AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

छत्तीसगडमध्ये चकमक, 15 नक्षलवादी ठार, 5 जवान शहीद, 21 गायब

छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये काल सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये जोरदार चकमक उडाली. (Chhattisgarh Maoist attack: 5 jawans killed, several injured; 15 missing)

छत्तीसगडमध्ये चकमक, 15 नक्षलवादी ठार, 5 जवान शहीद, 21 गायब
प्रातिनिधिक फोटो
| Updated on: Apr 04, 2021 | 10:32 AM
Share

बिजापूर: छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये काल सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये जोरदार चकमक उडाली. या चकमकीत 15 नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं आहे. तर 5 जवान शहीद झाले आहेत. तर, 21 जण गायब झाले आहेत. (Chhattisgarh Maoist attack: 5 jawans killed, several injured; 15 missing)

काल शनिवारी सुरक्षा दल आणि पोलिसांची बिजापूरच्या तररेम जंगलात चकमक उडाली होती. यावेळी 21 जवान गायब झाले होते. त्यांचा शोध घेण्यासाठी आज सकाळी पुन्हा सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आलं. या चकमकीत 24 जवान जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यातील सात जवानांना उपचारासाठी रायपूरला नेण्यात आले आहे. तर कोबरा कमांडोच्या एका जवानाचा मृतदेह आज सकाळी आढळून आला आहे. याबाबतचं वृत्त आजतकने दिलं आहे.

सर्च ऑपरेशन अजूनही सुरू

या चकमकीत पाच जवान शहीद झाल्याचं शनिवारी सांगण्यात आलं होतं. त्यात डीआरजीचे तीन आणि सीआरपीएफच्या दोन जवानांचा समावेश होता. तसेच या चकमकीत 9 नक्षलवादी मारले गेल्याचं सांगण्यात येत होतं. मात्र, या चकमकीत 12 ते 15 नक्षलवादी मारल्या गेल्याचं सूत्रांनी सांगितलं. तसेच यावेळी 20 नक्षलवादी जखमी झाले आहेत. एक महिला नक्षलवादीही ठार झाली असून नक्षलवाद्यांच्या विरोधात अजूनही सर्च ऑपरेशन सुरू आहे.

आयईडी प्लांट करण्याचा प्लान

आजतकच्या वृत्तानुसार, बिजापूर, सुकमा आणि कांकेर येथे नक्षलवाद्यांकडून सातत्याने कँप लावले जात होते. या कँपमध्ये सुमारे 200 ते 300 नक्षलवादी सहभागी होत होते. तर सुरक्षा दलाच्या माहितीनुसार, नक्षलवाद्यांचे डिव्हिजनल कमांडर छत्तीसगडच्या बिजापूर कँम्पमध्ये राहत होते. बिजापूरमध्ये आयईडी प्लांट करण्याची नक्षलवाद्यांची योजना होती, अशी माहितीही समोर येत आहे.

मोदींचं ट्विट

या घटनेनंतर डीजी सीआरपीएफ कुलदीप सिंग हे छत्तीसगडच्या दौऱ्यावर जाणार आहेत. घटनेची माहिती घेण्यासाठी ते छत्तीसगडला जाणार आहेत. गृहमंत्रालयाने डीजींना घटनास्थळी जाण्याचे निर्देश दिल्याचं सूत्रांनी सांगितलं. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून या घटनेत पाच जवान शहीद झाल्याबद्दल शोक व्यक्त केला आहे. छत्तीसगडमध्ये शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांप्रती माझ्या संवेदना आहेत. शहीद जवानांना देश कधीच विसरणार नाही, असं मोदींनी म्हटलं आहे.

तातडीची बैठक

या घटनेनंतर डीजीपी डीएम अवस्थी यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची तात्काळ बैठक बोलावली होती. या बैठकीत घटनेचा आढावा घेऊन पुढील रणनीती ठरवण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं. (Chhattisgarh Maoist attack: 5 jawans killed, several injured; 15 missing)

संबंधित बातमी:

छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, 15 जवान बेपत्ता

छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक; 5 जवान शहीद

खाणी आणि खनिजांवरील नवा कायदा संसदेत मंजूर, काय आहेत मोठे बदल?

(Chhattisgarh Maoist attack: 5 jawans killed, several injured; 15 missing)

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
‘अभी भी जिंदा हूं’ सोनम वांगचूक यांचा रुग्णालयातून पहिला व्हिडीओ समोर, सरकारला काय म्हटलं?.

‘अभी भी जिंदा हूं’ सोनम वांगचूक यांचा रुग्णालयातून पहिला व्हिडीओ समोर, सरकारला काय म्हटलं?

मोठी बातमी! ठाकरे बंधू रस्त्यावर उतरणार, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी 26 तारखेला संयुक्त मोर्चा.

मोठी बातमी! ठाकरे बंधू रस्त्यावर उतरणार, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी 26 तारखेला संयुक्त मोर्चा

मोदींनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा न घेण्यामागचं ओडिशा कनेक्शन? वाचा इन्साईड स्टोरी.

मोदींनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा न घेण्यामागचं ओडिशा कनेक्शन? वाचा इन्साईड स्टोरी

निर्भय बनो…! झिम्बाब्वे दौऱ्यात निर्धास्तपणे खेळा, कर्णधार श्रेयस अय्यरचा टीम इंडियाला कानमंत्र; पण….

निर्भय बनो…! झिम्बाब्वे दौऱ्यात निर्धास्तपणे खेळा, कर्णधार श्रेयस अय्यरचा टीम इंडियाला कानमंत्र; पण…

66 दिवसांपूर्वी क्रिकेटपटूच्या मृत्यूची अफवा, आता थेट संघाचं कर्णधारपद मिळालं.

66 दिवसांपूर्वी क्रिकेटपटूच्या मृत्यूची अफवा, आता थेट संघाचं कर्णधारपद मिळालं

…तर मंत्र्यांना स्पष्ट संदेश जाईल, अण्णा हजारेंचं पंतप्रधान मोदींना पत्र, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी.

…तर मंत्र्यांना स्पष्ट संदेश जाईल, अण्णा हजारेंचं पंतप्रधान मोदींना पत्र, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी