AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक; 5 जवान शहीद

छत्तीसगडगच्या बिजापूर येथे पोलीस, सीआरपीएफचे जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत पाच जवान शहीद झाले आहेत. (five security personnel martyred in encounter with Naxals in Chhattisgarh)

छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक; 5 जवान शहीद
naxal attack
| Updated on: Apr 03, 2021 | 6:24 PM
Share

बिजापूर: छत्तीसगडगच्या बिजापूर येथे पोलीस, सीआरपीएफचे जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत पाच जवान शहीद झाले आहेत. शहीद जवानांमध्ये तीन डीआरजीच्या तर दोन सीआरपीएफच्या जवानांचा समावेश आहे. तसेच या चकमकीत एकूण 20 जण गंभीर जखमी झाले आहेत. (five security personnel martyred in encounter with Naxals in Chhattisgarh)

बिजापूरच्या तारेम येथे ही चकमक झाली. नक्षलविरोधी अभियानातील 400 जवान आणि पोलीस तारेम पोलीस ठाण्याकडे जात असताना सिलगेरच्या जंगलात नक्षलवाद्यांनी या टीमवर हल्ला केला. त्यामुळे झालेल्या चकमकीत पाच जवान शहीद झाले. तर तीन नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात जवानांना यश आलं. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी 9 रुग्णवाहिका पाठवण्यात आल्या आहेत. तसेच जखमी जवानांना आणण्यासाठी घटनास्थळी हेलिकॉप्टरही पाठवण्यात आलं आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी या घटनेवर नजर ठेवून आहेत. झीरम हा नक्षलवादी या हल्ल्याचा मास्टरमाइंड असल्याचं सांगितलं जात असून तो हिडमा सिलगेर गावचा रहिवासी असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

नक्षलविरोधी अभियान

छत्तीसगडमध्ये नक्षलविरोधी अभियान सुरू आहे. या अभियानात सीटीएफ, डीआरबी, सीआरपीएफ आणि सीओबीआरएचे सुमारे 400 जवान सहभागी आहेत. हे जवान नक्षल विरोधी अभियानासाठी रवाना झाले होते. जंगलात आल्यानंतर नक्षलवाद्यांनी त्यांना घेरल्यानंतर ही चकमक उडाली. यापूर्वी नक्षलवाद्यांनी मार्चमध्ये आईडी ब्लास्ट केला होता. त्यात पाच जवान शहीद झाले होते. नारायणपूर येथे जवानांच्या बसवर हल्ला करण्यात आला होता. डीआरजीचे जवान एक ऑपरेशन यशस्वी करून परत येत असतानाच या बसवर हल्ला करण्यात आला होता.

तीन वर्षात 970 नक्षली हल्ले

2 फेब्रुवारी 2021 रोजी लोकसभेत नक्षली हल्ल्यांची माहिती देण्यात आली होती. नक्षल प्रभावित परिसरात नक्षली हल्ल्यात घट झाल्याचा दावा केंद्रीय गृहराज्यमंत्री जी. किशन रेड्डी यांनी केला होता. 2018मध्ये देशात 833 नक्षली हल्ल्याच्या घटना घडल्या होत्या. तर 2019मध्ये ही संख्या कमी होऊन 670 वर आली होती. 2020मध्ये 665 नक्षली हल्ल्याच्या घटना झाल्याचं रेड्डी यांनी म्हटलं होतं. तर छत्तीसगडमध्ये 2019च्या तुलनेत 2020मध्ये नक्षली हल्ल्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. छत्तीसगडमध्ये 2018 ते 2020 या तीन वर्षाच्या काळात 970 नक्षली हल्ला झाले. त्यात 113 जवान शहीज झाले आहेत. तर 2019मध्ये छत्तीसगडमध्ये 263 घटना घडल्या होत्या. 2020मध्ये ही संख्या 20 टक्क्याने वाढून 315 झाली होती. 2019मध्ये छत्तीसगडमध्ये झालेल्या नक्षली हल्ल्यात 22 जवान शहीद झाले होते. तर 2020मध्ये 36 जवान शहीद झाले होते. (five security personnel martyred in encounter with Naxals in Chhattisgarh)

संबंधित बातम्या:

18 लाखांचं बक्षीस असलेले नक्षली दाम्पत्य गडचिरोली पोलिसांच्या ताब्यात

गडचिरोलीमध्ये संविधानाचा विजय, 38 वर्षानंतर नक्षली हल्ल्याविना ग्रामंपचायत निवडणूक संपन्न

मनसे पदाधिकारी जलील शेख यांची दोन लाखांची सुपारी, गोळी झाडणारा अटकेत, मुख्य आरोपी फरार

(five security personnel martyred in encounter with Naxals in Chhattisgarh)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.