनी जोरदार पलटवार केला आहे. ‘मनोज जरांगे घाबरले आहेत, म्हणूनच माझ्याकडे बोट दाखवत आहेत,’ अशा शब्दांत कदम यांनी जरांगेंना प्रत्युत्तर दिलं आहे. तुमच्या पत्रकार परिषद होण्याआधीच बीडमध्ये ही ऑडिओ क्लिप वाजली होती. ती माझ्याकडे दुसऱ्या दिवशी आली, तेव्हा मी त्यावर बोललो, असंही कदम यांनी स्पष्ट केलं.

दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्यावर ५०० कोटींचे कथित आरोप करण्यात आले असून मुख्यमंत्र्यांनी आता चौकशी लावली आहे. त्यामुळे सर्व सत्य बाहेर येईल, असा विश्वास रामदास कदम यांनी व्यक्त केला. ‘माझ्याकडे खूप काही मसाला आहे, मात्र सध्या मला काही बोलायचं नाही. चौकशीत जे काही आहे ते निष्पन्न होईल,’ असं सूचक विधान करत रामदास कदम यांनी या प्रकरणातील सस्पेन्स आणखी वाढवला आहे. आता रामदास कदम यांच्या या पलटवारावर मनोज जरांगे पाटील काय उत्तर देणार, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.

Follow Us
सोलापूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत मोहिते पाटील गटाचा पहिला विजय....
Solapur DCC Bank Result : सोलापूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत मोहिते पाटील गटाचा पहिला विजय; अर्जुनसिंह मोहिते पाटील यांची बाजी
संसद अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या NCP कडून व्हिप जारी..
NCP : संसद अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या NCP कडून व्हिप जारी; नेमका काय आहे पक्षाचा निर्देश?
देशातील लोकशाहीच्या पाठीवर; सत्तेची सूत्रं दोन व्यापाऱ्यांच्या...
Sanjay Raut : देशातील लोकशाहीच्या पाठीवर...; सत्तेची सूत्रं दोन व्यापाऱ्यांच्या हातात, संजय राऊतांचा मोठा दावा
शरद पवार प्रकृती अस्वास्थ्यामुळे निर्णय घेण्याच्या स्थितीत नाहीत....
Sanjay Raut :  शरद पवार प्रकृती अस्वास्थ्यामुळे निर्णय घेण्याच्या स्थितीत नाहीत..; संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
शरद पवारांच्या प्रकृतीबाबत अपडेट; प्रकृती स्थिर, डॉक्टरांचा....
Sharad Pawar Health Update : शरद पवारांच्या प्रकृतीबाबत अपडेट; प्रकृती स्थिर, डॉक्टरांचा विश्रांतीचा सल्ला
डिलिमिटेशन विधेयकात महिला आरक्षणाचा मुद्दा दिशाभूल करणारा....
Natasha Awhad : डिलिमिटेशन विधेयकात महिला आरक्षणाचा मुद्दा दिशाभूल करणारा; नताशा आव्हाड असं का म्हणाल्या?
सुनेत्रा पवारांच्या पुणे पालकमंत्री पदावर रोहित पवारांचा सवाल, थेट...
Rohit Pawar : सुनेत्रा पवारांच्या पुणे पालकमंत्री पदावर रोहित पवारांचा सवाल, थेट म्हणाले...
रायगड किल्ला उजळणार सौर ऊर्जेने! राज्यातील 11 ऐतिहासिक गडांवरही...
रायगड किल्ला उजळणार सौर ऊर्जेने! राज्यातील 11 ऐतिहासिक गडांवरही राबवणार विशेष मोहीम
रोहित पवारांच्या वक्तव्यावर माधुरी मिसाळ संतापल्या; म्हणाल्या, राजकारण
रोहित पवारांच्या 'त्या' वक्तव्यावर माधुरी मिसाळ संतापल्या; म्हणाल्या, 'राजकारणात इतका उतावळेपणा कशासाठी?'
सुनेत्रा पवारांचा राष्ट्रवादीच्या सर्व मंत्र्यांना तातडीने बैठकीचे...
सुनेत्रा पवारांचा राष्ट्रवादीच्या सर्व मंत्र्यांना तातडीने बैठकीचे आदेश, देवगिरी बंगल्यावर मोठ्या घडामोडी!